मी कागदावर सांडत गेलो

अविनाश खेडकर's picture
अविनाश खेडकर in जे न देखे रवी...
20 Nov 2011 - 12:15 am

कवित्व नाही माझा बाणा
मी नच असे थोर कवी तो
लिहिले ज्यांनी काव्यग्रंथ अन्
समाज ज्यांना थोर मानतो

कधी न केली कसली ईर्षा
कुणी लिहिलेल्या काव्यत्वाची
तुम्ही नभीचे सुर्य तळपते
ना मज क्षमता काजव्याची

आवडले जे जेंव्हा जेंव्हा
शब्द सुमने उधळीत गेलो
काळोखाच्या साम्राज्यावर
मी शब्दाचा प्रकाश झालो

मनात ऊठले वादळ तेंव्हा
विचार माझे लिहिते झाले
ना मात्रांशी सोयर माझे
वृतांनी मज दूर लोटले

अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् मी कागदावर सांडत जातो.

कविता

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

20 Nov 2011 - 12:50 am | दादा कोंडके

कविता वाचण्या आधीच शिर्षकावरून काहितरी कोटी करण्याचा विचार होता. ;)
पण कविता वाचून मत बदललं. उत्तम प्रयत्न. :)

आत्मशून्य's picture

20 Nov 2011 - 1:17 am | आत्मशून्य

असेच म्हणतो.

शुचि's picture

22 Nov 2011 - 12:50 am | शुचि

खूप सुंदर आहे कविता.

मदनबाण's picture

22 Nov 2011 - 11:13 am | मदनबाण

अप्रतिम ! :)

आवडले जे जेंव्हा जेंव्हा
शब्द सुमने उधळीत गेलो
काळोखाच्या साम्राज्यावर
मी शब्दाचा प्रकाश झालो
सुंदर !

अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् मी कागदावर सांडत जातो.
झकास्स्स्स...

अविनाश खेडकर's picture

24 Nov 2011 - 9:09 am | अविनाश खेडकर

प्रतिक्रियांबद्ल सर्वांचे आभार.

सुहास झेले's picture

24 Nov 2011 - 10:18 am | सुहास झेले

अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् मी कागदावर सांडत जातो.

अप्रतिम !!!!