५१) मद्रास कारपेट / मशिपत्री
५२) कुयली
५३) शेरल
५४) रुई
५५) धामण
५६) पळस
५७) वनई/निगडी
५८) उक्षी
५९) भांबुर्डा/भामेड्डा/गंगोत्र
६०) गुलाबी सोनकुसुम
६१) लाजाळू /Touch me not
६२) नोनी
६३) पर्णगुंफी
६४) सोनेरीला
६५) तांबा/Common Leucas
66) कळलावी/नागदौणा/ Glory Lily
६७) Iberian Star Thistle
६८) कांडोळ
६९) पिवळी घाणेरी
७०) उंदीरमारी
प्रतिक्रिया
16 Dec 2011 - 1:14 pm | गणपा
धन्य आहेस.
बरीच नवी रान फुलं पहायला मिळाली.
लाजाळूचं फुलही पहिल्यांदाच पाहील. (हल्ली लाजाळूचं झाडं दिसेनासं झालय.)
16 Dec 2011 - 3:33 pm | प्यारे१
>>>>(हल्ली लाजाळूचं झाडं दिसेनासं झालय.)
हळूवारपणा असावा लागतो गणपा त्याला. ;)
फुलं मस्तच.
-प्यारे 'फूल'. ;)
16 Dec 2011 - 1:28 pm | प्रचेतस
मस्त मस्त मस्त.
16 Dec 2011 - 1:37 pm | जाई.
सुंदर
फोटो मस्तच आलेत जागुतै
उंदीरमारी ,कळलावी वगैरे नाव वाचून मजा वाटली
16 Dec 2011 - 2:29 pm | स्वैर परी
जागु ताई, मला न तुमचा फार्फार हेवा वाटतो! :) हि तुमच्या माहेरच्या बागेतली फुले आहेत का??
16 Dec 2011 - 2:31 pm | इरसाल
ढयान ट ढयान......................
पुन्हा एकदा.......
अतिशय आवडले.पिवळा रंग घाणेरीचा काय सही आहे !!!!
16 Dec 2011 - 3:12 pm | जागु
गणपा, वल्ली, जाई, इरसाल धन्यवाद.
परी ती फुले मी जिथे कुठे जाईन तिथे कॅमेर्यात टिपली आहेत. त्यात माहेर-सासर-कोकण अशी ठिकाणे आहेत.
16 Dec 2011 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा व्वा जागु ताई...खुप मजा आली फुलं पहातांना...काही नावं सुद्धा किती मजेशीर आहेत...मला एका वेळी एकाच जागी ही सगळी फुलं मिळाली ना,तर रांगोळी काढायला काय बहार येइल..!
रानात जाउनी मी
होइन या फुलांचा
सहवास देवतांच्या
बागेतल्या मुलांचा...
किती रंगरुप त्यांचे
व्हावे मनात गोळा
भरगच्च रानराइ
वाटे ही सांब भोळा
मी एकटाच त्यांची
बांधेन देवळेही
परि मुळ तत्व त्यांचे
आहेच देवळे-ही
राना मधेच देव
मानायचाच झाला
रानामधुन फुलता
तो रान रान झाला
त्याचीच रूपकेही
त्याने प्रतीत केली
आंम्ही खुळ्या जनांनी
भक्तीत सोय केली
सारे अखेर त्याचे
त्याचेच फक्त आहे
मी कोणता स्वयंभू...?
त्याचे निमित्त आहे...
वेडाहि मीच थोडा
देवाजिच्या मुलांचा
वेडास वेढणार्या
रानातल्या फुलांचा...
@-अतिशय अवडणार्या रानफुलांना-एका रानमुलाकडुन अर्पण
3 May 2012 - 5:23 pm | नरेंद्र गोळे
वा! समर्पक कविता. जेवढी सुंदर फुले तेवढेच वर्णनही मनस्वी!
रानफुलांचे एवढे वेड लागत असेल तर "अत्रुप्त आत्मा" व्हायलाही हरकत नाही.
16 Dec 2011 - 5:36 pm | स्मिता.
जागुताईचा रानफुलांचा धागा म्हटल्यावर उत्साहात उघडला आणि सार्थक झालं.
या चित्रमालिकेत अनेक नवनवीन फुलं बघायला मिळत आहेत. या सर्व रान फुलांची नावं कशी ठाऊक होतात?
16 Dec 2011 - 8:02 pm | जोशी 'ले'
एकदम मस्त ताई, सगळे भाग खुप आवडले, या रानफुलां बद्दल काहि माहिति असल्यास वाचन्यास उत्सुक, जसे 'उंदिरमारी' हे नाव का पडले असावे?
16 Dec 2011 - 9:08 pm | प्राजु
फोटो घेणं समजू शकतो आपण.. पण बाई तुला त्यांची इतकी नावं मिळतात कुठून? आणि लक्षात सुद्धा राहतात हे विशेष!!
धन्य आहेस बाई!
16 Dec 2011 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
17 Dec 2011 - 6:17 am | दीपा माने
सुंदर छायाचित्रे! जागु तुझ्यातल्या निसर्गाच्या वेडामुळेच तु ही छान छायाचित्रे घेऊ शकलीस.
सुंदर कविता! अतृप्त आत्मा तुमच्या कवितेतला आध्यात्मिक पाया मनाला भावला.
17 Dec 2011 - 11:08 pm | जागु
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
ह्या फुलांची काही नावे मला फ्लॉवर्स ऑफ इंडीया ह्या साईटवरून मिळाली.
उंदीरमारीचे झाड आसपास असल्यास उंदरांची पैदास कमी होते. काही शेतकर्यांनी उंदरापासून संरक्षण होण्यासाठी ह्या झाडांची कुंपणाला लागवड केलेली नोंद आहे.
कळलावी ह्या वेलेचा उपयोग औषध म्हणून गरोदर स्त्रीला बाळंतीण होण्यासाठी कळा लवकर येण्याकरीता केला जातो.
अतृप्त आत्मा खुप सुंदर कवीता रचलीत. फुलांना न्याय दिलात.
18 Dec 2011 - 12:47 am | अत्रुप्त आत्मा
@अतृप्त आत्मा खुप सुंदर कवीता रचलीत. फुलांना न्याय दिलात.---धन्यवाद ताई
20 Dec 2011 - 11:59 pm | देविदस्खोत
व्वा...............व........!!!!!!!!!!!!!!!!!!!
3 May 2012 - 5:31 pm | ५० फक्त
मस्त मस्त मस्त