भाना ..... भाग-२

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
23 Nov 2011 - 4:10 pm

आधीच्या भागाचा दुवा ...

भाना .....

रात्री गाव चिडीचूप झोपी गेला कुणाचा हु नाही कि चू नाही
तात्या ,अन बाकीची काही मंडळी तात्यांच्या घरी जमा झाली होती .तात्या घरासमोरच्या पटांगणात येरझारया घालत होते ,बाजेवर शंकर्या ,भाऊराव, अप्पा अन संभा बसलेले होते.कुणीच काही बोलत नव्हत . तात्याच्या मनाची घालमेल ओळखून
शंकर्या म्हणाला " तात्याबा ह्ये बेष्ट केल तुमी बघा , ह्या केस्मधून अंग काढून घेतलं त्ये ! पोलीस बघतीन ते काय करायचं ते ?देण्या ना घेण्याच आपल्या माग लचांड लावायला कंच्या शाळेन शिकवलं आहे ब्वा !
किती वाढूळचा बघतुय मी ? तुम्ही कशापायी एव्हढा डोक्याला खुराक करून घेताय राव, घ्या तमाखू घ्या !
अंगणात फेर्या मारणारे तात्या जागीच थबकले ,
दोन्ही हाताचे पंजे (प्रश्नार्थक) वळवत म्हणाले ,
“काय ह्ये लेका शंकर्या तुझ बोलन ? नै पटत का तुझ्या जीवाला तरी ? अस हात झटकून कस चालायचं , कधी घडायला नको ती गोष्ट घडलीय गावात , अन आपण उभा राहून मज्जा पाह्याची का निसती ?आपल काय देन घेण न्हाई का या गोष्टीशी ? नै तू सांग ना मला ?
तात्याचा वाढता आवाज बघून ,
इतका वेळ आपली दाढी हाताने कुरवाळत बसलेला रशीद मधेच शंकर्याला दापत म्हणाला
" ए शंकर्या तू चूप कर ना? तात्या क्या बोल रेले सून तो लेना पैले , निस्ता पिरपिर करू नको ना बीचबीच मे”

तात्या : ह्ये बघा ,चार लोकांची चार तोंड ,कुणी काय बी म्हणन ,पोलीस आपल्यापरीन तपास करतीन तेव्हा करतीन !
पण आपल बी घेण देन हाय या गोष्टीशी , आता पातुर गावात भांडण झाली ,हातपाय मोडूस्तोवर मारामार्या झाल्या पण खून ? खून कारायची हिम्मत कुण्या हरामखोराची झाली नव्हती ?
रशीद : तात्या एकदम सही बोले तुम ,आज तलक किसकि हिम्मत नही हुई ,मेरेकू तो लगता ये कोई
बाहर आदमिकाच काम है, गाव मे एक दुसरेसे कितनी बी खुन्नस हो , कोई ऐसा गीरेला काम नै करींगा,सब पंचायतमे आते ना तात्या , तुम्हारे पास निस्तरनेकू ? फिर्र ........?
रशीदकडे कानाडोळा करून शंकर्या म्हणाला
बर्र .......मंग तात्या तुमीच सांगा काय सांगायचं ते ,करायचं तरी काय हाये नेमक ?
तात्या : ह्ये बघा ,ज्यांनी कुणी हे वंगाळ काम केल ना त्याला हुडकून काढायच्या कामी मदत करायची ,त्याचा ठाव ठिकाणा ,पत्त्या ,मागमूस काढायचा आपण समद्यांनी मिळून , ह्या गावातला आगा - पिच्छा सगळ माहिते आपल्याला ,!
भाऊसाहेब : आपण ? आपण शोधायचं ? मंग पोलीस काय झक मारत्यान ? म्हणजी त्यांच काम आपुन सोप्प करायचं ?आपला जीव जोखमीत घालून ? का? कशापायी ?
आपल्याला नै पटत ब्वा तुमच धोरण तात्या ! म्हणत भावश्याने कलटी मारली .
“अजून कुणाला चालत व्हायचं आसन तर निघा आधीच कड-कड्न !माझ म्या बघून घेईन काय करायचं त्ये ?”
तात्याच ह्ये वाक्य संपत न संपत तोच रशीदची
बायको तिथे आली ,तात्याकडे रागात तिरक बघत म्हणाली
" आउर कितने देर चलेंगी तुम्हारी मिटिंग ? कल कामकू छुट्टी बोलकर आये क्या शब्बीर के अब्बा ?
तसा रशीद् खडबडून उठला बिडी विझवली अन तात्याला म्हणाला तात्या तुम्हारा क्या फैसला होण्गा ,मेरेकू जरूर बताना ,मै है आपके साथ म्हणत चालू पडला .
शंकर्या ": आयला, हा फोकलीचा काय मदत करणार तात्या ? ह्याला बायकुशिवाय काही दिसत का दुसर ?
शंकर्याच्या ह्या टोल्यावर सगळ्यांना हसू आल पण
तात्याकडे बघत आवरून घेतलं थोडक्यात सगळ्यांनी !

