मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
4 Feb 2012 - 8:06 am

मी सूर लावूनी मस्त जगत गेलो
मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो

मी दुख पाहिले तरीही नाही खचलो
मी शांतपणे दुखही भोगित गेलो

मी होतो कोठे..? नि आलो आता कोठे ..?
का मी उगाच वणवण फिरलो ...?

हे दुख किती नि सुख किती आले गेले ...
ना हिशेब केले की नाही मोजीत बसलो

हरणे,जिंकून जाणे मी गौण समजलो
खोटा डाव कधी ना मी खेळत बसलो

दुख कधी मी कुरवाळीत नाही बसलो
दुखाला दूर लोटुनी मी पाउल टाकीत गेलो

मी भणग होऊन आलो मी अनवाणीही फिरलो
मी कंदील घेउनी फिरलो , नि स्वप्ने शोधीत बसलो

जमेल तसे मी आनंदाचे रतिब टाकीत गेलो
दुःख जराशे ,सुख जराशे मी सुर लावित गेलो

मी सूर लावूनी मस्त जगत गेलो
मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो ......

करुणकविता

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

4 Feb 2012 - 8:37 am | पक पक पक

छान छान मस्त आहे..... :)

पण मग आता अस काय झाले ;)

मयुरपिंपळे's picture

4 Feb 2012 - 9:17 am | मयुरपिंपळे

दुख कधी मी कुरवाळीत नाही बसलो
दुखाला दूर लोटुनी मी पाउल टाकीत गेलो

अतिशय सुंदर काव्य रचना. Smiley

अन्या दातार's picture

4 Feb 2012 - 1:28 pm | अन्या दातार

मी यमक जुळवुनी काहीही लिहीत गेलो
मी कवी होण्यासाठी नाही जन्माला आलो ||

मी ‘साभार परत’ पाहुनी नाही खचलो
बोले करून कागदांचे ते मी फेकीत गेलो ||

मी होतो कोण...? नि आता आहे कोण....?
का मी लेखणी झिजवत फिरलो.....? ||

हे धृवपद एकाच अन कडवी किती
ना हिशेब केले ना मोजीत बसलो ||

लिहिणे-फेकून देणे मी गौण समजलो
ऑफिसचा कागद रोज नासवित बसलो ||

संकेतांना नाही मी कधीच कुरवाळीत बसलो
वृत्तांना दूर लोटुनी मी पुढे लिहीत गेलो ||

मी भणंग होऊन गेलो, अनवाणीच सदा फिरलो
मी कागद घेउनी हाती शब्द शोधीत बसलो ||

जमेल तसे कवितांचे रतीब टाकत गेलो
दुखःच दुखः सारे, मी नवटाक लावीत गेलो ||

मी यमक जुळवुनी काहीही लिहीत गेलो
मी कवी होण्यासाठी नाही जन्माला आलो ||

प्रचेतस's picture

4 Feb 2012 - 5:19 pm | प्रचेतस

वा वा वा दातारबुवा, समस्त कविंची वेदना तुम्ही फारच सुरेख शब्दांत मांडली आहे.

छान... गेयता आणायचा एक प्रयत्न करतोय.
तुमचेच शब्द जरासे पुढे मागे सरकवून गेय्ता येते बघा.

सूर लावूनी मी , जगत मस्त गेलो
रडण्यास का मी जन्मास आलो

होउनी दु:खदर्शनेही नाही खचलो मी
शांतपणे दु:खही भोगित गेलो मी
किम्वा अजून थोडा बदल करून हेच कडवे:-

दु:खदर्शनेही ती खचवू न शकली मला
भोगून अन् सोडून गेली तीही प्रशांत मला

कोठून कोठे प्रवास माझा
गंतव्यविहीन प्रवास माझा
मळवीत रस्ते जिझवीत टाचा
वणवण सुरुच प्रवास माझा

हे दुख किती नि सुख किती आले गेले ...
ना हिशेब केले की नाही मोजीत बसलो

हरणे,जिंकणे समजून गौण मी
डाव खोटा कधी ना मी खेळीत बसलो

दुख ना कधी मी कुरवाळीले
नच कधीही दूर लोटुनी त्यास पाउल मी माघारिले

बस.
आता टंकाळा आला.

इन्दुसुता's picture

4 Feb 2012 - 10:03 pm | इन्दुसुता

कविता आवडली.
'मै जिंदगी का साथ निभाता चला गया ' या गाण्याची आठवण झाली वाचत असताना....

अहो कविराज , असे काही होत नाही हो ! माणसाच्या जीवनात ( हा कवी लोकांचा खास शब्द !)
दु: खे येतात सुखे येतात दोन्हीना काही काल माणूस कवाटाळून बसतोच बसतो. रडण्यातही कधीकधी सूर लावून रडणे होतेच की. ( राम कदम यानी अशा रडण्याचाच धागा गेऊन "
बुगडी माझी ... ची चाल रचली ... हे जाता जाता बरे ! ) काही ठिकाणी " सूर " तर काही ठिकाणी " सुर" असे का झाले बुवा ? दीर्घ उकाराचे खिळे संपले की काय ? असो. प्रयत्नास दाद आहेच !

गणेशा's picture

6 Feb 2012 - 2:12 pm | गणेशा

मी सूर लावूनी मस्त जगत गेलो
मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो ......

मस्त एकदम ... आवडले

मदनबाण's picture

7 Feb 2012 - 8:31 am | मदनबाण

सुंदर कविता... :)