आज पहाटेच आलो शहरात तुझ्या
वादळाच्या तडाख्यातून सुटलेल्या होडीसारखा
तुला कळलं नसेल..
पण तुझ्या शहरातील फुलांनाही
कळलं माझं येणं,
आनंदाने फुलले सारेच मनमोकळे
गत काळातील आठवाणींना उजाळा
द्यायची नाही ईच्छा माझी
आज मी काहीहि मागणार नाही
मागताच आलं नाही मला,तुला
तुझ्या सर्व भावनांसह,
तू उत्तराची बघत राहिलीस वाट
मीच निघालो भित्रा नि नेभळट
परीणयाच्या दिवशी नव्हतो मी, पण नक्की
सूत्रात बंधतांना असेनं मी मनीं तुझ्या
तुझ्या जीवन वेलीवर फुललं असेल फुल
सुंदर, निरागस, निखळ, सुकोमल
तरी तुला भेटावसं वाटतं एकदाच तुझ्या फुलासह
करू नकोस माफ मला पण दे एकच दान
मुक्त व्हाया ऋणातून ..
नि मग मी निघेन मोकळ्या मनाने
परत झेलावयास तडाखा वादळाचा
परत न येण्याच्या अटीवर......
प्रतिक्रिया
23 Jan 2012 - 4:24 pm | विनायक प्रभू
मुक्तक
24 Jan 2012 - 8:58 am | इन्दुसुता
मुक्तक आवडले.