जो डाव आता, असे खेळला मी, तो दाविनच जिंकुनी

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
8 Feb 2012 - 5:07 pm

कवी झाले अंतर, काव्यच वेदना ही,
ही रात्र कविता जणू
इतरांच्या कवितांना, ए ऐकणारे,
हे काव्यही ऐक तू

येऊन जरा बघ, मी प्रीत्यर्थ तुझिया,
जगतो हे जीवन कसे
अश्रुंच्या धाग्यांनी, शिवतो सदा मी,
हे घाव जे तू दिले

घेऊन तुझे दुःख, आसक्तीद्वारी,
मी खेळलो बघ जुगार
जरी जिंकलो जग, तरी हारलो तुजसी,
हा खेळ झाला असा

जे समरसुनी मी प्रेम केले,
त्यासम उदाहरण न खास
जरी काजवा मी, प्रेमात पेटून,
जणू जाहलो सूर्य आज

माझ्यामुळे प्रेम, जीवित असे
आणि मैफिल तुझी रंगदार
जेव्हा नसेन मी, रडत सारे जग हे,
हुडकेल माझेच माग

ग प्रेम हे, खेळणे मुळी नसे जे,
कुणीही खरीदू शके
माझ्याप्रमाणे, आयुष्य जळता,
ये ध्यानी सारे कसे

आहे प्रवासी, असो पंथ कुठलाही,
जाईन त्या लंघुनी
जो डाव आता, असे खेळला मी,
तो दाविनच जिंकुनी

२००६०५०३

ही कविता माझी नाही. हे आविष्करण मात्र माझेच आहे!

ही मूळ कविता कदाचित तुमच्या ओळखीची असू शकेल. पटली ओळख तर अवश्य सांगा!

अद्भुतरसकलाकवितामौजमजा

प्रतिक्रिया

कॉमन मॅन's picture

8 Feb 2012 - 5:15 pm | कॉमन मॅन

जरी जिंकलो जग, तरी हारलो तुजसी,
हा खेळ झाला असा

वा..! या ओळी आवडल्या..

जरी काजवा मी, प्रेमात पेटून,
जणू जाहलो सूर्य आज

ही जराशी अतिशोयोक्तीच वाटते.. असो.

ही कविता माझी नाही.

मग कुणाची आहे ते कृपया सांगता का?

ही मूळ कविता कदाचित तुमच्या ओळखीची असू शकेल. पटली ओळख तर अवश्य सांगा!

नाही, ओळख पटत नाही. आपणच खुलासा केलात तर बरे होईल..

पैसा's picture

8 Feb 2012 - 5:37 pm | पैसा

मूळ गाणं ओळखलं.

"दिल आज शायर है
गम आज नगमा है
शब ये गजल है सनम
गैरों के शेरों को ओ सुननेवाले
हो इस तरफ भी करम"

बरोबर का?

गणेशा's picture

9 Feb 2012 - 3:17 pm | गणेशा

दिल आज शायर
गम आज नगमा है

तुमचा अनुवाद आवडला

नरेंद्र गोळे's picture

11 Feb 2012 - 10:36 am | नरेंद्र गोळे

कॉमन मॅन, पैसा आणि गणेशा तुम्हाला प्रतिसादाखातर हार्दिक धन्यवाद!

मूळ हिंदी गीतः दिल आज शायर हैं, गीतकारः नीरज, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः किशोर कुमार, चित्रपटः गँबलर, भूमिकाः देव आनंद, झीनत अमान

ही जराशी अतिशोयोक्तीच वाटते.. असो. >>>>
असेलही. मात्र मूळ लेखकाचीच आहे.
अनुवादकाला ती सौम्य करण्याचे कुठलेही स्वातंत्र्य नाही.
मूळ गीत पाहा म्हणजे सत्यता पटेल.

दिल आज शायर है, गम आज नगमा है,
शब ये गझल है सनम
गैरों के शेरों को ओ सुननेवाले,
हो इस तरफ भी करम

आके जरा देख तो, तेरे खातिर,
हम किस तरह से जिये
आँसू के धागे से सीते रहे हम,
जो जख्म तुने दिये

चाहत की मैफिल में, गम तेरा लेकर,
किस्मत से खेला जुआँ
दुनिया से जीते मगर तुझ से हारे,
यूँ खेल अपना हुआ

है प्यार हमने किया जिस तरह से,
उसका न कोई जवाब
जर्रत है लेकिन, तेरी लौ में जल कर,
हम बन गये आफताब

हम से है जिंदा वफ़ा और
हमहीसे है तेरी महफिल जवाँ
हम जब न होंगे तो रो रो के
दुनिया ढुंढेगी मेरे निशाँ

ये प्यार कोई खिलौना नहीं है,
हर कोई ले जो खरीद
मेरी तरह जिंदगी भर तडप लो,
फिर आन उसके करीब

हम तो मुसाफिर है, कोई सफर हो,
हम तो गुजर जाएंगेही
लेकिन लगाया है जो दाँव हमने,
वो जीत कर आएंगेही

सांजसंध्या's picture

3 Mar 2012 - 4:45 pm | सांजसंध्या

शीर्षक पाहिलं आणि गँबलर सिनेमातल्या या गीताची आठवण झाली. :) छान खेळ होता हा ..

दिपक's picture

3 Mar 2012 - 5:09 pm | दिपक

.

सांजसंध्या आणि दिपक, प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

दिपक, आता प्रच्छन्न प्रतिसाद द्यायला हरकत नाही!!