सहज वाटे धावत जावे
गावाच्या आठवणीत क्षणभर थांबावे
तो गाव मज आठवे
सुर पारंब्या, मन जेथे झुलवे
ती आंब्यांची न्याहारी
त्या रात्रीच्या गप्पा
धुंडाळला लपंडावात
वाड्याचा हरेक कप्पा
त्या संध्याकाळच्या वेळी
गप्पा न् रानापर्यंत फेऱ्या
रसाळ रानमेवा तो
रानातल्या झाडावरील साऱ्या
लाडिक हट्टाने घेतलेल्या
त्या वाण्याकडील गोळ्या
नव्या कोऱ्या लोणच्यासोबत
त्या धबाडक्या पोळ्या
त्या भुताखेतांच्या गोष्टी
ते गोधडीसाठीचे भांडणे
मिळता पांघराया गोधडी
भावंडांना चिडवून रडवणे
सारे हरवले आता हे,
सर्व आहे मज ठावे
तरीही मन पुन्हा पुन्हा
गावाकडेच धावे
प्रतिक्रिया
23 Nov 2011 - 11:32 am | प्रभाकर पेठकर
छान आहे स्वप्नरंजन.
कवी (की कवियत्री?) सध्या कुठल्या तरी रुक्ष शहरात असहाय्य होऊन अडकलेला/अडकलेली दिसत आहे. त्या असहाय्य अवस्थेवरही एखादी कविता येऊ द्या की. आवडेल वाचायला.