सफर / ओळख अहमदनगरची..
नमस्कार मी. पा. करांनो ,
मी पियू , आज अन पुढे येणाऱ्या भागांत मी तुम्हाला अहमदनगरची ओळख / सफर घडवून आणणार आहे.
अहमदनगर शहराचा इतिहास ,इथल्या पौराणिक वास्तू, संग्रहालये , महाल , तीर्थस्थाने अजूनही इतर बर्याच गोष्टीशी आपण सर्वाना परिचित करून देण्याचा मानस आहे ,तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवून पहिला भाग टाकत आहे .
ई . स . वी सन १४९४ मध्ये मुघल बादशाह अहमदशहा यांनी अहमदनगर शहराची स्थापना केली .
( याचा इतिहास मी पुढच्या धाग्यात सविस्तर देणार आहे )
ह्या २६ जाने. वारीला बरयाच दिवसापासून आतुरतेने वाट पहात असलेल्या संधीचा फायदा मला घेता आला ,
कारण हे कॅव्हलरी टँक म्युझिअम फकत १५ ऑगस्ट अन २६ जाने. लाच नागरिकासाठी खुले असते .
चला तर मग ओळख करून घेऊया ....

कॅव्हलरी टँक म्युझिअम


Armoured कॉर्प center अहमदनगरच्या अखत्यारीत येणारे कॅव्हलरी टँक म्युझिअम हे आशियातले एकमेव असे म्युझिअम आहे , ज्यात तुम्हाला रणगाड्यांचे विविध प्रकार ,इंडिअन आर्मी मध्ये वेगवेगळ्या काळात वापरलेले ,वेगवेगळ्या प्रकारची क्षमता असलेले विविध रणगाडे पहावयास मिळतील ,दुसर्या महायुद्धात वापरलेले , १९६५ ,१९७१ साली झालेल्या युद्धात वापरलेले व इतर देशांकडून जसे कि चीन ,पाकिस्तान,जर्मनी .कडून हस्तगत केलेले रणगाडे तुम्हाला इथे पहावयास मिळतील युद्धात वापरण्यात आलेल्या रणगाड्यांचा बराच मोठा माहितीपुर्ण संग्रह तुम्हाला इथे पहावयास मिळतो.
भूतपूर्व आर्मी चीफ ( late) जन. बी.सी.जोशी जे स्वत: आधी एक टँक मॅन होते त्यांनी १९९४ साली ह्या म्युझिअमच अनावरण केले आहे
इथले चैतन्याने भारावलेले वातावरण , रणगाड्यांचे विविध एक से बढकर एक मॉडेल ,युद्ध भूमित शौर्य गाजवलेल्या फौजी बांधवांच्या शौर्यगाथा या सर्वांची अनुभूती घेतल्यावर , तुमच्या आठवणीच्या एका कप्प्यात हे कॅव्हलरी टँक म्युझिअम घर करून राहील हे नक्की !
मी इथे या टँक म्युझिअमची तुम्हा सर्व वाचकांना ओळख करून देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे
नगर - सोलापूर रस्त्यावर हे म्युझिअम स्थित आहे , मेन गेट पासून जवळ जवळ अर्धा कि मी अंतरावर तुम्हाला आत जावे लागते. ओळखपत्र (कुठलेही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा फक्त ) , व्हेकल लाईसन , हेल्मेट आवश्यक आहे.
चला तर मग निघूया सफरीला.........................

प्रवेश करतानाच तुमच्या स्वागताला उभा आहे हा " TOPAZ" म्हणजेच OT-62.

याचे इंजिन हे अतिशय पावरफुल असून ,यात २० सैनिक वाहून नेण्याची क्षमता आहे ,पोलिश आर्मी ने हा रणगाडा १९६६ साली युद्धात वापलेला आहे

ही आहे स्कार स्काउट मार्क - ३ ( याला मी टूक्कल कार नाव दिले होते )
ही एक कॅनडीअन कार आहे ,ज्यात फोर्ड व्ही आकाराचे ८ सिलेंडर क्षमता असलेले शक्तिशाली इंजिन आहे ,ह्यामुळे ही एक वेगवान कार म्हणून वापरली गेली.ह्या कारचा वेग आहे ५५ कि. मी. प्रती तास.


