नमस्कार,
शुक्रवारी साधारण सकाळचे १०:२० झाले असतील, डेस्क वरचा फोन वाजला नाव आले "XYZ" Calling माझ्या कपाळावरच्या आठ्या पाहून माझ्या शेजारी बसलेल्या सहकाऱ्याच्या लगेच लक्षात आले कोणाचा फोन आहे, तो हळूच "Best of Luck" म्हणाला, मी फक्त हसलो कारण आता Call वर कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणार आहेत याचा विचार सुरु झाला होता, Hello .........this went wrong ...........SLA ...........blaa blaa ...........!!! call सम्पला (10:47),
Call duration - 27 min, आपली नेते मंडळी जशी आश्वासने देतात तशीच काही आश्वासने मी दिली होती आणि नेहमी प्रमाणे वेळ मारून नेली होती :).
आत्ता डोक्यातील चक्रे वेगात फिरू लागली होती 3 Incidents चा SLA breach झाला होता, परत फोन वाजला पण या वेळेस माझा भ्रमण ध्वनी वाजत होता "चिराग मुळे" calling कपाळावरच्या आठ्या थोड्या कमी झाल्या कारण चिराग चा फोन म्हणजे नक्कीच ट्रेक ला जायचे आहे,
मी - Hello...........
चिराग - नमस्कार बर्वे साहेब
मी - नमस्कार
....................................
....................................
चिराग - उद्या ०८०० hrs "कमळगड"
मी - १०० % येणार
Bye
कोकण दिव्या च्या मस्त ट्रेक नंतर उद्या "कमळगड" च्या ट्रेक चा योग आला होता, मी संधी सोडणारच नव्हतो आणि उद्या ट्रेक ला जायचे या आनंदातच उर्वरित पाट्या ऑफिस मध्ये टाकल्या आणि घरी आलो आणि चिराग ला परत फोन केला त्याला म्हणालो अरे ८ खूप उशीर होईल आपण १ का दिवसात परत यायचे आहे ना ? चिराग म्हणाला काळजी नसावी आरामात जाऊ. चिराग आधी जाऊन आला होता त्यामुळे मी निवांत झालो.
शनिवार सकाळी ८ ला चिराग च्या घरी गेलो अजून कोणीही आलेले नव्हते, परत सगळ्यांना फोन केले आलोच रे ५ मिनटात , ऑन द वे आहे अशी ठरलेली उत्तरे मिळाली आणि ८ वाजून २० मिन्तानी "मी, चिराग, राजा, नाम्या आणि पांडे" असे वाई च्या दिशेने मार्गस्थ झालो, १ जण ऑफिस च्या कामा निमित्ताने ५ दिवसान पूर्वी बंगळूरू ला गेला होता, तो शुक्रवारी रात्री पुण्या ला यायला निघाला होता ट्रेक ला जायचे समजताच पठ्या वाई फाट्या वर उतरला होता, आम्ही साधारण शिवापूर टोल नाक्या वर पोचलो होतो आणि "तिडके" चा फोन आला वाई फाट्या वर पोचलो त्याला तिथल्याच एका हॉटेल मध्ये थांबायला सांगून आम्ही गाडी जरा जोरात हाणली गाडीत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या आणि ९:४५ ला आम्ही वाई फाट्या वर पोचलो सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि खाण्याचा कार्येक्रम हॉटेल विरंगुळा येथेच करायचा असे ठरवले आणि गाडी ७ ते ८km पुढे जाऊन थांबली. हॉटेल विरंगुळा येथे भरपूर गर्दी होती त्यामुळे जागा मिळवण्यात साधारण १० मिनटे गेली, एखाद्याच्या लग्नात जेवायला गेल्या सारखी Order गेली " मिसळ पाव, सा.खिचडी, पोहे, वडा पाव, ताक, शीतपेय आणि चहा" तरी Biscuits खाल्ली नाहीत म्हणून ती पण मागवली आणि अखेरीस १०:५५ ला खानावळ उठली आणि राजा म्हणालाच चला महाबळेश्वर ला जाऊ आणि परत येऊ..................अजून एखादा गडी फितायच्या आत मी राजा ला विरोध केला आणि गाडीचे सुकाणू वाई च्या दिशेने फिरवायला सांगितले आत्ता प्रवास धोम धरणाच्या कडे कडे ने सुरु झाला, धरण पूर्ण क्षमतेने भरले होते आत्ता उजव्या हाताला "केंजळगड" दिसायला लागला होता आणि धोम धरणाच्या शेवटच्या पसाऱ्या पर्यंत जाऊन धरणाच्या पलीकडचा किनारा गाठला अजूनही किल्ला दिसत नव्हता वाटेत एका दोघांना विचारून मार्ग निश्चिंती केली आणि तुपे वाडी चा रस्ता धरला, तुपे वाडीत पोचायला दुपारचे १२:०५ झाले.