*****************************************************
इकडे शबानाच्या तोंडाचा पट्टा चालू झाला होता
" ये देखो , शब्बीर के अब्बा ,फष्ट अन लाष्ट टाईम बोलती तुमकू, ये काम धंदे अपने नै ,उनको निसतरने दो ना ,तुम कायकू बीच मे पडते ?अपन भले ,अपना काम भला ! वो तात्याके क्या नादी लगते तुम ?
उसके आगे पीछु कोई नै रोनेवाला , ये चार चार बच्चे निकाल के रक्खे उनका क्या ? तुमकु कुछ हो गया तो किसके मुह को देखेना? बोलो ना बोलो करत शबानाचा बांध फुटला
हुंदके देत
"मरनेवाली मर गई , तुमकु क्या पडी उसकी इत्ती ?" ऐकताच रशीदने कपाळाला हात मारून घेतला
अन दरवाजा बंद करून घेतला

तात्या अन बाकीची उरलेली मंडळी रात्री उशिरापर्यंत चर्चा करीत बसली होती .

*****************************************************************

इन्सपे काळे . जीपमधून उतरले त्यांचा चालण्याच्या वेगाची बरोबरी करत जाधव त्यांच्याशी बोलत होते
इन्सपे काळे : कुणी काही तोंड उचकल कि नाही ?
म्हणजे “ मेरी आवाज सुनो " बेल्टचा काही फायदा झाला की नाही अजून? की जैसे थे आहे ?
जाधव : नाही साहेब , रात्री मी अन गायकवाडने घेतलं होत आत एकेकाला पण .....................
इन्सपे. काळे बोलतच होते तेव्हढ्यात गायकवाडच्या बुलेटचा आवाज आला
गायकवाडने एक कडक सॅल्युट मारून , साहेबाच्या हातात एक लिफाफा दिला
इन्सपे. काळेंनी " य्येस ..याचीच वाट पहात होतो, म्हणत घाइघाइत ते बंद पाकीट उघडल
साहेबांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या ,आपल्या तोंडाचा चंबू करत मध्येच ,हनुवटी चोळत, मध्येच टेबलावर तबला वाजवत साहेब रिपोर्ट न्याहाळत होते.
साहेब टेन्शन मध्ये असले कि असेच काहीसे करायचे हे जाधवला पक्क माहित होते . न राहवून जाधव हळूच कुजबुजला " माझा अंदाज बरोबर असायला पाहिजे गायकवाड ,तु काय बोलतो ?
काळेसाहेब एक भुवई उंच करत जाधवकडे बघत म्हणाले
": नो जाधव नो , अंदाज सपशेल चुकला यावेळी आपला “

