मी एकटी
आयुष्य एकत्र अनुभवायचं वचन तू विसरलास
मला एकटीला सोडून न जाणे का तारा झालास..
कदाचित नाही ओळखता येणार मला इतक्या असंख्य चांदण्यात
पण तू मला बघशील वरून अशी खात्री असते मनात
रोज इथे येते मी तुला शोधायला या गगनात
तुझं अस्तित्व भासतं मला फक्त काळोखात
भोवताली काळाकुट्ट अंधार आणि वर मोकळे आकाश
निशा झाली आहे माझी सोबती, नको वाटतो आहे हा प्रकाश
प्रयत्न चालू आहेत स्वतःला धीट करण्यासाठी
खंबीर होऊन एकटीने जगण्यासाठी..
पटत आहे की जिद्दीने दुःख हलके नक्कीच होणार
नाही चालणार सतत आश्रू ढाळून
कारण आसवांची चव ही नेहमीच खारट असणार
~~ प्रिया
प्रतिक्रिया
13 Feb 2012 - 4:43 pm | पक पक पक
छान आहे ,पण थोड गद्य वाट्तय.... असु द्या .
13 Feb 2012 - 5:28 pm | दादा कोंडके
वॅलेंटाइन्सच्या आदल्या दिवशी जुन्या आठवणी जाग्या झाल्या वाटतं! ;)
बाकी कविता ठिकच.