झुरळे !!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
18 Jan 2012 - 5:51 pm

कशी कुणास ठाऊक
कोठून उगवते ही झुरळांची जमात
कशी कोठे दडून बसते फटीत
बाथरूममध्ये ....
किचनच्या बेसिन खाली
मध्यरात्री कधी उठलो तर दिसतात मस्त मजेने
फिरत असतात इतस्तत:
दिवां लागताच तुरुतुरु पळतात
अदृश्य होऊन जातात
भयंकर किळसवाणे वाटते त्याना बघतांना

झुरळे असतात बारीक
झुरळे असतात ढब्बू
डौलदार ...बेढब
झुरळे असतात चीनी माणसाच्या मिशी सारखी
धीर गंभीर विचारवंत
योग्या सारखी ध्यान लावून बसलेली

किती नष्ट केली
नष्ट झाली असे वाटले तरी
ती उगवतात फिनिक्स पक्ष्या सारखी
राखेतून उभी राहतात
जिद्दीने .....!

पायाने ठेचले की फट असा आवाज येतो
नि ही मरून जातात
मी पाहिलंय मुंग्यांनी त्याचा देह फरफटताना
अगडबंब देह ओढून नेताना

कधी कधी चपलेने ठेचले तरी ती जिवंत असतात
पार ठेचली तरी क्षणभरात ती तुरुतुरु पळायला लागतात
ट्युगोन टाकून त्याना नष्ट करण्याचा प्रयत्न करा
जमात संपली असे वाटत राहते
नि मन शांत होते
नि अचानक एके रात्री परत
झुरळे कोपर्यात फिरताना दिसतात
कोठून उगवते ही झुरळाची जमात
मी हताश होऊन बघत बसतो
हे झुरळाचे फिरणे
तुरुतुरुने
ती आपल्या दोन लांब मिशा उभारून
बघत बसतात
विजयी मुद्रेने
नि मी हताशपणे बघत बसतो
त्यांचे विजयी चेहरे ....!!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jan 2012 - 5:54 pm | परिकथेतील राजकुमार

भारी जमली आहे बॉ झुरळावली.

बाकी 'झुरळाच्या' जागी फक्त 'कंपूबाज' शब्द टाकला, तर ही कविता 'संपादकाची व्यथा' म्हणून देखील खपेल. ;)

मस्त कविता !

बाकी झुरळांना ही झुरळांचाच त्रास होत असेल नाहि ?

उदय के'सागर's picture

18 Jan 2012 - 6:41 pm | उदय के'सागर

अगदी खरं! झुरळांच घरतलं असतित्व आणि त्रास हा अगदी असाच असतो.

(सल्ला : "हर्बल पेस्ट कंट्रोल" करा... सगळे झुरळ पळुन जातिल. मी केलय आणि पेस्ट कंट्रोल वाल्यांनी ६ महिन्याची गॅरंटी दिली पण अता १+ वर्ष झालय तरीहि घरात एकही झुरळ नाहि [touch-wood] ...:P )

ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई

५० फक्त's picture

19 Jan 2012 - 9:54 am | ५० फक्त

झुरळांना बायकाच काय पण झुरळांवरच्या कवितेला स्त्री आयडी देखील घाबरतात वाट्टं.