पण तुपे वाडीतून सुद्धा गड काही दिसत नव्हता, तुपे वाडीत वाट विचारून घेतली आणि चालायला सुरवात केली सुरवातीला सरळ असणारी वाट अचानक चढणीची झाली पण किल्ल्याचा माथा अजूनही दिसत नव्हता डाव्या हाताला लांब काही सुळके दिसत होते, जर का त्या दिशेला जायचे असेल तर आम्ही चुकीची वाट पकडली होती, वाटेत एक मावशी भेटल्या पण त्यांनी हीच बरोबर वाट आहे असे सांगितले, आणि अंगावर येणाऱ्या चढणीच्या वाटे ला लागलो आता डोक्यावर सूर्य तळपत होता आणि चाल कासवाच्या गती पेक्षा कमी झाली होती, विरंगुळा हॉटेल मधील खाणे गड चढताना १० पावले टाकल्यावर विरंगुळा घ्यायला भाग पाडत होते, तिडके मात्र जोशात पुढे पुढे जात होता ........त्याच्या नावाने बोंबा बोंब करून थांबवले आणि आम्ही पण १ का झाडाखाली जरा बैठक मारली आत्ता साधारण निम्म्या अंतरावर आलो असू समोर केंजळगड दिसत होता आणि त्याच्या अलीकडे धोम धरणाचे पाणी दिसत होते डोळ्यांना शांती देणारे सौंदर्य होते
वाटेत भेटलेल्या मावशीने पुढे १ मंदिर लागेल असे सांगितले होते हे माहित झाल्या पासून पांडे पुढे असलेल्या सर्वांच्या नावाने बोंब मारून विचारत होता मंदिर आले का ? पण त्याच्या प्रश्नांचे उत्तर देण्याची थोडी सुद्धा ताकद कोणाच्याच अंगात नव्हती सगळे खूप दमले होते. पुढे गेलेला तिडके परत मागे फिरला आम्ही अजून का आलो नाही ते बघायला आम्ही त्याला पण बसवले आणि २० मिनताचा ब्रेक घेतला तिडके ने मला बरोबर घेतले आणि आम्ही पुढे निघालो आम्ही निघालेलो पाहून हळू हळू सगळे निघाले, Internet वर कमळगडचे अनेक फोटो पहिले होते पण तसं काहीच दिसत नवते, चिरागला शेवटी मी वैतागून विचारले अरे तू आधी जाऊन आला आहेस ना ? चिराग म्हणाला त्या वेळेस ह्या वाटेने नवतो आलो .................... दुपारचे २:१५ झाले होते अजून किती वेळ चालून परत मागे फिरायचे असा प्लान आखायला सुरवात केली पण तिडके ने काही हार मानली नव्हती तो ओरडून बोलवतच होता चला थोडेच आहे आत्ता , थोडेच आहे या वाक्याचा अर्थ सर्व त्रेक्केर्स ना चांगलाच माहित आहे त्यामुळे त्याचे बोलणे कोणी जास्त मनावर घेतल नाही.
