पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in कलादालन
16 Jan 2012 - 4:16 am

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

sarasgadh pali maharashtra
सुरूवातीची चढण

sarasgadh pali maharashtra

सरसगड किल्यावर येथे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक-गावाच्या पुर्वेकडून व दुसरा पश्चिमेकडून. पुर्वेकडचा मार्ग थोडा सोपा आहे. पश्चिमेकडचा मार्ग बल्लाळेश्वर देवस्थानाच्या मागील बाजूने जातो. आम्ही पश्चिमेकडून गेलो होतो. सुरूवातीची चढाई केल्यानंतर मोठे पठार लागते. तेथून सरसगड असा दिसतो.

sarasgadh pali maharashtra
यावेळी पावसाळ्यानंतर लगेचच गेलो होतो त्यामुळे गवत खुप वाढलेले होते. मला याची अपेक्षा नव्हती. एकतर लहान मुले अन त्यात जनावरांची भिती. त्यामुळे त्यांना आरडाओरड करत व पाय आपटत चालण्यास सांगितले होते. पुन्हा मागे सरसगड दिसतो आहे. (मुले फ्रेममध्ये सतत येत असल्याने कुणाचा रसभंग होत असेल तर क्षमस्व.)

sarasgadh pali maharashtra
विस्तीर्ण पठारावर

sarasgadh pali maharashtra
येथे थोडी झाडी आहे.

sarasgadh pali maharashtra
उंच वाढलेले गवत

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra
पाली (ता. सुधागड) गाव. पाली हे रायगड जिल्ह्यातले तालूक्याचे गाव आहे. जरी सरकारी अंमलबजावणीसाठी याला सुधागड तालूका म्हणतात, पण पाली येथील किल्याचे नाव सरसगड असे आहे. प्रत्यक्षात सुधागड हा वेगळा किल्ला येथून सुमारे दहा किलोमिटर दुर आहे.

sarasgadh pali maharashtra
येथे थोडीशी खडकाळ चढण आहे. येथून उतरतांना मात्र बसून उतरावे लागते.

sarasgadh pali maharashtra
वरील चढाई संपल्यानंतर हा एक टोकाचा भाग आहे. खाली अगदी सरळ उतरण आहे. येथील ग. बा. वडेर शाळेतील मुले शालेय स्पर्धेदरम्यान मात्र येथूनच वरती येतात. त्यांना येथे येण्यासाठी अगदी अर्धा तास लागतो.

sarasgadh pali maharashtra
याच्याच थोडे वर ही एक चौकोनी गुहा आहे.

sarasgadh pali maharashtra
गुहा

sarasgadh pali maharashtra
पुर्वी येथे शिवाजी महाराजांचे शिपाई बसत असावेत. आता हि मुले बसलेली!

sarasgadh pali maharashtra
येथून वरती जाण्यासाठी पायर्‍या खोदलेल्या आहेत.

sarasgadh pali maharashtra
क्षणभर विश्रांती...

sarasgadh pali maharashtra
पहिला दरवाजा

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra
येथील गवताची उंची थोडी अधिक होती. येथूनच बुरूज चालू होतो.

sarasgadh pali maharashtra
किल्यावर जाण्याचे तिन टप्पे आहेत. हा दुसरा टप्पा.

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra
हे गवत पुरूषभर उंचीचे व अंग कापणारे होते. अद्याप किल्यावर वर्दळही नसल्याने पायवाटही तयार झालेली नव्हती.
थोडी काळजी घेत, पाय आपटत, मोठे आवाज काढत येथून मार्ग काढला.

sarasgadh pali maharashtra
राहण्यासाठी खोदलेल्या गुहा

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra
प्रशस्त खडक. याच्याच मागे दोन पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यालायक व थंडगार असते. पुर्वेकडचा व पश्चिमेकडचा मार्ग येथे एकत्र येतात. येथे बरोबर आणलेला थोडफार खाऊ खाल्ला.

येथून वरती जाण्यासाठी सरसोट चढाई करावी लागते. लहान मुले असल्याने त्यांना मी खालीच सांभाळले. वरती एक शंकराचे मंदीर आहे. तेथे केवळ शुभम जावून आला. येथे कॅमेरॅची बॅटरी संपली असल्याने पुढील फोटो काढता आले नाहीत.

उतरतांना आर्या एक दोन ठिकाणी व मी सुध्दा एके ठिकाणी उतरणीवरच्या गवतावरून पाय सरकून घसरलो. खाली येतांना फारसा वेळ लागला नाही. आल्यानंतर सुरूवातीच्या चढाईच्या ठिकाणी चंद्रपुर येथून आलेले एक दहा बारा जणांचे कुटुंब भेटले. त्यात चार एक महिला, पाच मुले व एक पुरूष होते. त्यांचे कडे पाणी नसल्याने आमच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी संपवल्या. पुढे किती चढाई आहे याची विचारपुस झाली. नंतर आम्ही खाली उतरून देवूळवाड्यात शिरलो. (बल्लाळेश्वर देवळाच्या मागील भागास देवूळवाडा म्हणतात.) मुले दमलेली नसल्याने टणाटण उड्या मारतच घरी आली.

जरी किल्यावरची चढाई सोपी असली तरी मुलांना मजा देवून गेली.

प्रवासभूगोलछायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Jan 2012 - 9:04 am | प्रचेतस

मस्त हो पाभे. मजा केलीत राव.
फोटो आणि वर्णनही सुरेख.

