सध्या औरंगाबाद-वेरूळची जी प्रवासवर्णन मालिका लिहितो आहे त्या प्रवासात एक क्वचित आढळणारी गोष्ट बघितली, अंध मासा.
सकाळी लवकर पुण्याहून निघून दुपारी जेवायच्या वेळी औरंगाबादला पोहोचलो. कडकडून भूक लागली होती. शहरात शिरल्या-शिरल्या जे पहिले हॉटेल लागेल त्यात जेवून घेऊया असे ठरले. शहरात आल्यावर एक सुप्रिया नावाचे हॉटेल दिसले. ते कसे असेल ह्याची जरा चाचपणी करायला आत शिरलो माझ्या धाकट्याला घेऊन. आत भिंतींवर मोठे मोठे फिश टॅन्क्स होते, भिंतींवर म्हणजे भिंतींत कंसील्ड असलेले. माझ्या धाकट्या मुलाचा मासे हा वीक पॉंईंट आहे. लगेच त्याची ऑर्डर आली, 'इथेच जेवायचे' आणि तो एका टेबलावर जाऊन बसलाही. निमूटपणे बाहेर येऊन बाकीच्या सगळ्यांना आत यायला सांगितले.
सगळे येऊन स्थानापन्न होईपर्यंत मुलाचे मासे मोजून झाले होते. सगळ्या माश्यांना नावे देऊन त्यांचे बारसेपण झाले होते. ऑर्डर देऊन झाल्यावर मग जरा ऐसपैस बसून मीही मग मुलांबरोबर माशांना न्याहाळू लागलो. अचानक एका माशामध्ये काहीतरी वेगळेपण जाणवले. मग जरा निरखून बघितल्यावर लक्षात आले की त्याला डोळेच नाहीयेत. अंध प्राणी बघायची ही पहिलीच वेळ. डोक्याला बराच ताण देऊनही अंध असा कोणता प्राणी बघितल्याचे आठवेना.
परत परत बघून खात्री करून घेतली आणि मग मॅनेजरला बोलावून त्याच्याशी बोलून खात्री पटवून घेतली. त्याने सांगितले की जेव्हा हॉटेलमध्ये त्या माशाला आणले तेव्हा तो एकदम पिल्लावस्थेत होता. तो मासा जन्मापासून अंध आहे. मग एकदम त्या माशाची कणव आली. एकतर त्या भिंतीतल्या टॅन्कमधले बंदिस्त जीवन त्यात पुन्हा सगळा अंधार. त्याचे इतर माश्यांशी काय बोलणे होत असावे ह्याचा विचार करू लागलो आणि डोळ्यापुढे संवाद आला:
अंध मासा (एका माशाला): 'काय भावड्या कसे काय चालू आहे?, मजा आहे म्हणा तुझी. रंगीत जग बघायला मजा येत असेल नाही?'
दुसरा मासा : 'मित्रा, तू फार नशीबवान आहेस!'
अंध मासा : 'का चेष्टा करतो रे आंधळ्याची :('
दुसरा मासा : 'चेष्टा? आपल्या भाई-बांधवांना तळलेल्या, भाजलेल्या अवस्थेत आपल्या डोळ्यासमोरच मनुष्यप्राण्याकडून खाल्ले जाताना उघड्या डोळ्यांनी बघणे, तेही एकदा दोनदा नव्हे तर आपले स्वतःचे आयुष्य संपेपर्यंत, हे किती भयानक आणि जीवघेणे असते ह्याची तुला कल्पना नाही मित्रा. शाप आहे हा शाप.! तुला नशीबवान म्हणतोय कारण तुला डोळे न देऊन देवाने ह्या शापापासून मुक्त केले आहे.
हा संवाद डोळ्यापुढे आल्यानंतर मी खरंच ठरवू शकलो नाही की तो अंध मासा सुदैवी की दुर्दैवी :(
हाच तो सुदैवी (की दुर्दैवी?) अंध मासा ->
ह्या फोटोत हा मासा मला खरंच एकदम केविलवाणा वाटतो, एकदम अंगावर येतो हा फोटो.
