एकांग

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
8 Feb 2012 - 10:36 am

मी तुझा; तुझ्याविण फास पारधी; हरलो
तुज छबी मागुती वलय गणत उलगडलो
तू मुक्त लोळ तडितेचा; मी वृक्ष जखडला मातीचा
पसरून विशाखा ओंजळ होउन फुललो

पाताळ शोधिले पाहिले न कधि मागे
हृदयातिल स्पंदन अंकुर अजुनी जागे
भ्रमणात; भ्रमाच्या छायेपाठी फिरलो
नवक्षितिजावर मेघांकित दिनकर झालो

पाहून पालखी पलकांची; मी फसलो
बोलक्या स्मिताच्या लहरींवरती झुललो
क्षण कांही पण अंतरास स्पर्शुन गेले
एकांग रणी काजळात अंती विरलो

...........................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

8 Feb 2012 - 11:40 am | पक पक पक

वा ! वा वा !! छान छान ....?

पक पक पक's picture

8 Feb 2012 - 1:23 pm | पक पक पक

वा ! वा वा !! छान छान ....?

पाताळ शोधिले पाहिले न कधि मागे
हृदयातिल स्पंदन अंकुर अजुनी जागे
भ्रमणात; भ्रमाच्या छायेपाठी फिरलो
नवक्षितिजावर मेघांकित दिनकर झालो

अप्रतिम .. खुप आवडले ..

शृंगारीक कविता मात्र वाटली नाही.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Feb 2012 - 4:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काय कल्पनाविलास आहे. सुंदर.

पाहून पालखी पलकांची; मी फसलो
बोलक्या स्मिताच्या लहरींवरती झुललो
क्षण कांही पण अंतरास स्पर्शुन गेले
एकांग रणी काजळात अंती विरलो

मान गये!

इन्दुसुता's picture

9 Feb 2012 - 7:21 am | इन्दुसुता

कविता आवडली