सरसगड हा सातवाहनकालीन किल्ला. खडकात खोदलेल्या गुहा, खोदीव पाण्याची टाकी, खडकात खोदलेल्या पायर्‍या हे त्याचे प्राचीनत्व सहजी सिद्ध करतात. शिवाय सातवाहनकालच्या व्यापारी मार्गावर बांधलेला हा किल्ला. पायथ्याला सुधागड, सरसगड ही फळी तिथून घाटमाथ्यावर पोहोचणार्‍या प्राचीन वाघजाई, नाणदांड, तैलबैला ह्या घाटवाटा व घाटमाथ्यावर घनगड, कोरीगड हे संऱक्षक दुर्ग. घाटवाटेनजीक ठाण्याळ्याची दुर्गम लेणी आहेतच.

मन१'s picture

16 Jan 2012 - 9:16 am | मन१

टंकण्याचे कष्ट वाचवलेत.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2012 - 9:13 am | अत्रुप्त आत्मा

व्वाहवा पा.भे.छान सफर घडवलीत...
बाकी पोरांचे फोटो झ्याक आलेत हां एकदम... :-)

पाभे, फोटो मस्त आलेत एकदम आणि पोरं फोटोत आल्यानं रसभंग नाही होतंय उलट सगळं कसं जास्त जिवंत वाटतंय..

मोदक's picture

16 Jan 2012 - 9:57 am | मोदक

+१ सहमत.

धन्या's picture

16 Jan 2012 - 10:07 am | धन्या

मस्त वर्णन !!!

गडावरील शंकराचे मंदीर खुप छान आहे. खरं तर ते एक देवस्थान आहे. म्हणजे मंदीराला छप्पर आणि भींती नाहीत. परंतू खुप प्रसन्न वाटते गाभारासदृश्य जागेमध्ये.

किसन शिंदे's picture

16 Jan 2012 - 10:34 am | किसन शिंदे

फोटो आणी वर्णन दोन्ही मस्तच.! प्रत्येक फ्रेम या छोट्या मावळ्यांमुळे जिवंत झालेली दिसतेय.

प्रास's picture

16 Jan 2012 - 11:02 am | प्रास

धमाल एस्कर्शन!
निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी कोणतीही भटकंती एस्कर्शनच्या तोडीचीच असते.
फोटो मस्तच!
फोटोत लहान मुलांच्या अतिक्रमणाने कुणाचा रसभंग होत असेल तर त्यास छायाचित्रणातला 'औरंगजेब' अशी पदवी पुरेशा मानहानीपूर्वक देण्यात यावी, अशी मी या ठिकाणी मागणी करून ठेवतो.
धन्यवाद!

पियुशा's picture

16 Jan 2012 - 11:49 am | पियुशा

मस्त आवडेश :)

मदनबाण's picture

16 Jan 2012 - 6:09 pm | मदनबाण

मस्त... :)

अप्रतिम ...
फोटॉ तर खुप छान !

मस्त वाटला तुमचा ट्रेक ..

स्वतन्त्र's picture

16 Jan 2012 - 8:30 pm | स्वतन्त्र

पोरांचे फोटो झकासस्स्सस्स्स !!!!
मुलांएवढे असतानाच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल आभारी आहोत !

बज्जु's picture

17 Jan 2012 - 12:13 am | बज्जु

"सरस" गड केलात राव.

सरसगडाची काही वर्षांपुर्वीची एक गमतीदार आठवण.

आमच्या संस्थेचा (निसर्ग गीरीभ्रमण संस्था) हा ट्रेक ठरला होता. भेटण्याची वेळ दिवा स्टेशनला सं.६.३० वा. ची होती, पण काही गैरसमजुतीने म्हणा किंवा अतीऊत्साहाने म्हणा मला वाटलं सकाळी ६.३० ला भेटायच आहे. मी दिवा स्टेशनला सकाळी ६.३० ला हजर, सवंगडी कोणीच दिसेनात, दिवा-रत्नागिरी गाडी नेहमीप्रमाणेच भरलेली होती. मला वाट्लं गाडीत बसले असतील, नागोठण्याला भेटतीलच. कसलं काय. म्ह्टलं आपल्या आधीच्या गाडीने गेले असतील, पालीला किंवा गडावर भेटतील. तडक नागोठण्याहुन एस.टी. पकड्ली, पालीला आलो, देवळाच्या मागुन कुठूनतरी गडावर वाट जाते एवढीच माहीती होती, विचारत विचारत एकदाचा गडावर पोहोचलो. सबंध गडावर मी एकटाच, नाही म्हणायला माझ्याबरोबर एक कुत्र आलं होतं, म्हणजे गडावर कुत्रही न्हवतं अस म्हणायलाही मला त्याने जागा ठेवली नाही. म्ह्टल त्यांची गाडी चुकली असेल, संध्याकाळ पर्यंत येतीलच. म्हणुन वरतीच मुक्काम करायचं ठरवलं, शंकर भगवान होतेच सोबतीला, दुस-या दिवशी सकाळी मी खाली ऊतरलो, देवळाजवळ्च्या एका हॉटेलात खात बसलो होतो, तर माझ्यासमोरुन आमचा ग्रुप चाललेला, त्यांना हाका मारल्या, एकमेकांची विचारपुस (?) करुन झाली, आणि त्यांच्या बरोबर परत गडावर गेलो. पण सह्याद्रीतल्या कुठल्या ना कुठल्या गडावर एकट्याने रात्र काढायचा अनुभव मात्र हा सरसगड देऊन गेला.

गणेशा's picture

17 Jan 2012 - 9:06 pm | गणेशा

भारी च...............................................

शिल्पा ब's picture

18 Jan 2012 - 11:20 am | शिल्पा ब

हे भारीच!!

पाभेचा लेख अन चित्र दोन्ही छान. पोरगी गोड आहे.

रवि पवार's picture

7 Mar 2015 - 2:28 pm | रवि पवार

मस्त