ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता...

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जे न देखे रवी...
2 Feb 2012 - 11:07 am

''ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता''
म्हणते सखी मला, अन् हळूच हसते ।
तळहातांवर चेहरा घेउन,
उत्सुकतेने समोर बसते ।

समजत नाही काय करावे,
जुनीच कविता मांडावी? की स्वस्थ बसावे-
-समोरची वाचावी कविता?
वाचू देते खुशाल तीही,
केवळ माझ्या कवितेकरता ।

क्षणाक्षणाला अधिरा होतो रंग तिचा,
मी बुडू लागतो तिच्यात, तेव्हा
पुनश्च हसते, अन् उंचावुन भुवया म्हणते,
विसरलास का रे कविता ती?

उत्तर देण्याइतके नसते भान मला,
मी तिलाच केवळ पाहत बसतो,
बऱ्याचशा माझ्या कवितांचा
जन्माचा क्षण असाच असतो !!

- चैतन्य

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 11:11 am | प्रचेतस

मस्त कविता.

कविता वाचताना मिपाकर कवि गणेशा डोळ्यांसमोर तरळून गेले.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2012 - 11:14 am | अत्रुप्त आत्मा

उत्तर देण्याइतके नसते भान मला,
मी तिलाच केवळ पाहत बसतो,
बऱ्याचशा माझ्या कवितांचा
जन्माचा क्षण असाच असतो !!....बाकी कविता ठिकठाक...पण शेवट म्हणजे मात्र शेवटच झालाय..मस्त जमलाय

गवि's picture

2 Feb 2012 - 11:16 am | गवि

वाह..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Feb 2012 - 11:31 am | मिसळलेला काव्यप्रेमी

छान जमलीये.

मूकवाचक's picture

2 Feb 2012 - 11:54 am | मूकवाचक

असेच म्हणतो.

(जिलब्यापाडू नवकविन्च्या आयुष्यात असे काव्यनिर्मितीचे सुरेख क्षण लवकरच येवोत यासाठी शुभेच्छा)

जाई.'s picture

2 Feb 2012 - 12:17 pm | जाई.

सुंदर कविता

कवितानागेश's picture

2 Feb 2012 - 12:29 pm | कवितानागेश

छान.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2012 - 12:33 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!

सुहास झेले's picture

2 Feb 2012 - 12:44 pm | सुहास झेले

उत्तर देण्याइतके नसते भान मला,
मी तिलाच केवळ पाहत बसतो,
बऱ्याचशा माझ्या कवितांचा
जन्माचा क्षण असाच असतो !!

वाह !!

मनराव's picture

2 Feb 2012 - 1:12 pm | मनराव

मस्त...!!!

प्रीत-मोहर's picture

2 Feb 2012 - 1:54 pm | प्रीत-मोहर

मस्त रे चैतन्य. :)

फिझा's picture

2 Feb 2012 - 2:00 pm | फिझा

खुप छान !!! आवडलि काविता !!!

वपाडाव's picture

2 Feb 2012 - 2:04 pm | वपाडाव

सु रे ख...

छान रे चैतन्य! इतके दिवस कुठे होतास?! नियमित पोस्टवत राहा. :)

पैसा's picture

2 Feb 2012 - 3:53 pm | पैसा

+१

प्यारे१'s picture

2 Feb 2012 - 4:01 pm | प्यारे१

मनमेघ... ऐसेच लिखते रहो....!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2012 - 8:24 pm | बिपिन कार्यकर्ते

+३

सुंदर. :). छान वाटलं वाचून .... सखी हा शब्द. गोड आहे कविता.

दादा कोंडके's picture

2 Feb 2012 - 8:18 pm | दादा कोंडके

तळहातांवर चेहरा घेउन,
उत्सुकतेने समोर बसते

या वरून खूप लहान असताना वाचलेली एक गोष्ट आठवली. त्यात एक म्हातारी चेटकीण स्वतःचं डोकं मांडीवर ठेउन डोक्यातल्या उवा काढत बसलेली असते. पुढे खूप दिवस ही म्हातारी नंतर स्वप्नात येत असे. आणि नंतर असा प्रश्न पडला होता की डोळे तर त्या डोक्यालाच असणार मग ती उवा कशी शोधणार? :)

मस्त.. आवडली कविता.

--टुकुल

उत्तर देण्याइतके नसते भान मला,
मी तिलाच केवळ पाहत बसतो,
बऱ्याचशा माझ्या कवितांचा
जन्माचा क्षण असाच असतो !!

मस्त

इन्दुसुता's picture

3 Feb 2012 - 12:23 am | इन्दुसुता

छानच

राघव's picture

3 Feb 2012 - 11:45 am | राघव

आवडली कविता!
शेवटचे कडवे खूप सुंदर.. :)

राघव

चैतन्य दीक्षित's picture

3 Feb 2012 - 11:55 am | चैतन्य दीक्षित

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.

-चैतन्य.

ही सुंदर कविता वर आणते आहे.

स्मिता चौगुले's picture

18 Feb 2013 - 5:54 pm | स्मिता चौगुले

सुन्दर..

क्रान्ति's picture

18 Feb 2013 - 10:10 pm | क्रान्ति

खासच आहे कविता!