पुस्तक परिचयः संगणकावर मराठीत कसे लिहाल? लेखक प्रसाद ताम्हनकर

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
12 Dec 2011 - 12:59 pm

एकूण पृष्ठसंख्या: ६४
किंमतः ६० रू. फक्त.
नवता प्रकाशन

मिपावर येण्यापूर्वी मराठीत काही लिहायचं तर मला फक्त iLeap हे एकच सॉफ्टवेअर माहित होतं. पण त्यात सगळी अक्षरं ऑनस्क्रीन कीबोर्डावर लिहायची असल्यानं टंकाळा यायचा. मराठी आंतरजालाशी ओळख झाली तरी मी वाचनमात्रच होते. एकदा कधीतरी एक चार ओळींचा प्रतिसाद लिहिला, त्यानेही चांगली पंधरा-वीस मिनिटे खाल्ली. मद्रासच्या सफरीचा पहिला भाग लिहिताना जी दमछाक झाली ती तर अजूनही लक्षात आहे. अशा वेळेस दणादण लेख, प्रतिसाद आणि मेगाबायटी खरडी टाकणार्‍यांसमोर कित्येकदा लोटंगण घालायची इच्छा व्हायची. (तेव्हा व्हायची, आता नाहीय. नाहीतर ढीगभर पायांचे फोटो यायचे व्यनि-खरडींमधून.)

आजकाल मला इतक्या सहजपणे मराठी लिहिताना पाहून इतरांच्या चेहर्‍यावरचा आदरभाव दिसतो. त्यांनाही मी "हे खूप सोपं आहे, तुम्हालाही सहज जमेल" असं सांगते. उदाहरण दाखवलं, की त्यांनाही पटतं, पण स्वत:ला जमेल की नाही याचा अंदाज येत नाही. अशांसाठी सन्माननीय* श्री. प्रसाद ताम्हनकर यांचे 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' हे सहज-सोपं-छोटेखानी पुस्तक उपयोगी पडेल.
आपण सगळेच मराठीत लिहितो. त्यामुळे पुस्तकात नक्की काय वेगळे असेल ही उत्सुकता सर्वांनाच आहे म्हणून हा लेखनप्रपंच.

पुस्तकाची अनुक्रमणिका
१. संगणकावर मराठी भाषा कशी वापरावी?
२. टंकलेखन तक्ता
३. गमभन
४. गमभन टूलकिट
५. 'गमभन'चे फायरफॉक्स एक्सटेंशन
६. बरहा
७. गूगल transliterate
८. गूगल transliterate online
९. quillpad
१०. समारोप

अनुक्रमणिकेवरून पुस्तकात काय असेल अशी साधारण कल्पना येते. सर्वात आधी युनिकोड ची तोंडओळख आणि त्यामुळे मराठी लेखन कसे सोपं झालेय याची थोडक्यात माहिती दिली आहे. त्यानंतर पायरीपायरीने सुस्पष्ट स्क्रीनशॉट्स तसेच कमीत कमी आणि समर्पक वाक्यांत गमभन ऑफलाईन कसे इन्स्टॉल करावे, तसेच ते ऑनलाईन कसे वापरावे हे सोदाहरण दाखवलेय. तीच गोष्ट फायरफॉक्स एक्स्टेंशन आणि बरहा, गूगल transliterate आणि क्विलपॅडची. उदाहरणादाखल काही वाक्येही इंग्रजी टाईपात आणि ती मराठीत कशी दिसतील हेही दाखवून दिले आहे. इन्स्क्रिप्ट बहुधा मुद्दामच वगळलं असावं कारण त्याचा कळफलक खास लक्षात ठेवावा लागतो. हा सगळा माहितीचा खजिना अवघ्या सत्तावन्न पानांच्या पुस्तकात अगदी व्यवस्थित बसवला आहे.