हेच ते दोघे (भावड्या आणि मित्रा), संवाद करणारे मासे.
प्रतिक्रिया
14 Dec 2011 - 11:04 pm | आत्मशून्य
आधी वाटलं कोणत्याशा परदेशी कथेचा स्वैर अनूवाद वगैरे लिहलाय की काय... पण वाचून झाल्यावर.. काय प्रतीक्रीया द्यावी सूचेना....
अवांतरः- काही लोक त्यांच्या पाळीव लाडावलेल्या कोबडीलाच मोठ्या हौसेने चिकन खायला घालतात असं ऐकीवात आहे, हे खरयं का ?
14 Dec 2011 - 11:06 pm | अन्या दातार
असा मासा पहिल्यांदाच बघतोय.
14 Dec 2011 - 11:22 pm | गणपा
मास्यांमध्येही असु शकत हे कुणी सांगीतल असतं वा फोटो दाखवला असता तरी त्यावर विश्वास बसला नसता. (हल्ली फोटोशॉपमुळे काहीही शक्य आहे.)
पण सोक्या तुझ्यावर भरवसा आहे. म्हणुनच विश्वास ठेवतोय.
14 Dec 2011 - 11:42 pm | चिंतामणी
पण सोक्या तुझ्यावर भरवसा आहे. म्हणुनच विश्वास ठेवतोय.
14 Dec 2011 - 11:48 pm | सोत्रि
खरंच खरा आहे रे हा मासा!
पुण्याहुन औरंगाबाद शहरात शिरल्यावर डाव्या हाताला आतल्या बाजूला एका लॉज समोर 'सुप्रिया' नावाचे होटेल आहे. तिथे हा मासा आजही बघायला मिळेल. जे कोणी औरंगाबादमधे असतील किंवा कोणी जाणार असतील ते बघून खात्री करू शकतील.
- (अंध मासा प्रत्यक्ष बघितलेला) सोकाजी
14 Dec 2011 - 11:56 pm | गणपा
विरार पश्मिमेला एक बालरोगतज्ञ आहे. त्याच्या दवाखान्यातही एक फिश टँक आहे. पण टँक अगदीच लहान आहे. अंदाजे २.५ * १.५ फुट असावी त्यात एकच मासा आहे. किती वर्षांपासुन आहे कल्पना नाही. पण आणला तेव्हा अगदीच पील्लु असाव आणि आता तो बर्या पैकी वाढला होता. मी पाहिला तेव्हा तो जवळ जवळ ३.५ फुटाचा होता. बिचार्याला तेवढुश्या जागेत पाहुन फार वाईट वाटलं. डॉकटर बर्यापैकी खोर्याने पैसा ओढतोय. (ओढो .... त्यात काही मला पोट दुखी नाही.) त्याला विनवलं होतं की निदान एक मोठी फिश टँक घ्या नाही तर त्या माश्याला तलावात सोडून द्या. त्यावर डॉकटरने उडवा उअडवी करत घ्यायची आहे नवी टँक अस उत्तर दिलं.
८-९ महिन्यांनी परत एकदा त्याच्याकडे जाणे झाले. पण ना ती टँक बदलेली दिसली ना त्यातला मासा.
16 Dec 2011 - 2:33 pm | शिल्पा नाईक
गणपा भौ, माझ्या लहान पणी मी याच डॉकटर कडे एक पोपट पाहीला होता. तो पण बिचारा पिंजर्यात राहुन कंटाळला होता. सारखा चावायला यायचा. त्यांना त्याच काहीच वाटत न्हवत.
15 Dec 2011 - 12:03 am | मोहनराव
त्याचा मित्र म्हणतो तसा सुदैवीच म्हणायचा... बिचारा!
