अमराईतला निवडुंग,

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
13 Feb 2012 - 9:40 am

डुबुक डुबुक डुबुक डुबुक,
डराव डराव डराव डराव,
काव काव काव काव,
म्याव म्याव म्याव म्याव,

तडतड ताशा, धडधड गाज,
ढोल वाजतो मठ्ठ स्वरात,
वृषभ त्वचा ही पॉवरबाज,
वॄषोदर उतरे माडी आज,

पंकज भार्या जगास तारी,
मोहनमर्कट वन्दा भारी
वृषणे ठेचा घाला दोरी,
मंडुकरावही चाबुक मारी,

पिवळा शेंबुड वाहे भळभळ,
अश्वथामा करतो जळजळ,
तरुणाईची बिभित्स सळसळ,
गाभार्‍यातील पिसाट वळवळ,

गुरुवर्यांना सुटते खाज,
गुरुकुलातला नंगा नाच,
ज्ञानरज्जुला पतंग माज,
शरपंजरीवर मदीरा पाज,

जगणे थोटे, सारे खोटे,
नर्मदेतले दगड गोटे,
लोचट कुत्रा पायही चाटे,
जनमृत्युचे घालत खेटे,

रामाला शरयूने गिळले,
शामराव बाणाने निमले
या सार्‍यातुन इतके कळले
आपण मेलो जग बुडाले,

डु....बु....क...., ड....रा....व....,
का....व...., म्या....व....,

लावत ठिगळे लंगोटीला,
बुवा हसतो गुढ जगाला,

पैजारबुवा,

शांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 Feb 2012 - 9:44 am | प्रचेतस

अप्रतिम हो पैजारबुवा.

रामाला यमुनेने गिळले,
शामराव बाणाने निमले

यमुना नाय हो शरयु असावी बहुतेक ,जरा खात्री कराल का..? बाकी मस्त ! आवड्ले ..

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Feb 2012 - 10:24 am | ज्ञानोबाचे पैजार

अरेरे, गलतीसे मिष्टेक हो गया. सं.मं. ला विनंती त्यांनी योग्य तो बदल करावा.
पैजारबुवा,

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Feb 2012 - 1:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

रचना आवडली.

गणेशा's picture

14 Feb 2012 - 10:15 pm | गणेशा

कविता जबरदस्त

शांतरस तर नक्की नाही

याक नंबर ओ पैजारबुवा

आवडेश

वपाडाव's picture

15 Feb 2012 - 3:19 pm | वपाडाव

आमच्या एका आंजा मित्राची आठवण म्हणुन हा प्रतिसाद...
सध्या ते कोमात आहेत.

चित्रगुप्त's picture

19 May 2015 - 8:35 pm | चित्रगुप्त

वाहवा बुवा, फारा दिवसांनी काही जबरदस्त वाचायला मिळाले. सलाम.

छान रचना . मर्ढेकर ष्टाईल !

सस्नेह's picture

21 May 2015 - 8:18 am | सस्नेह

अगदी मर्ढेकरी बाज !

दमामि's picture

21 May 2015 - 7:45 am | दमामि

अगदी हेच म्हणायचे आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 May 2015 - 2:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

नै म्हंजे पुर्वी वाचलेल्या त्यांच्या कविता आठवल्या :)

पैसा's picture

21 May 2015 - 2:40 pm | पैसा

ही कविता वाचली नव्हती! मस्त आहे!

स्पा's picture

21 May 2015 - 2:47 pm | स्पा

एकच नंबर बुवा