एकल घाट

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
16 Feb 2012 - 9:24 am

चालते आठवण उतरुन एकल घाट
क्षण; विसरुन थांबे उसंत घेइ रहाट
जन्मांच्या वेठी भावुकल्या भातुकल्या भेटी येती
चंद्रासह उजवे उगवे रमण पहाट

बागडे चांदणे; रास खेळती राती
कांही न उरे तळहाती सरल्या अंती
बहु शंख शिंपले आदळती ओघात
कातरला अवघा लाट झेलुनी काठ

पलकांतिल गाठी रमल फुलांची माला
शमवी हृदयातिल विरही दारुण ज्वाला
साकडे घालतो रोज नव्या स्वप्नांसाठी
तुम्हि येत रहा नित करुन वाकडी वाट

............................अज्ञात

करुणकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Feb 2012 - 9:33 am | प्रचेतस

पुणे नाशिक महामार्गावर घारगाव -डोळासणे जवळ हा एकल घाट आहे ब्वा. ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Feb 2012 - 1:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

परत एकदा अफाट रचना!!!

बागडे चांदणे; रास खेळती राती
कांही न उरे तळहाती सरल्या अंती
बहु शंख शिंपले आदळती ओघात
कातरला अवघा लाट झेलुनी काठ

व्वाह... सुंदर!!

गणेशा's picture

16 Feb 2012 - 1:41 pm | गणेशा

कविता आवडली

आवडली कविता
छान..शब्द रचना

इन्दुसुता's picture

17 Feb 2012 - 9:09 am | इन्दुसुता

परत एकदा अफाट रचना!!!

अगदी असेच म्हणते... याशिवाय दुसरे शब्द नाहीत....

पप्पु अंकल's picture

19 Feb 2012 - 5:17 pm | पप्पु अंकल

बहु शंख शिंपले आदळती ओघात
कातरला अवघा लाट झेलुनी काठ
या ओळिंवरुन हा घाट म्हणजे किनारा असावा

शुचि's picture

20 Feb 2012 - 7:05 pm | शुचि

सुंदर आहे रचना.