शब्द

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
15 Nov 2011 - 3:50 am

शब्द

शब्द ऐकतो शब्द बोलतो
शब्दांचे वार झेलूनी
शब्दांचेच प्रहार करतो

शब्द कधी गळ्यात पडती
हार होवूनी खोटे सुखवती
स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती

नफा नुकसान व्यवहार जेव्हा
नजरेसमोर जाणवतो केव्हा
शब्द गिळतो शब्द फिरवीतो

शब्द जोडतो शब्द पेरतो
रूजवूनी त्यांना कागदावर
शब्दांचीच शेती करतो

शब्दांचा आधार बोलण्याला
शब्दच साह्य करी भावनांना
शब्द नसता बोलतो निशब्दांना

- पाषाणभेद
१४/११/२०११

शांतरसकविता

प्रतिक्रिया

शब्दांचा आधार बोलण्याला
शब्दच साह्य करी भावनांना
शब्द नसता बोलतो निशब्दांना

शॉलिट्ट... :)

प्रभाकर पेठकर's picture

15 Nov 2011 - 10:32 am | प्रभाकर पेठकर

फार सुंदर आहे कविता.

पण का कोण जाणे अर्धवट सोडल्यासारखी वाटली. ती पुर्ण करण्यासाठी शेवटचे कडवे सुचवतो आहे....

शब्द बोलती हृदय भावना
शब्द कधी मनास आवरेना
शब्द नसता मीही नसतो
उगी असाच नि:शब्द असतो

(हा आगाऊपणा माफ असावा)