चान्दरात

शिल्पा१९७३'s picture
शिल्पा१९७३ in जे न देखे रवी...
6 Dec 2011 - 10:06 pm

रात्रीच्या आठवणीनी मन झाले धुन्द, दरवळतो अजुनही रोमारोमात निशिगन्ध,
स्पर्शाने तुझ्या फुलला अन्गात पारिजात, श्वासात मारवा अन नजरेत चान्दरात,
ओठानी खोलशी तू कितीएक अबोल बन्ध, चेतवी स्वप्नाचे दिवे, मनात मन्द मन्द,
घेतले कवेत तु, कोसळते बाहुपाशात मी,
ओल्या वणव्यात जळाया, पतन्गापरी आतुर मी,
पेचाडावपेचात रन्गत गेली रात्र, उमलत गेले हळूहळू एकएक गात्र,
वाटतेय चालु रहावे, असेच हे सत्र, उलगडेल ना मग, जीवनाचे ते सूत्र,
मुक्त होण्यासाठि सुद्धा हवेच असते ना एक बन्ध,
निश्शब्द, निस्तब्ध, निसन्दिग्ध, अनन्त अनन्त...

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मयुरपिंपळे's picture

6 Dec 2011 - 11:44 pm | मयुरपिंपळे

अप्रतीम

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Dec 2011 - 12:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना.
मांडणी निट केली असती तर आधिक वाचनीय झाली असती.

अवांतरः अनुस्वार देण्यासाठी shift+m चा वापर करा.

पियुशा's picture

7 Dec 2011 - 1:15 pm | पियुशा

सुन्दर :)

शिल्पा१९७३'s picture

7 Dec 2011 - 5:23 pm | शिल्पा१९७३

अनुस्वारासाठी काय करावे ते माहीत नव्हते. धन्यवाद. अजुन एक अडचण.. ईतर फोन्ट मधले लेखन कोपी पेस्ट कसे करायचे?

पैसा's picture

7 Dec 2011 - 11:06 pm | पैसा

सरळ नेहमीप्रमाणे कॉपी पेस्ट करा आणि http://www.misalpav.com/node/1312 या पानाच्या मदतीने आवश्यक तिथे बदल करा.

मोहनराव's picture

7 Dec 2011 - 5:44 pm | मोहनराव

छान छान!!