बाई माझी, ही तंगडी मोडली

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
7 Jan 2012 - 10:56 pm

(चाल: बाई माझी, करंगळी मोडली)

ऐन दुपारी, नमुना फेरी,
गाडी नवी काढली - काढली
बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ ||

झणी मारून मी कट वळताना
कुठून अचानक आला श्वान हा
गुपचुप येऊन, पाठीमागून
माझी साडी ओढली || बाई माझी ...

समोर भुंके कसा आडवा
पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा
मी ओरडले, तिथेच पडले,
उठताना मोडली || बाई माझी ...

विडंबन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2012 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा

बरच छान जमलय.. :-)

पैसा's picture

8 Jan 2012 - 1:52 pm | पैसा

चाफा यांच्या कथेची आठवण झाली. फक्त "कुठून अचानक आला श्वान हा" इथे 'हा'जास्त झालाय. 'श्वान हा' च्या ऐवजी कोंकणी 'सूणा' नाहीतर 'श्वाना' चालतोय का बघा! ;)