" यक्ष प्रश्न "

रघु सावंत's picture
रघु सावंत in जे न देखे रवी...
21 Jan 2012 - 10:40 pm

" यक्ष प्रश्न "
अश्याच एका सुंदर संध्याकाळी
एकटाच होतो पण तू नव्हतीस
तुझ्या आठवणींची एक एक गाठ
उसवत चाललो होतो एकटाच
पाखरं आपल्या घराकडे येत होती
वाराही गारवा देत जात होता पुर्वीसारखाच
मनात तुझ्या आठवनींच काहुर पण दैव
या आठवनींना एकटेपणाची झालर
रोजच्या वळणावरच होतो मी उभा
झपकन तुझी मुर्ती उभी राहीली समोर
उद्या बघायला येणारेत मला तू विसरुन जा
मला हा शब्द डाव्यातला कि उजव्यातला
बघायला येणारेत मला कि मला तू विसरुन जा
उत्साह कि विरहदर्शक अर्थ- एकच विचार
अग विसरायच सोड तो माझा प्रश्न आहे
पण हे तू उच्चारू शकलीस याचच मला गमक
अंगावरच वस्त्र उतरवावं उच्चारलास एकदम तसाच
बाकी कस काय बुवा जमतं तुम्हा मुलींना
झटक्यात भानावर आणी झटक्यात नशेत
आठवतो तुझी हिंम्मत दोन दोन घोट घेत
बाकी मि अश्याच एका संध्याकाळची बघतोय वाट
सगळ्या गाठी उसवून करावी नवी सुरवात

----- रघु सावंत

शांतरसकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Jan 2012 - 11:26 am | पैसा

यक्ष प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं की!