थोडक्यात सांगायचं तर अतिमाहितीचा मारा नाही, आणि आवश्यक असं काही वगळलं नाही** असा या पुस्तकाचा सारांश म्हणता येईल.

*- प्रकशन सोहळ्यात कुणाच्या नावापुढे सन्माननीय हा शब्द लावला नाही तर बहुधा त्या निवेदिकेला मंचावरून हाकलून देण्यात येईल अशी धमकी मिळाली होती. त्यामुळे हा शब्द अजून छळतोय
**- बरहामध्ये काही शब्द टंकताना साधारण युनिकोड्/गमभनपेक्षा वेगळे लिहावे लागतात. उदा: क्ष, र्‍य, ज्ञ, अ‍ॅ,ऑ इ.इ. याच ही माहिती देण्यास सन्माननीय लेखक विसरलेले दिसतात. (हा उगाच आमचा छिद्रान्वेषीपणा)

तंत्रमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

थोडक्यात पंचनामा परिक्षण आवडलं.
ह्या पुस्तकाची ऑनलाईन* आवृत्ती कुठे मिळेल रे परा. ;)

*हॅ हॅ हॅ पाराला कळलं असेलच. तुम्ही फुटा.

छोटा डॉन's picture

12 Dec 2011 - 1:52 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.
यथावकाश खुद्द पर्‍याच हे पुस्तक ऑनलाईन अव्हेलेबल असल्याचा फोन करेल ह्याची खात्री आहे ;)

जोक्स अपार्ट, पुस्तकाची थोडक्यात ओळख आवडली.
नव्यानेच मराठी भाषा संगणकावर लिहायला शिकुन आंतरजालावर दाखल होऊ इच्छिणार्‍यांना ही एक मोलाची मदत ठरेल असा विश्वास आहे.

- छोटा डॉन

पाषाणभेद's picture

12 Dec 2011 - 1:54 pm | पाषाणभेद

Oh nice thread man!

I can read Marathi but I also love to write in Marathi Language.
(Actually, my fiance is from Marathi culture and I want to impress her. :-) )

What is the cost of this book and from where I will get it? Can I order Online?

Thanks in advance.

पैसा's picture

12 Dec 2011 - 2:03 pm | पैसा

माननीय परा यांच्या पुस्त्काचा माननीया मक यानी करून दिलेला परिचय आवडला. मी मराठीत कसं लिहिते याबद्दल बर्‍याच नातेवाईकाना, मित्रमंडळींना कुतुहल वाटतं. विंडोज एक्सपीमधे युनिकोड कसं अ‍ॅक्टिव्हेट करावं हे त्याना अनेकदा सांगून लक्षात येत नाही. मला सांगता नसावं बहुतेक. अशांना आता हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येईल. पुस्तक कुठे कुठे उपलब्ध आहे हे माननीय लेखकांनी सांगाव. फ्लिपकार्टवर असेल तर फारच छान!

मकीने "बाल की खाल" काढली आहे तर पुढच्या आवृत्तीत माननीय परा यांनी ते सुधारून घ्यावं.

(मेल्या पर्‍या तुला ३ वेळा आणि मकीला १ वेळा माननीय म्हटलं आहे हे लक्षात असू दे!)

प्रचेतस's picture

12 Dec 2011 - 2:05 pm | प्रचेतस

नुसतंच माननीय नाही हो तै, सन्माननीय पाहिजेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Dec 2011 - 1:29 am | बिपिन कार्यकर्ते

पैसातईचा प्रतिसाद मननिय आहे! ;)

श्रावण मोडक's picture

13 Dec 2011 - 1:56 am | श्रावण मोडक

तीन वेळा 'माननीय' विरुद्ध एकदा 'मेल्या'. तेही झाकून. म्हणजे वाचक ते ठळकपणे लक्षात ठेवणार. छ्या...! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2011 - 2:18 pm | अत्रुप्त आत्मा

