शरपंजरी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
25 Jan 2012 - 10:16 am

ओढाळ स्मिताची रेष रेशमी फुलली
रचना हुरहुरली; काहुर गुंता; दृष्ट जाहली ओली
रज्जूंस पावली ऊर्जा मेघांमधली
दाटून श्वासभर अक्षत अंकित झाली

हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे
पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे
राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या
पापणीबंद सार्‍याच छ्टा प्रतिमेच्या

मग वाट पहाणे आठवणे गत उरले
नुरले भवताल; लयींवर; भुलले अंबर-झूले
एकांत झुरे भेटीसाठी लक्षण हे नच भवभोळे
पंजरी शरांच्या; भीष्म; स्मृती हळवेले

.........................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jan 2012 - 11:10 am | मिसळलेला काव्यप्रेमी

हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे
पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे
राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या
पापणीबंद सार्‍याच छ्टा प्रतिमेच्या

अफाट!!

प्रशांत उदय मनोहर's picture

25 Jan 2012 - 2:44 pm | प्रशांत उदय मनोहर

"काहुर गुंता" सोडलं तर अगदी छंदबद्ध झालीये कविता.

पण "काहुर गुंता" तसंच ठेवून लयीमध्येही चमत्कृती निर्माण होत असल्यामुळे छान वाटतंय.

पु.क.ले.शु.

चैतन्य दीक्षित's picture

3 Feb 2012 - 3:57 pm | चैतन्य दीक्षित

लयीतल्या चमत्कृतीबद्दल सहमत.
छान कविता.

छान !

प्रत्येक कडव्यातील दूसरी ओळ जास्त आवडल्या गेली आहे..