1

तुम्ही पी एम बनणारच ..

Primary tabs

ajay wankhede's picture
ajay wankhede in जे न देखे रवी...
9 Jan 2012 - 6:29 am

एकदा आमचे युवराज वदून गेलेत
.......त्याला कोणीही रोखू शकणार नाही
तेव्हा आम्हा झाला साक्षात्कार
खरेच.....
चोऱ्या, दरोडे, खून, बलत्कार, जुगार
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही.
भेसळ, साठेबाजी, नफेखोरी, कर बुडविणे
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही.
भ्रष्टाचार, स्वीस बँकेतील काळा पैसा,
पैसे, दारू वाटून निवडून येणे
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही
गावात अमंळ लोड शेडींग
कचरा, घाण,रस्त्याचे कडे वरील ....विधी
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही
शहरात चार दिवसाआड पाणी, पुतळ्यांची गर्दी
रस्त्यांवरील खड्डे,....निष्पापांचे बेदर्दी मरण
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही
साखर कारखाने मोडीत निघे पर्यंत
चीपाडांचे हि गाळप.....
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही
आणि हो युवराजा जो जन्माला आला
तो मरणारच .........
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही
धन्य तुम्ही, सत्याची जाण करून दिलीत
नक्कीच
तुम्ही पी. एम. बनणारच
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही

--------------------------------------------------------------------------------
''उन्ही से हमे जबरन
मुस्करा के मिलना पडता है,
हमारी कत्ल की साजिश मे
जिनके दिन गजरते है.''

भयानकबिभत्सविडंबन

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

9 Jan 2012 - 10:05 am | प्रभाकर पेठकर

''उन्ही से हमे जबरन
मुस्करा के मिलना पडता है,
हमारी कत्ल की साजिश मे
जिनके दिन गुजरते है.''

ह्या ओळी जास्त प्रभावी वाटल्या.