शेर्मन कॅब :-
हा रणगाडा आम्हाला खूप आवडला
१९४४ साली ब्रिटीश आर्मी द्वारे याची निर्मिती झाली ,याचे निर्मिती श्रेय कॅप्टन डु. ट्वायट यांना जाते जे एक दक्षिण आफ्रिकेचे अभियंता होते .
याच्या निर्मितीचा हेतू जमीन खोडून माईन उखडून शक्तीपुर्वक फेकणे . हा एक शक्तिशाली रणगाडा ज्याचा वेग फक्त ताशी एक मैल होता.



चर्चिल ब्रिज लेयर : ( हा अजून एक उत्कृष्ठ )
हा रणगाडा दुसर्या चर्चिलने अस्तित्वात आणला म्हणून याला त्याचेच नाव पडले आहे
ह्या ब्रिज लेयरची खासियत म्हणजे हा ३० फुटापर्यंतचा ब्रिज सहज बनवू शकतो . हा रणगाडा " ब्रिटीश सेनेमध्ये १९६० सालापर्यंत सेवा देत होता .


सेन्चूरियन डॉझेर :)
हा एक पॉवर ब्लेड टँक आहे याची निर्मिती लेयलंड मोटर्स.लिमिटेड ने केली आहे .१९४४ पर्यंत हा फ्रांस आर्मी मध्ये सेवारत होता .


व्हालेनटायीन ब्रिज लेयर :
दुसर्या विश्व युद्धात याचा वापर करण्यात आला, याला हायड्रोलिक पॉवरच्या मदतीने ३० फुटापर्यंतचा सक्षम ब्रिज निर्माण करण्यासाठी वापरात आणला गेला .याचे वजन ३० टन असून हा एकसंध ब्रिज बनवू शकत होता ,याच्या आतमध्ये ६ सिलेंडरच पॉवरफुल इंजिन वापरलेलं आहे.
पण याची निर्मिती प्रशिक्षण देण्याहेतू करण्यात आली होती .याचा वेग होता ताशी २४ कि.मी .


हे आहे शेड


ही आहे " जर्मन - ८८ फलॅग गन :


