रेखीव

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
23 Jan 2012 - 12:18 pm

घडे काय हे; ना कळे योजना ही
उभा ज्येष्ठ रावा; कुणी हाक मारी
मिळे कोपर्‍याला नव्याने उभारी
उधाणून ऊर्मी उमलली दुपारी

गाभ्या तळाशी किती रत्नराशी
लयधुंद वलये तरीही उराशी
अंगी दुरावा कसा हा म्हणावा
रेखे कुणी पापणी-आत नक्षी

स्मिताची कळी अंगणी अंग जाळी
नयनी खुळी ओढ नवती निराळी
अव्हेरू कसे आवरू वा कसे
गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी

.....................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2012 - 12:33 pm | अत्रुप्त आत्मा

अव्हेरू कसे आवरू वा कसे
गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी>>> व्वा व्वा व्वा....
एक परिपूर्ण काव्यानुभव...दिल खुष हो गया

विनायक प्रभू's picture

23 Jan 2012 - 5:07 pm | विनायक प्रभू

कविता

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Jan 2012 - 5:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

स्मिताची कळी अंगणी अंग जाळी
नयनी खुळी ओढ नवती निराळी
अव्हेरू कसे आवरू वा कसे
गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी

सुंदर! आणि रेखिव!!

गणेशा's picture

23 Jan 2012 - 11:58 pm | गणेशा

गाभ्या तळाशी किती रत्नराशी
लयधुंद वलये तरीही उराशी
अंगी दुरावा कसा हा म्हणावा
रेखे कुणी पापणी-आत नक्षी

मनाच्या खोल सागरासम वर्णन वाटले .. मनापासुन आवडले..

अप्रतिम ..

तरीही 'गाभ्या' आणि 'नवती' हे नविन शब्द दिसले.. अ‍ॅक्युरेट अर्थ माहित नाही..

गाभ्या म्हणजे गाभार्‍याच्या आणि नवती म्हणजे नवी असे आहे का ?

इन्दुसुता's picture

24 Jan 2012 - 8:56 am | इन्दुसुता

फारच छान.. आवडली. नेहमीप्रमाणेच....