मी माझ्या छंदातच रमतो
मी हा माझा छंदच म्हणतो !
शब्द वेचतो
शब्द वाटतो
आनंद लुटतो
आनंद दाटतो
जमेल त्याला भेटा म्हणतो
स्वत:स बघतो
इतरांना बघतो
एकटा चालतो
चाला म्हणतो
झेपेल तेवढे खेटा म्हणतो
आपण सुंदर
जग हे सुंदर
विचार जनांचे
विचार मनाचे
रुचेल त्याला मोठा म्हणतो
मी माझ्या छंदातच रमतो
मी हा माझा छंदच म्हणतो !
प्रतिक्रिया
15 Nov 2011 - 10:52 am | प्रभाकर पेठकर
रमणिय कविता.....उत्तम.
15 Nov 2011 - 6:49 pm | चित्रा
आवडली!
15 Nov 2011 - 11:35 pm | पाषाणभेद
:-)
16 Nov 2011 - 11:52 am | मदनबाण
छान... :)
19 Nov 2011 - 9:56 pm | दि ग्रेट मराठा
छान,
प्रतिक्रिया देणे - मी हा माझा छंदच म्हणतो !