उरलेले फोटो अन माहिती क्रमश :
पुढील भागात अहमदनगर भुईकोट किल्ला अन फारीयाबाग :)
प्रतिक्रिया
30 Jan 2012 - 12:12 pm | प्रचेतस
सुंदर फोटो आणि सुरेख वर्णन.
नविन क्यामेरा घेतलास की काय?
30 Jan 2012 - 12:17 pm | सविता००१
सुरुवात तर जोरदार झालीये. मस्त लिखाण आणि फोटो.
30 Jan 2012 - 12:28 pm | मी-सौरभ
पियु,
सुपारी देते का?? १०० प्रतिसाद गाठून देतो...
30 Jan 2012 - 11:41 pm | शुचि
सौरभ डु-आय डी इतके आहेत तुमचे :ऑ? =))
31 Jan 2012 - 3:28 pm | मी-सौरभ
आमचा कंपू लै म्होटा है ;)
30 Jan 2012 - 12:42 pm | प्रास
अखेर पियुबैंनी अहमद नगरची माहिती देण्यास सुरूवात केली हे बघून गहिवरून आलंय.
धन्यवाद ओ पियुबै, आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल! :-)
फोटो छान आहेत (नवा कॅमेरा घेतलाय वाट्टं ;-))
वर्णन काहीसं तुटक वाटतंय आणि हिंदाळलेलंही. कदाचित नगरची मराठी, निजामशाही प्रभावामुळे, अशी झाली असावी. आता पियुबै त्यांच्या पुढच्या भागांमध्ये अहमद नगरच्या मराठीवरही प्रकाश टाकतील अशी आशा आहे.
बाकी क्वालिटी अॅश्युरंस करणार्या 'म्याक्यानिकल विंजिनेर' कडून ट्यांकांच्या आणि ब्रिज बनवणार्या गाड्यांच्या म्याक्यानिकल साईडीची चांगली माहिती मिळेल अशी आशा होती पण पियुबैंनी आपली म्याक्यानिकल मूठ झाकली ठेवली आहे असं खेदाने नमूद करावं लागत आहे.
पुलेशु आणि पुलेप्र
30 Jan 2012 - 2:52 pm | स्पा
आता पियुबै त्यांच्या पुढच्या भागांमध्ये अहमद नगरच्या मराठीवरही प्रकाश टाकतील अशी आशा आहे.
=))
=))
=))
=))
30 Jan 2012 - 12:59 pm | बिपिन कार्यकर्ते
एक नंबर. जोरदार टाळ्या.
पुढील लेखांची वाट बघतो आहे.
30 Jan 2012 - 1:27 pm | sneharani
सुरवातीलाच रणगाडे घेऊन आलीयेस होय????
बाकी फोटो मस्त, येऊ दे पुढचा भाग मस्त मस्त फोटोंसहित...!
:)
30 Jan 2012 - 1:59 pm | हंस
छान ओळख करुन दिलीत पियुशातै!
पुभाप्र.
30 Jan 2012 - 2:38 pm | प्रकाश१११
सुरेख फोटो.मस्त वर्णन.
माझ्या बालपणचे नगर. हे नगर मला खूप अपरिचित आता ..
लिहित रहा.
30 Jan 2012 - 2:44 pm | मुक्त विहारि
छान माहिती.....
धन्यवाद....
30 Jan 2012 - 2:48 pm | मनराव
छान माहिती........
पुलेशु......
30 Jan 2012 - 2:49 pm | किचेन
फोटू भारि आलेत ग!
30 Jan 2012 - 2:51 pm | शिल्पा ब
मस्त. पुढच्या लेखाची अन फोटोंची वाट बघत आहे.
30 Jan 2012 - 3:06 pm | प्रभाकर पेठकर
तुटक-तुटक माहितीच्या आधारेही संग्रहालयाची सफर उत्साहात पार पडली. अभिनंदन.
हेल्मेट आवश्यक आहे.
संपूर्ण चित्रमालीकेत 'हेल्मेट' शोधून दाखवा.
'सिव्हिलियन्स'चे आर्मी प्रेम आणि शिस्त पाहून मन भरून आले.
30 Jan 2012 - 3:12 pm | पियुशा
@पेठकर काका
लिहिण्यात मिष्टेक झाली आहे स्वारी ह !
२ व्हीलर असेल तर मेन - गेट जवळ हेल्मेट चेक करतात .
म्हणुन हेल्मेट आवश्यक आहे
30 Jan 2012 - 3:38 pm | स्पा
वा पियुषा .. मस्तच धागा..
जामच आवडला ब्वा आपल्याला
किती शुलेख माहिती दिलीस तू..
आपण तुझे जाहीर कौतुक करतो
संदर्भ : आमची खव :D
30 Jan 2012 - 3:53 pm | कपिलमुनी
२६ जानेवारीचा आधी सांगितला असतास तर आम्ही पण बघायला आलो असतो ना ..
