मला आवडलेली काही वाक्ये.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Nov 2011 - 7:16 pm

माझ्या मर्कटलीलामृत या धाग्यावर श्री. जगमोहन प्यारे यांनी मी ते पुस्तक लिहायला सुरवात केली त्या तारखेची आठवण करून दिली.... दोन वर्षे झाली मी वेळ मिळेल तसे लिहितोय लिहितोय..... नंतर हार्ड डिस्क चाळता चाळता अजून एक जूने पान सापडले...तारीख १८-८-२००८.... त्या पानावर मी मला आवडलेल्या काही वाक्यांचा अनूवाद करून ठेवला होता. प्यारे यांना धन्यवाद.....

प्रेम.
रस्त्यावर तो फिरत होता,
त्याचे कपडे फाटके होते.
कोट उसवलेला होता आणि
त्याला ठिगळे होती.
त्याच्या उसवलेल्या बुटातून
पाणी ठिबकत होते,
आणि ह्रदयातून तारे ओसंडत होते.
तो कोणाच्यातरी प्रेमात पडला होता.
- व्हिक्टर ह्युगो.

अडाणी.
तुम्ही जर चांगली पुस्तके वाचत नसाल,
तर ज्याला वाचता येत नाही,
त्याच्यात आणि तुमच्यात मला
विशेष फरक करता येईल असे वाटत नाही.
- मार्क ट्वेन.

दिशाहीन
कुठे जायचे हे ठरले नसेल तर
प्रत्येक रस्ता हा आपलाच आहे
असे वाटायला लागते.
- लुईस कॅरॉल

श्रीमंत
निसर्ग आणि स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर
तुम्ही दारिद्र्यात जगणार नाही.
जगाच्या मतांप्रमाणे चालत राहिलात तर मात्र
निश्चितच श्रीमंत होनार नाही.
- सेनेका

दिनचर्या.
सकाळी विचार कर
दुपारी त्यावर काम कर
संध्याकाळी चांगल चुंगलं जेव
रात्री छान झोप.
- विल्यम ब्लेक

खलाशी
दिवस लहान होते आणि रात्री मोठ्या होत्या.
सुर्यप्रकाश जवळ्जवळ नव्हताच.
बोटीवरच्या केबीन्समधे
वातावरण उदासवाणे होते.
ते अजूनही तुमच्या मनाचा ताबा घेते.
- बील कुपर.

प्रेम
जास्त अंदाज, तर्क,
कमी प्रेम !
- सेनेका.

घर
ज्यात तुम्ही रहाता
त्याला घर म्हणता येतेच असे नाही.
जेथे तुम्हाला समजून घेतले जाते
त्याला खरे घर म्हणता येईल.
- मॉर्गनस्टर्न.

नष्टचर्य.
मुले आणि संशोधन यांच्यात विलक्षण साम्य आहे.
दोन्हीत तुम्ही गुंतवणूक करता. पुढे काय होणार याची तुम्हाला कल्पना नसते,
आणि ते तुम्ही सांगूही शकत नाही.
काही कारणांमुळे तुम्ही दोन्हीही बंद करू शकता.
पण त्याचा परिणाम एकच !
तुमचा धंदा बंद होऊ शकतो
आणि
मानवजात नष्ट होऊ शकते.
- माहीत नाही.

मित्र.
माणसाच्या आयुष्याचे चांगले आणि वाईत असे दोन भाग केले तर -
चांगल्या भागाचा ९० टक्के भाग हा मित्र आणि मैत्रीने व्यापलेला असतो.
- लिंकन अब्राहम.

यश
जर तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल
किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचे स्वप्न बघत असाल तर त्या दिशेने लगेच पाऊल टाका.
धैर्यामधे हुशारी, शक्ती आणि जादूचा सुरेख संगम असतो.
- गोएथ.

जयंत कुलकर्णी.

साहित्यिकविचारआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

दीपा माने's picture

14 Nov 2011 - 8:48 pm | दीपा माने

यशाबद्दल लिहीलेले गोएथ यांच्या विचारांची प्रचिती आली आहे.
जयंतराव, आपले ह्या प्रकारातील आणखी लेखन वाचायला खुप आवडेल.
धन्यवाद!

त्या माकडाची गोष्ट आधी पूर्ण करा.. मग बाकीचं लिहा

अन्या दातार's picture

14 Nov 2011 - 9:10 pm | अन्या दातार

वाचनखूण साठवली आहे. चांगली आहेत वाक्ये. :)

पैसा's picture

15 Nov 2011 - 7:45 am | पैसा

चांगली वाक्ये आहेत.

मदनबाण's picture

15 Nov 2011 - 8:52 am | मदनबाण

आवडेश... :)

रणजित चितळे's picture

15 Nov 2011 - 11:37 am | रणजित चितळे

जयंत साहेब आवडले. मैत्रीवर अब्राहम साहेबांनी लिहिलेले तर फारच.

मस्त आहेत वाक्ये..

लिंकन साहेबांच्या वाक्याविषयी:

माणसाच्या आयुष्याचे चांगले आणि वाईट असे दोन भाग केले तर -
चांगल्या भागाचा ९० टक्के भाग हा मित्र आणि मैत्रीने व्यापलेला असतो.
- लिंकन अब्राहम.

हे उपरोधाने तर नाही? ;)

आयुष्य चांगले असताना नव्वद टक्के भाग व्यापणारे मित्र (आणि आयुष्याच्या वाईट भागात गैरहजर असलेले) !!? अशा अर्थाने?

वपाडाव's picture

16 Nov 2011 - 6:02 pm | वपाडाव

गवि, हे नेमकं कशावर अवलंबुन असावं असं तुम्हाला वाट्टंय?
म्हणजे असंही असु शकेल की मित्र त्या काळात नव्हते म्हणुन तो वाइट काळ आला होता.....
किंवा वाइट काळातही ९० टक्के सहवास मित्रांचा असु शकतो.....
पण चांगल्या काळातील ९० % सहवास तर मित्रांचाच आहे ह्यावर त्यांनी (गौरतलब) केलेलं आहे.....

बाकी आम्हाला एकच वाक्य आडौतं ते म्हणजे....
- Murphy's Law = If anything can go wrong, it will !

जागु's picture

16 Nov 2011 - 6:55 pm | जागु

खुप छान वाक्य आहेत.