आज अचानक तो क्षण आठवे
माझे श्वास स्तब्ध गोठवे
दिवस अन रात ती एकमेकांसवे
अवीट असे ते गावे गोडवे
कालचक्र फिरुनी उलटे
क्षणोक्षण वाटे हे माझे हवे
वास्तवाची जाणीव होता
अस्तित्वही मग चटकावे
तुझे जाणे असे घडावे
हूरहूर मनास सतावे
कधी या पक्ष्याने
पिंजऱ्यातून उडावे ?
प्रतिक्रिया
23 Nov 2011 - 11:54 am | मिसळलेला काव्यप्रेमी
रचना छान झाली आहे.
चटकावे.. ह्म्म... शब्द लक्षवेधक आहे.