(तिकडेच एक कट्टा / ट्रीप झाली असती)
30 Jan 2012 - 4:39 pm | सूड
अ.नगरसारख्या पर्यटनस्थळ म्हणून फार चर्चेत नसलेल्या शहराची/ गावाची माहिती करुन दिल्याबद्दल आभार.
30 Jan 2012 - 4:55 pm | दिपक
आमच्या जिल्ह्याची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. छायाचित्रे मस्तच. अजुन येउद्यात. :-)
मु.पो. तळेगाव-दिघे,
ता. संगमनेर
जी. नगर
30 Jan 2012 - 5:05 pm | ५० फक्त
धन्यवाद, पुढच्या वेळी जरा ओळखी काढुन एखाद्या रणगाड्यात बसायला मिळतंय का बघा, जाम मजा येते, एकदम मस्त अनुभव आहे तो.
फोटो मस्तच आलेत, शेडचा फोटो जाम भारी आला आहे. एवढ्या रणगाड्यांचा गर्दीत बाकी कुणाचं त्या बिचा-या शेड कडं लक्षही जात नसेल, तुम्ही काढलेल्या फोटो मुळं त्यांचं आयुष्य सार्थकी लागलं,
@ कपिलमुनी - ते राज्यघटना का काय ते आणि त्यातले ते कसलं कलम लागु आहे म्हणुन नाहीतर नगरचा कट्टा यावर एवढी चर्चा झालीय की त्यात एक दोन लोकपाल विधेयकं मंजुर झाली असती.. असो. तोफेच्या तोंडी देउन ठोकण्यात येईल अशी भिती असल्यानं काही बोलत नाही.
30 Jan 2012 - 5:08 pm | मी-सौरभ
क्रम चुकला वाट्टे ;) आधी ठोकून मग तोफेच्या तोंडी देणार अशी बोली होती ना??
30 Jan 2012 - 6:58 pm | ५० फक्त
काय हल्ली नक्की **** नगरशी संबंधित लोकं काय सांगतात काही लक्षात राहात नाही, जगबिडी येणार आहे ना ती पेटवाय्ची कशानं याचा विचार करतोय.
30 Jan 2012 - 5:37 pm | वपाडाव
चला, पाकृतुन भाइर पडून एक नवी जिलबी टाकण्यात बाइंना यश आलंय....
बाकी वरुन १६व्या अन खालुन ६ व्या फोटोत (लाल टी-शर्ट) लटकण्याच्या वयात लेख लिहिण्याएवढी प्रगती म्हणजे अफाटच नै का?
पुढला भाग थोड्या मोठ्या होउन टाका....
30 Jan 2012 - 11:44 pm | शुचि
हाहाहा ...... मस्त!!!! क्यूट आहे ती छोटी. तीच पियू आहे हे मला माहीत नव्हते. माहीतीबद्दल धन्यवाद वडापाव भाऊ.
31 Jan 2012 - 12:36 am | चिंतामणी
लाल टॉपवाली आहे. (तीने सफाईने चेहरा लपवला आहे).
ती कशावरून नाही????????
30 Jan 2012 - 7:15 pm | स्मिता.
माहिती आणि फोटू छान गं पियु!
हे सर्व रणगाडे भारतीय सैन्यात कधी वापरले गेले होते की फक्त संग्रह करून ठेवलेले आहेत?
31 Jan 2012 - 9:38 am | पियुशा
@ व.प्या.
मी माझे फोटु यातुन मुद्दाम वगळ्ले आहेत ;) उगा सगळ्याचे ड्वाले पाणावतील म्हणुन ;)
@स्मिता
हो हयातले काही रणगाडे युद्धात वापरलेले आहेत , काही रणगाड्याची आतली स्थिती एकदम खराब आहे म्हणजे तुट्लेले एक्सेल ,खराब इन्जिन वैगेरे वैगेरे सर्व मेक. पार्टस गन्जलेले आहेत . काही रणगाडे अजुनही सुस्थितित आहे ,अन महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विषेश परवानगी घेतलीत तर तुम्हाला रणगाडा सफरिचा चान्स सुद्धा मिळ्तो येथे ;) ऑस्संम आहे हे म्युझिअम :)
@ निले ,धाग्यावर दिलेल्या माहीतीमद्द्ल धन्स :)
@ ५० फक्त ,का नगरकरावर एव्हढ गाल फुगवुन बसलेले आहात :)
@ मराठे साहेब हे म्युझिअम Armoured कॉर्प center च्या अखत्यारित येत आहे सेफ्टी रिझन आहेत त्यामुळे