विषारी द्रव्य / पॉईझन मृत्यूस कारणीभूत आहे अस रिपोर्ट सांगतो आहे

गायकवाड : म्हणजे खून गळा आवळून झालेला नाही तर ,?
काळे : हम्म ...... तीच तर खरी गोम आहे ? केस वाटतेय तितकी सरळ नाही.
इन्सपे काळे : जाधव चला ,जीप काढा ,निघुया ,
मध्याकड बघत म्हणाले
“ह्याला जीपमध्ये घ्या ,जरा गावात एक चक्कर टाकू ,अन अजून तासाभरात बॉडी पण येईल, मयताला दुसर कुणी नाही याच्याशिवाय ! सर्व विधी आटपेस्तोवर आपण आपले काम करू कस ? “
***************************************
तात्याबा अन इतर गावकरी वाटच बघत होते
बॉडी आली तशी काही म्हातार्या - कोतार्या बायांनी गलका केला , काही बायकांची कोंबडी सारखी कुचकुच चालूच होती
पंचायत ऑफिसमध्ये तात्या ,इन्स्प.काळे ,सरपंच अन इतर काही मंडळी जमा झालेली होती
तात्या काळे साहेबांना म्हणाले
" हे बघा साहेब काही अडलं-नडल तर जरूर सांगा ,आम्ही सगळे आपापल्यापरीन मदत करू तुम्हाला
पण खुन्याचा तपास लवकर लावा , सर्वजन गांगरून गेल्याती , गावाच्या इभ्रतीचा प्रश्न हाये साहेब "
इन्सपे. काळे : आपल्याला वाटतो तितका सोप्पा गुंता नाहीये हा तात्या !
" मला जरा सेपरेट बोलायचं आहे तुमच्याशी " सो जाधव प्लीज !
जाधवने सर्वांना बाहेर जाण्याची सूचना दिली
"सरपंच असून सुदिक मला बाहेर घालवाल " हे सरपंचाच्या चांगल जिव्हारी लागल होत
त्याच्या हाताची चुळबुळ चालूच होती मेन घुम्यासारखा झाडाखाली बसून सरपंचाने दाराकडे टक लावली होती .

इन्सपे काळेंनी दरवाजा लावून घेतला
बाहेर बारीक आवाजात चर्चेला उधाण आल होत .

कोणी म्हणत होत " तात्याला म्हाईत आहे याच्यात कुणाचा हात हाये त्ये ?
कुणी म्हणत होत " ती अवदसा अशीच होती ,पण तिच्यापायी सर्व गावाचा सत्यानाश होईन एकदाचा !
शंकर्याची आई त्याला समजावून म्हणत होती
" घर ना दार, चावडी बिर्हाड " अशी गत आहे तात्याची ,सोत्ता तर सोत्ता पण समद गाव घेऊन डूबन हा तात्या !
तू नको लागू त्याच्या नादाला, शाना असशीन तर
"

अडीनडीला , पैका - पाण्यासाठी , गरजेला सर्वांना हक्काचा वाटणारा तात्याबा ,सर्वांसाठी रातीचा दिस करणारा तात्या, लोकांचे तंटे सोडवणारा, मोडलेले संसार जोडणारा तात्या !आता ह्या सर्वांच्या डोळ्यात खुपायला लागला होता

********************************************
इन्सपे.काळेंनी दरवाजा उघडला " तात्या हि गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील म्हणत तात्यांच्या हातात हात दिला
इकडे सगळी तयारी झाली होती माळवत व्हायला आल होत .
मध्याने लंगडत लंगडत चितेला अग्नी दिला ,चिता ढयान ढयान जळु लागली ,
गोदाच अजाण पोरग त्या चीतेकडे कुतूहलाने बघत उभंहोत .मध्या त्याला कुशित घेउन धाय मोकलून रडत होता

गोदा निघून गेली होती कायमची !
एक अनुत्तरीत कोड सोडून .........

क्रमशः

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

प्रास's picture

23 Nov 2011 - 4:23 pm | प्रास

हा भागही छान उतरलाय.

संवाद टॉप, वातावरण निर्मिती झकास!

पुलेप्र

:-)

मीनाक्षी देवरुखकर's picture

23 Nov 2011 - 4:27 pm | मीनाक्षी देवरुखकर

झकास
मस्त पियुषा तै

स्वाती२'s picture

23 Nov 2011 - 5:10 pm | स्वाती२

झकास झालेत दोन्ही भाग!

अन्या दातार's picture

23 Nov 2011 - 5:30 pm | अन्या दातार

पुढचा भाग लवकर येऊदेत. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Nov 2011 - 6:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हा पन भाग लै विंटरेश्टींग झाला बगा!!
येऊ द्या म्होरला!! वाचु राहीलो....