पुस्तकापेक्षा बहु-मोल ण्यान प्रतिसादांमधुन मिळणार याची खात्री असल्यामुळे वाचन खुण साठली गेली आहे... ;-)

स्वाती दिनेश's picture

12 Dec 2011 - 4:18 pm | स्वाती दिनेश

मके, पराच्या पुस्तकाचा परिचय आवडला.
स्वाती

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Dec 2011 - 4:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ते ** आवडल्या गेले आहे.
शेवटी कायै, बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले ;)

प्रभाकर पेठकर's picture

12 Dec 2011 - 4:54 pm | प्रभाकर पेठकर

श्री परीकथेतील राजकुमारांच्या 'संगणकावर मराठीत कसे लिहावे?' ह्या पुस्तकाची थोडक्यात पण बहुमोल माहिती शेवटी मिपावर आली.
कांहीसा पुस्तक परीचय झाला आहे. आता प्रत्यक्ष वाचनाची ओढ आहे.
धन्यवाद मस्त कलंदर.

मकीताईने विस्तृत परिचय करुन दिल्याबद्दल आभार.. म्हणजे पुस्तक खरेदी केल्यावर वर्थ आहे.

- पिंगू

अविनाशकुलकर्णी's picture

12 Dec 2011 - 11:36 pm | अविनाशकुलकर्णी

मनोगत चे शुद्धलेखन चिकित्सा टुल चा उल्लेख करावयास हवा होता...
खुप उपयोगी टुल आहे...
असो..दुसरी अव्रुत्ति निघाली कि त्यात उल्लेख करावा ...

परा नी आता ..तिरके ..मराठी कसे लिहावे यावर पण एक पुस्तक काढावे..

वा वा.. मकीनं छान परिचय करून दिला आहे.
पुस्तकाची प्रत घ्यावी म्हणते आता. :)

चित्रा's picture

13 Dec 2011 - 8:37 am | चित्रा

परिकथेतल्या राजकुमारांना हे पुस्तक लिहायला वेळ कधी मिळाला कुणास ठाऊक?!

छान पुस्तक परिचय. नक्की घेऊ आणि गरजूंना देऊ.

क्रान्ति's picture

13 Dec 2011 - 1:34 pm | क्रान्ति

चांगल्या पुस्तकाचा चांगला परिचय करून दिला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2011 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तकाची ओळख अधिक तपशिलवारपणे यायला हवी होती असे वाटले. कदाचित सदरील पुस्तक विकत घेऊन वाचावे असा हेतु परिक्षण करणा-या लेखिकेचा दिसतो (अंदाज हं ) . खरं तर अशी पुस्तके कोणी तरी 'सर्वार्थाने' पुढाकार घेऊन खेड्यापाड्यातील शाळेत जिथे नेट-बिट आहे. आणि संगणकावर लिहिण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक मोफत दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.

शिक्षकांना तरी एक भेट प्रत दिली पाहिजे. ;)

मनातल्या मनात : सालं आपल्याला कसं या सोप्या विषयावर पुस्तक लिहायचं सुचलं नाही.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

13 Dec 2011 - 7:21 pm | प्रभाकर पेठकर

>>>>सालं आपल्याला कसं या सोप्या विषयावर पुस्तक लिहायचं सुचलं नाही.

तुम्ही, 'संगणकावर मराठीत कसे लिहू नये' ह्या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवितो. अशा पुस्तकाचीही कित्येक लेखकांना गरज आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2011 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'संगणकावर मराठी कसे लिहू नये' ह्या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवितो. अशा पुस्तकाचीही कित्येक लेखकांना गरज आहे.

आपण मला वरील पुस्तकासंबंधी काही प्रकरणे कशी असावीत त्याची काही माहिती दिली तर थोडं थोडं करुन वरील विषयावर (संयुक्त विद्यमाने) पुस्तक लिहिता येईल. :)

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

13 Dec 2011 - 7:33 pm | प्रभाकर पेठकर

थोडा तपास केल्यास 'काही प्रकरणे' मिपावरच सापडतील.
बाकी वेगळ्याने काही तपास करण्याची आपणांस गरज नाही. आपल्या नजरेत मिपावर असे 'साहित्य'(?) अनेकदा आले असेलच.