(निशब्ध झालेला..) मोहन
15 Dec 2011 - 12:43 am | चतुरंग
मस्त कल्पनाशक्ती लावून संवाद लिहिला आहेस सोत्रि.
पण हा अंध मासा दुर्दैवी वगैरे आहे असे वाटत नाही. या प्रकारच्या माशांना 'मेक्सिकन टेट्रा" असे म्हणतात. हे बघा चित्र.

पाण्याखालच्या अतिशय खोल गुहांमध्ये अनेक पिढ्या वास्तव्य झाल्यामुळे माशांची ही प्रजाती आधी त्यांची बघण्याची क्षमता आणि नंतर मग डोळेच गमावून बसले - उत्क्रांतीचा जिताजागता नमुना!
त्यांच्या अंगावर असलेल्या अतिसंवेदनशील लॅटरल लाईन्सचा वापर करुन ते पाण्यातून विनासायास मार्ग काढू शकतात.
औरंगाबादेत हा मासा कसा आला हा गमतीदार विषय ठरु शकतो. अपघातानेच याची अंडी कुठून तरी आलेली असणार आणि मग त्याचा प्रवास इतर डोळस माशांबरोबर सुरु झाला असावा.
-रंगा
15 Dec 2011 - 6:05 am | सुहास झेले
वाह... माहितीसाठी धन्स रंगाशेठ :) :)
मस्त कल्पनाशक्ती लावून संवाद लिहिला आहेस सोत्रि.... +१
15 Dec 2011 - 4:20 am | वीणा३
पाहिल्यांदीच बघत्ये असा मासा :(
15 Dec 2011 - 7:11 am | सन्जोप राव
फिशटँकमधील मासा व त्यानिमित्ताने मनात आलेले विचार आवडले. फिशटँक आणि बोन्साय या गोष्टी मला बघवत नाहीत.... :-(
15 Dec 2011 - 8:24 am | प्रभाकर पेठकर
फिश टँक मधील माशांपेक्षा जास्त दु:खी जीव म्हणजे पिंजर्यातील पक्षी. गॅलरीत टांगले असतील तर त्यांना आकाश दिसतं, त्यात विहरणारे त्यांचे बांधव दिसतात पण ....
स्वतःच्या मनोरंजनासाठी निष्पाप पक्षांना जन्मठेप भोगायला लावणे ह्या सारखा क्रुर स्वार्थीपणा नाही.
15 Dec 2011 - 12:13 pm | रम्या
काही वर्षापुर्वी असाच एक वाईट अनुभव घेतला. आणि त्यानंतर पक्षांना पाळायचा मोह कधीच झाला नाही.
आम्ही भावंडांनी वडाळ्याचा जत्रेत एक पक्षांचा पिंजरा विकत घेतला. विशिष्ट प्रकारची चिमण्यांची फार देखणी जात होती. नर मादीची जोडी होती. दोन्ही पक्ष्यांची पिंजर्यात फडफड चालली होती. म्हणुन पिंजरा बाहेर एका मोकळ्या जागी एका झाडाबाजूला ठेवला तर पक्ष्यांची फडफड प्रचंड वाढली. दुसर्या दिवसा पासुन एका पाखराची हलचाल मंदावली. आणि काही काळानंतर अर्धमेल्या अवस्थेत पिंजर्यात मान टाकून पिंजर्या पडून राहीलं. पाखराला दाणे खाऊ घालण्याचा, पाणी पिऊ घालण्याचा खुप प्रयत्न करून पाहिला. पण व्यर्थ!
आणि थोड्यावेळाने पाखराने प्राण सोडला!
मग त्याच्या जोडीदाराची तगमग पाहाणं आलं. जणू काही विचारत होता.
"अरे अशी काय बसली आहेस? उठ ना. काय झालं तुला? मी एकटाच कसा राहू इथे? तुझ्याशिवाय या पिंजर्यातल्या एवढ्याशा जगात कसा राहू मी?" आम्ही त्या पाखराचं कलेवर बाहेर काढलं.