बाकी तुम्हाला जर हे ईतरवेळी पहायचच असेल तर एखाद्या वरिष्ठ ऑफिसरच्या परवानगीने तुम्ही पाहु शकता :)
30 Jan 2012 - 7:22 pm | पाषाणभेद
फारच छान माहीती.
30 Jan 2012 - 10:43 pm | जाई.
छान माहिती दिलीस ग पियुशा
पुलेशु
30 Jan 2012 - 10:57 pm | Nile
नगर मध्ये टँक म्युझियम का आहे हा प्रश्न अजून कोणाला पडला नाही?
एकेकाळी (बहुतेक अजूनही) नगर हे एकमेव टँक रिपेअर अँड रिबिल्डिंग स्टेशन होतं, आख्ख्या भारतात. म्हणून युद्धात पकडलेले टँक्स सीमेवरून नगरला आणले जात. डीआरडीओची महत्त्वाची लॅब व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट नगरला आहे. तिथे मिलीटरीचे मोठाले ट्रक्स, टॅंक्स यांच्या चाचण्या घेतल्या जातात. आमचे विखेपाटील अवजड उद्योग मंत्री होते (बहुतेक) तेव्हा त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून ही सुविधा अद्ययावत करून घेतली होती.
31 Jan 2012 - 12:58 am | शिल्पा ब
नुसतं एवढंच नाही तर नगरमधे मिलीटरीचा मोठा तळसुद्धा आहे.
31 Jan 2012 - 3:16 am | शुचि
अगदी हाच प्रश्न विचारण्याकरता आले होते तेवढ्यात ;)
30 Jan 2012 - 11:01 pm | रेवती
फोटो, माहिती आवडली.
30 Jan 2012 - 11:11 pm | मराठे
इतकं चांगलं म्युझियम आणि फक्त दोनच दिवस उघडं असतं? छ्या: काय तुमचं अ.नगर!!!!!
चला पळा झाडावर!
:bigsmile:
31 Jan 2012 - 3:14 pm | सुहास..
मस्त आणि झकास !!
च्यायला, त्या दिवशी ' संगम' ला बसलो होतो तर एक बी वेटर धड सांगेना की नगर मध्ये बघण्यासारखं काय आहे ते ;)
31 Jan 2012 - 5:08 pm | वपाडाव
मग बेट्या, पिवशीला फोन नै का करायचा... तिनं तुला सफर घडवुन आणली असती की...
31 Jan 2012 - 5:39 pm | प्यारे१
त्यानं विचार केला असेल - जर न बसता तुम्ही स्थळदर्शनाला गेले तर त्याची टीप बुडेल. ;)
31 Jan 2012 - 3:38 pm | सुनिल पाटकर
फारच छान माहिती.फोटो मस्तच.
31 Jan 2012 - 3:44 pm | Maharani
सुरेख वर्णन अन फोटो पण!!
13 Aug 2012 - 1:35 pm | कपिलमुनी
कॅव्हलरी टँक म्युझिअम फकत १५ ऑगस्ट अन २६ जाने. लाच नागरिकासाठी खुले असते ...
संधीचा फायदा घ्या
13 Aug 2012 - 8:15 pm | अत्रुप्त आत्मा
हा धागा र्हायलाच होता बघायचा(थँक्स टू कपिलमुनी).... लै मस्त लिवलय,आणी फोटू पण भारी आहेत गं पियुशा. :)
मी नगरला पाठशाळेत असताना, सुट्टीच्या दिवशी आंम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इथे एक निवांत सफर आयोजित केली गेली होती...फोटो बघताना ते सगळं अठवलं. :)
13 Aug 2012 - 8:27 pm | मन१
ई . स . वी सन १४९४ मध्ये मुघल बादशाह अहमदशहा यांनी अहमदनगर शहराची स्थापना केली .
बाबर ते औरंगजेब ह्यातील कुठल्याही मुघल बादशहाचं नाव अहमदशहा नव्हतं माझ्या माहितीत.
नगर ची स्थापना निजामशाही राजवटीने केली; मुघलांनी नाही. निजामशाही म्हणजे मलिक अंबर, चांदबिबी ही दिग्गज नावे जिथे सापडतात, ते इतिहासाचं पान. आधी शहाजी राजे ह्यांच्याच दरबारी होते.
लेख चांगला. अधिकचे फुरसतीत टंकतो.
9 Jan 2015 - 12:48 pm | कपिलमुनी
२६ जानेवारी जवळ येत आहे
9 Jan 2015 - 7:44 pm | अत्रुप्त आत्मा
++++११११
जिल्बुचा...........................
कुटं ग्येली??????????????? :-/