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Dec 2011 - 2:20 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. मराठी वर्डस् कसे लिहील्या जाऊ नयेत. अशा विषयावर प्रबंध लिहायला हवा.

कुंदन's picture

15 Dec 2011 - 3:39 pm | कुंदन

पुपे तू लिव ना , प्रा डॉ मार्गदर्शन कर्तील.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Dec 2011 - 9:39 pm | llपुण्याचे पेशवेll

आमालां ल्यायचं असेल तर आमाला कोनाचं माग्लंदर्सन घ्यावं लागत नाई.

किचेन's picture

14 Dec 2011 - 2:27 pm | किचेन

अरे वाह. ६० रुपयात ६४ पण म्हण्जे साराभाई आधल्या मोनिशाच्या भाषेत पैसा वसूल!
पुस्तकात काय काय आहे हे अस सांगितल्यावर कोण मिपाकर पुस्तक घेईल? कारण सगळे ह्या अनुभवातून गेलेत आणि सन्माननीय पराकाकांनीच त्यांना मराठीत कसे टाकावे यावर मार्गदर्शन केले आहे.
पण तरी एका ज्येष्ठ मिपाकाराने हे पुस्तक काढले आहे.तेव्हा विकत घेतलेच पाहिजे.(मी नाही सगळ्यांनी)
सन्माननीय पराकाका कुठे मिळेल हे पुस्तक?
आता लग्नात हेच देणार आहेर म्हणून! (पेला रद्द!) ;)

अन्या दातार's picture

14 Dec 2011 - 2:29 pm | अन्या दातार

आता लग्नात हेच देणार आहेर म्हणून! (पेला रद्द!)

कुणाच्या लग्नात? पराच्या?
आणि याचा वधुवरांना नक्की फायदा काय? ;)

विनायक प्रभू's picture

14 Dec 2011 - 2:51 pm | विनायक प्रभू

नविन टेक्नॉलॉजी नुसार परा ला लग्नात(पहील्या पुस्तकानिमित्त) आतुन तांब्याचे कोटींग असलेला चांदीचा पेला आहेर म्हणुन दिला गेल्या जाईल.

विदेश's picture

15 Dec 2011 - 9:24 am | विदेश

मकनी पराचा केलेला पुप आवडला.

देविदस्खोत's picture

17 Dec 2011 - 6:34 pm | देविदस्खोत

"" संगणकावर मराठी कसे लिहावे "" पुस्तक परिचय चांगला करुन दिलात, हे पुस्तक मला विकत घ्यावयाचे आहे. त्यासंबधी काही मार्गदर्शन कराल का ??

मस्त कलंदर's picture

17 Dec 2011 - 7:49 pm | मस्त कलंदर

परिकथेतील राजकुमार यांच्याशी संपर्क साधा. पुण्या-मुंबईत असाल तर लगेच मिळेल

देविदस्खोत's picture

19 Dec 2011 - 1:57 pm | देविदस्खोत

धन्यवाद " मस्त कलंदर," " परिकथेतील राजकुमार " यांच्याशी संपर्क साधून लवकरच हे पुस्तक विकत घेत आहे. '' आपले " " परा " यांचे व " मिपा " चे आभार..!!!!!!!!

पाषाणभेद's picture

19 Dec 2011 - 2:03 pm | पाषाणभेद

"आपणही" "हा" "धागा" "वाचला" व "तो" "आपणाला" "महत्वाचा" "वाटला". "आपते""ते" "पुस्तक" "घेतले" "की नाही" "ते कळवावे".
घे न कोट
.केवळ सहीसाठी हघेहेवेसांलान