त्या जिवंत राहिलेल्या इवल्याश्या पाखराची फडफड थांबली. आता त्या भयाण पिंजर्यात तो एकटाच होता.
घरामध्ये प्रचंड निराशा दाटली. काही सुचेना. शेवटी आम्ही ठरवलं त्या पाखराला पिंजर्यातून मुक्त करायचं.
शेवटी आम्ही त्या पिंजर्याचं दार उघडलं. तर ते पाखरू घाबरून बाहेर पडेचना. आम्हाला वाटलं शेवटी पाखरूच ते, त्याला काय कळणार आम्ही त्याला मुक्त केलंय ते. शेवटी पिंजर्यात हात घालून त्याला बाहर काढलं. भुर्रकरून इकडून तिकडे उडालं. आम्हाला हायसं वाटलं. ते पंख निकामी केलेलं पाखरू नव्हतं. त्या पाखराला पिंजर्याबाहेर पाहून मनावरचा ताण बर्याच प्रमाणात कमी झाला. पण पाखरू काही फार दुर उडून जाईना. काही वेळ वाट पाहिली. मनात म्हणालो, "अरे वेड्या पाखरा जा. स्वातंत्र्याचा आनंद घे".
त्या पाखराला काय वाटलं काय की, पुन्हा घरात आलं, पंख्यावरून, ट्युबलाईट वरून उगीचचं उडालं आणि...
पुन्हा उघड्या दारातून त्या भयाण पिंजर्यात शिरलं !
हाय रे देवा!
शेवटी दुसर्या प्रयत्ना नंतर ते पाखरू कुठेतरी उडून गेलं. तेव्हा पासून कानाला खडा, पुन्हा म्हणून कुण्या पक्ष्याला, जनावराला पाळायचं नाही.
15 Dec 2011 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर
पक्षांना पिंजर्यातून सोडताना त्यांच्या नैसर्गिक वस्तीस्थानी (जसे जंगलात) सोडावे. त्यांना जिथून पकडून आणलेले असते त्या पेक्षा शहरातील, मनुष्यवस्तीतील दृष्य आणि वास पराकोटीचे वेगळे असतात. ह्या परक्या प्रदेशात पक्षी बावरतात. कधी-कधी आपल्या वस्तीतील पक्षी ह्या 'परक्या' पक्षांना चोची मारून घायाळ करतात, मारून टाकतात. त्यामुळे, पक्षी सोडताना त्यांच्या नैसर्गिक वस्तीस्थानाचा विचार व्हावा.
धन्यवाद.
15 Dec 2011 - 9:17 am | प्रचेतस
मित्राच्या घरच्या फिश टँक मध्ये एक एकाक्ष गोल्डफिश बरेच दिवस होता.
15 Dec 2011 - 11:13 am | दादा कोंडके
पण वरती सगळ्या शाकाहारी मंडळींचं प्राणी/पक्षीप्रेम बघून ड्वाले पाणावले! :)
15 Dec 2011 - 11:41 am | अमृत
हेच टंकणार होतो....थोड्याफार फरकाने...
(पण वरती काही मत्स्याहारी मंडळींचं मत्स्यप्रेम बघून ड्वाले पाणावले) ह. घ्या. मंडळी
अमृत
15 Dec 2011 - 9:23 pm | मधु कोळी
अगदी! :)
15 Dec 2011 - 11:45 am | अमृत
__/\__
अमृत
15 Dec 2011 - 11:46 am | मदनबाण
मी कुठल्या तरी मत्स्य संग्रालयात एक पारदर्शक मासा पाहिल्याचे आठवले !
16 Dec 2011 - 5:38 am | अभिजीत राजवाडे
जबरीच. डोळे नसलेला मासा बघायला फार वेगळ वाटते आहे.