एक कविता..

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in जे न देखे रवी...
8 Feb 2012 - 6:05 pm

रसरशित टिकटिकी
चमचमीत पावली
खलपलीत खल्पली
मिटमिटीत कावली..

अस्खलीत बाहुली
टुकटुकीत साउली
नात्यागोत्यांची नाउली
आडमुठ्यांची माउली

खरखरीत भिंगरी
झणझणीत टिंगरी
अभ्यागतांच्या मंदिरी
कडकडीत किरकिरी

तळतळीत मिरमिरी
जळजळीत किंकिणी
नभनळीत बाजरी
लवलवीत पालवी..!

-- कॉमॅ.
रचना - २७ जानेवारी, २००८.

हास्यअद्भुतरसशांतरसकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2012 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा

बुळबुळितं जांभळी,सुळसुळीतं अठळी,
खाण्यासी जावे तर,तोंडातं गुठळी.

पक पक पक's picture

10 Feb 2012 - 6:00 pm | पक पक पक

खाण्यासी जावे तर,तोंडातं गुठळी.

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

मी-सौरभ's picture

8 Feb 2012 - 8:05 pm | मी-सौरभ

......

प्रचेतस's picture

8 Feb 2012 - 9:09 pm | प्रचेतस

प्रकाटाआ

वपाडाव's picture

8 Feb 2012 - 8:24 pm | वपाडाव

अळी मिळी, गुप चिळी,
तोंडावर बोट, गालावर खळी,
बळी तो बळी, कान पण पिळी,
बंदुकीची नळी, अडकली जाळी,
पुरणाची पोळी, दे आता टाळी...

टिकली कपाळी, तंग तंग चोळी,
पोरगी भोळी, घेउन गेला कोळी,
इतकी दिली हाळी, आला नै वाळी,
बंदुकीची नळी, अडकली जाळी,
पुरणाची पोळी, दे आता टाळी...

ह्या कवितेला, गणपतीराया, तुझ्या पडतो मी पाया ह्या चालीवर वाचावे...

मी-सौरभ's picture

9 Feb 2012 - 10:23 am | मी-सौरभ

बरी आहे...
वरची तर एकदमच बाउंसर गेली होती

इरसाल's picture

9 Feb 2012 - 4:03 pm | इरसाल

सौरभ बरी काय ? चान चान म्हणा........

प्रचेतस's picture

8 Feb 2012 - 9:15 pm | प्रचेतस

'य' ला 'ट' 'ट' ला 'व'
जुळवा यमक
कराल का कावकाव
आहे का धमक

अन्या दातार's picture

8 Feb 2012 - 9:29 pm | अन्या दातार

बडबड गीतातले शब्द जरा कळण्यासारखे-लक्षात राहतील असे तरी असतात. हे काय म्हणावे ब्वा?

मी-सौरभ's picture

9 Feb 2012 - 10:25 am | मी-सौरभ

अन्या
हे बडबडगीत नसून;
जास्त झाल्यानंतरची बड्बड असावी अशी मला शंका आहे ;)

कॉमन मॅन's picture

9 Feb 2012 - 11:04 am | कॉमन मॅन

जास्त झाल्यानंतरची बड्बड असावी अशी मला शंका आहे

सौरभजी,
आपली शंका रास्त वाटते, परंतु सुदैवाने तसे नाही! :)

अनियमित उमासे
अशिक्षित उसासे
खाल्याघरचे सामोसे
सोकावलेले..!

या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. :)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2012 - 11:43 am | अत्रुप्त आत्मा

अनियमित उमासे :puzzled:
अशिक्षित(?) उसासे...(म्हणजे काय होsssss..?)
खाल्याघरचे सामोसे...( राम राम राम राम...!)
सोकावलेले..!....

जरा या चार ओळींचा अर्थही समजाऊन सांगा हो...कॉमन मॅन

मी-सौरभ's picture

9 Feb 2012 - 11:53 am | मी-सौरभ

मा. कॉ.मॅ. जी

परंतु सुदैवाने तसे नाही!

यात सुदैव ते काय???
तसे असते तर आम्ही या कवितेला समजून तरी घेतले असते आता तर वेगळिच शंका येत आहे...

(रास्त शंकेखोर) सौरभ

जाऊ द्या: ह्या कविते (किंवा जे काय आहे ते) विषयी 'गणेशाचे' विचार ऐकण्यास उत्सुक आहे...

पक पक पक's picture

10 Feb 2012 - 6:34 pm | पक पक पक

अनियमित उमासे


पण तुमचे तर नियमित येत असतात कि.... :)

अशिक्षित उसासे


अर्धशिक्षित अस म्हणायच आहे का तुम्हाला.. ;)

खाल्याघरचे सामोसे
सोकावलेले..!

हे मिसळ्पाव केंद्र आहे , उगाच जिलब्या ,सामोसे,ढोकळे असल काही विकु नका इथे.

चिंतामणी's picture

9 Feb 2012 - 11:35 am | चिंतामणी

अनियमित उमासे
अशिक्षित उसासे
खाल्याघरचे सामोसे
सोकावलेले..!

या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. Smile

आँ. म्हणजे ही झलक होती???????? :O :-O :shock:

पळावे आता इथुन

Facebook smileys

वपाडाव's picture

9 Feb 2012 - 3:20 pm | वपाडाव

Bomb Smiley
मालक, थोडा वेग वाढवा, नैतर मागुन बॉम्ब पडायचा अन ढुम्म्म्म्... Facebook smileys

नवकाव्याची मळ्मळ तळ्मळत (कि वळ्वळ्त) बाहेर काढ्ली आहे.