आला दिवस गेला दिवस ...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
9 Jan 2012 - 8:29 am

आला दिवस गेला दिवस
कसा दिवस निघून जातो
घरी बसलो म्हणून
दिवस काही थांबत नसतो
एके दिवशी म्हणालो त्याला
थांब जरासा
थोड्याशा गप्पा मारू
जरा माझे-तुझे जुने दिवस
आठवीत बसू

हलकेच म्हणालो त्याला
तिच्यावर माझे प्रेम होते
हे तुला माहित होते
तुझे सगळे भन्नाट होते
माझे मन झुलत होते
ती तर बोलूच नको
काळजाचे गाणे होते

हसला दिवस
लाजला थोडासां
अरे थांबरे जरासा
कटाळलास कारे बाबा ..?
तिला आठवताना किती बरे वाटते
तिला आठवताना शप्पत
तुझी आठवण मात्र नक्की असते

उदासला दिवस
हलकेच निघाला
म्हणालो
जरा फ्रेश होण्यासाठी
तुझ्यासाठी चहां टाकतो
मग जराश्या गप्पा मारू
जरा जुने दिवस आठवीत बसू

त्याला थांब म्हणून
तो थांबत नाही
त्याला काही उपाय नाही
सूर्य मालक नि तो घोडा आहे
थांबणे त्याच्या हातात नाही
लगाम त्याचा पक्का आहे
आला दिवस गेला दिवस
कसा दिवस निघून जातो
घरी बसलो म्हणून
दिवस काही थांबत नसतो

मी अगदी उदास होतो
मला बाय बाय करून
काळोखाचा पडदा ओढून घेतो
दिवस येतो दिवस जातो
माझ्यातला मी
थोडा थोडा घेऊन जातो ....!!

करुणकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2012 - 12:48 pm | अत्रुप्त आत्मा

छान आहे... :-)
वाचताना सारखी अशोक सराफ यांच्या "एक उनाड दिवस" या शिनुमाची अठवण होत होती. :-]