तोच थंडगार भात

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
27 Dec 2011 - 11:13 pm

(चाल : तोच चन्द्रमा नभात )

तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी
एकांती मजसमीप तीच भीति का मनीं !

खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे
पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे
भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी !

सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ?
ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !

त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !

( पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)

करुणविडंबन

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 11:59 pm | आत्मशून्य

.

प्रभाकर पेठकर's picture

28 Dec 2011 - 1:18 am | प्रभाकर पेठकर

मस्त आहे कविता. आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2011 - 8:27 am | अत्रुप्त आत्मा

कडवं नी कडवं तुमी गोड केलं बगा विदेसराव....!
लै भारि.
लै भारि.
लै भारि. :-)

पक पक पक's picture

28 Dec 2011 - 8:35 am | पक पक पक

त्या बॅचलर लोकांच अंतःकरण उलगडुन दाखवलत आज, वा ! वा!! जुने दिवस आठ्वले...मजा आली.

विदेश राव धन्यवाद..

अन्या दातार's picture

28 Dec 2011 - 9:42 am | अन्या दातार

Mess is always a mess

असे मी नेहमीच वर्णन करत असतो. तुम्ही आज ते काव्यातून मांडलेत. धन्यवाद. :)

मीटरात बसतंय की मस्त..

आवडले.

सर्वसाक्षी's picture

28 Dec 2011 - 10:16 am | सर्वसाक्षी

झकास विडंबन.

<पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे> हे विशेष आवडले. अनेकदा पोळ्या करणार्‍या बायांनाही हा रोग लागतो खरा.

विदेशराव,

खूपच झक्कास विडंबन. शब्द न् शब्द चातुर्याने योजलेला आहे आणि छंद अतीव चपखल बसवला आहे.

त्या पहिल्या आम्टीच्या आज लोपल्या खुणा
डाळ ह्या जलात व्यर्थ मूढ शोधतो पुन्हा
नीट ये न ते कळून भंगल्या भुकेतुनी !

हे विशेष आवडलेले आहे. यातल्या प्रत्येक ओळीतून त्या काळच्या मनातलं कारुण्य ओथंबून वाहत आहे.

आपण तुमच्या कवितांचे फ्यान आहोतच हे वे. सां. न.

तुम्हाला पोळी नेहमीच करपलेली किंवा कच्चीच गिळावी लागते काय ?
आमटीची फ़ोडणी जळालेली असते का ?
भाजी ची फ़ोडणी ही कुबट वाटते का ?
तर मग वेळ का दवडता ? आता आसवे गाळणे थांबवा
गणपाशेफ़ ऑनलाईन क्लासेस येथे त्वरित संपर्क साधा
http://kha-re-kha.blogspot.com/ ;-)

सूड's picture

28 Dec 2011 - 12:20 pm | सूड

मस्तच केलंय !!
सैंपाकी अज्ञातवासात काही आठवडे अशा सैंपाकाची टेस्ट घेतल्या गेली आहे. :D

पैसा's picture

28 Dec 2011 - 6:51 pm | पैसा

अगदी चपखल शब्द योजना आणि मात्रा न मात्रा बरोब्बर!

मदनबाण's picture

28 Dec 2011 - 8:37 pm | मदनबाण

:)

पार्टनर's picture

28 Dec 2011 - 11:29 pm | पार्टनर

लाजवाब, चवदार विडंबन !

-पार्टनर