मस्त.. इंटरेष्टिंग...

- पिंगू

सविता००१'s picture

23 Nov 2011 - 6:44 pm | सविता००१

झकास भाग आहे

रेवती's picture

23 Nov 2011 - 7:38 pm | रेवती

वाचतिये.

लई प्रयत्न केले पण आधीचा धागा की सापडलं न्हायी.
;(

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2011 - 1:55 am | प्रभाकर पेठकर

उत्सुकता ताणली आहे. कथेचा पुढीचा भाग लवकर येऊ द्या. अभिनंदन.

वाचतेय. काही अंदाज बांधता येत बाहीये अजून.. लवकर लिहि.

आत्मशून्य's picture

24 Nov 2011 - 5:24 am | आत्मशून्य

कथा कसलीही फडतूस काहीही असो, लिखाण मात्र जबरदस्त व्हायला लागलयं. मान गये.

यामूळे आता आगाथा ख्रिस्ती डोळ्यासमोर येतेय. तिची रहस्ये सूध्दा बरेचदा फडतूस असतात (काही चांगले अपवाद सोडून) पण असलं मस्त रोमँटीक वातावरण आणी वर्णन असतं ना तिच्या कथांत खून घडणार्‍या परीसरांच व व्यक्तींच की वाटतं ती गोश्ट वाचतच रहावं, सोबतीला पात्रांचा नर्म विनोदाचा शिडकावा असतोच. इथं अगदी सेम तसंच नाहीये पण एकंदर मज्या येतेय , पण केवळ कथाबीजच जरा मार खातं. ग्रेट वर्क (आशा आहे की हे कूठून उचललं नाहीये). आगाथा ख्रिस्ती वाचाव वेळ असेल तर.

@ आत्मशुन्य

ग्रेट वर्क (आशा आहे की हे कूठून उचललं नाहीये).

अस करन्यापेक्षा लिहिन सोडुन देइन मी !
उगा दुसर्याच्या चुलित........... जौ दे ;)

आगाथा ख्रिस्ती कोण आहे ? ( याला आमच अज्ञ्यान समजा हव तर )
जर एखादी हॉलीवुड हिरोइन् / स्क्रीप रायटर असेल तर ,आमच हॉलीवुड पटाशी तितकस सख्य नाही ,हे नम्रपणे नमुद करु इच्छीते .
धन्यवाद :)

रहस्यकथा लिहिणार्‍या पियुशाला अगाथा ख्रिस्ती हे नाव माहित नाही याचे अंमळ आश्चर्य वाटले.

ह्या ख्रिस्तीबाई हॉलीवूडच्या नसून पक्क्या ब्रिटिश आहेत. रहस्यकथासम्राज्ञी म्हणून त्यांचे ख्याती आहे. हर्क्युल पायरो व मिस मार्पल हे त्यांचे जगप्रसिद्ध मानसपुत्र व मानसकन्या होत. अधिक माहितीसाठी गूगल करा. :)

आत्मशून्य's picture

25 Nov 2011 - 2:38 am | आत्मशून्य

.

प्रचेतस's picture

24 Nov 2011 - 8:59 am | प्रचेतस

मस्त लिहिलेय.
संवाद लिहिण्याची शैली जबरदस्त, पुढच्या भागाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

समीरसूर's picture

25 Nov 2011 - 12:31 pm | समीरसूर

खूप उत्सुकता ताणून धरायला लावणारे लिखाण.

जमलयं एकदम झकास

पुढील भाग लवकर येऊ द्या.

--समीर

ट्वीटी हा भाग पण सुंदर झाला हाय... :)
पुढच्या भागाची वाट पाहतोया...

किसन शिंदे's picture

25 Nov 2011 - 5:05 pm | किसन शिंदे

हम्म्म!

रहस्य अजुनच वाढत चाललेय तर!

प्रकाश१११'s picture

28 Nov 2011 - 3:41 pm | प्रकाश१११

मस्तच लिहिले आहे. वा ..!!
आवडले.लिहित रहा..
मनापासून शुभेच्छा ........!!

अशवत्थ's picture

4 Dec 2012 - 4:39 pm | अशवत्थ

सुन्दर लिहिले आहे