पण पुढे गेल्या वर चांगले जंगल लागले आणि चढ संपून पठार लागले आणि जीवात जीव आला चढ संपून सपाट वाट सुरु झाली होती आणि सर्वात मुख्य म्हणजे कमळगड दिसायला लागला होता, केंजळगड जसा गांधी टोपी प्रमाणे दिसतो तसाच कमळगड आत्ता दिसत होता आता सगळ्यांना उत्साह आला होता, आणि पटापट चालायला सुरवात केली, मस्त दाट जंगलातून वाट होती आणि ती एका मोठ्या मोकळ्या पठारावर आली उजव्या हाताला "कमळगड" दिसत होता मोठे पठार होते त्या वर धनगराचे घर होते आणि काही शेती पण होती, आता चालीचा वेग अजून वाढवला आणि अखेरीस पोचलो. गडाला असा बुरुज आणि त्यात दरवाजा असे काही नाहीये एका अवघड वाटेतून गडाचा माथा गाठला आणि ..............................धन्य झालो. (३:१५ pm)
सगळ्यांकडे जो काही थोडा कोरडा खाऊ होता तो खाला दूरवर केंजळगड, पांडवगड आणि वैराटगड दिसत होता आणि दूरवर रायरेश्वर चे पठार दिसत होते आणि या बाजूला लांब पाचगणीचे पठार आणि महाबळेश्वर दिसत होते, मस्त थंड वारा सुटला होता. जवळच कावेची विहीर होती त्यात पाणी मिळेल म्हणून आत उतरलो पण पाणी जास्त नवतेच आणि त्यात पक्षी मारून पडला होता त्या मूळे घाण वास सुटला होता त्या मूळे हे पाणी काही पिण्या योग्यतेचे नवते आत एकदम थंड वाटत होते आत मध्ये थोडे फोटो काढले, आणि बाहेर आलो वरती timer लाऊन सगळ्यांचा फोटो काढला, आणि ४:१५ वाजता गड सोडला सगळ्यांची गडावर राहण्याची इच्छा होती परंतु एका ला दुसऱ्या दिवशी सकाळी महत्वाचे काम होते त्यामुळे तो प्लान रद्द करून आलेल्या वाटेने ना उतरता राजमार्गाने जायचे ठरवले आता वेळ खूपच कमी होता झपा झप पावले उचलली, वाटेत १ मोठे गाव लागले तिथून पुढची वाट नक्की केली आणि राजमार्गाने पायथा गाठला. सकाळी येताना थेट चढ्या वाटेने आलो होतो त्या पेक्षा हि वाट खूपच चांगली होती, तुपे वाडीत पोचलो आणि १ मिनटात अंधार झाला. ( ६:३० pm ),
अजून एक सुंदर ट्रेक पूर्ण झाला.
परतीच्या वाटेवर पुढील ट्रेक चे प्लान्निंग सुरु झाले आणि परत हॉटेल "न्यू विलास" ..................
प्रतिक्रिया
6 Nov 2011 - 12:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला कमळगडचा प्रवास सकाळी ठीक ८:०० वाजेला सुरु झाला आणि सायंकाळी ६:३० संपला. आपण आपल्या कम़ळगडच्या प्रवासात मिनिटा मिनिटाचा हिशोब लिहिला आहे मला राव गम्मतच वाटली. असो, संपूर्ण प्रवास वाचला पण मला कमळगड काही दिसलेच नाही. काही फोटो बिटो टाकले असते तर कमळगड आहे, ते व्यवस्थित कळले आणि दिसले असते. बाकी, पुढच्या ट्रॅकचा प्लॅन झाल्यावर त्या ट्रॅकचे फोटो टाकायला विसरु नका.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
6 Nov 2011 - 12:13 am | पैसा
तुम्ही फोटो तिथून हलवलेत का?
6 Nov 2011 - 12:16 am | रेवती
फटू कुठायत? निस्ते चवकोन दिसून र्हायलेत.;)
6 Nov 2011 - 12:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फटू कुठायत? निस्ते चवकोन दिसून र्हायलेत.
चवकोन त दिसुच राह्यले पण ह्या धाग्यावर मह्या मॉनिटरचा पडदा ऐटोमॅटीक नवीन प्रतिसाद द्याच्या बॉक्सवर सरकून राह्यला. काय तरी गडबड हायं. आपल्या अधिकारात धाग्यात डोकावून पाह्यल्यावर ध्यानात आलं. प्रवास वरनानात फोटूच्या लिंकाबी डकवल्या हाये. पर फोटू काय दिसनां. बघा. :)
-दिलीप बिरुटे
6 Nov 2011 - 12:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बर्वे साहेब, पिकासावरील फोटोच्या लिंकांच्या बाबतीत आपल्याकडून तांत्रिक गडबड झालेली आहे, त्यामुळे फोटो दिसत नाही. आपण फोटो व्यवस्थित प्रतिसादात जरी डकवले तरी नंतर ते धाग्यात टाकता येतील.
-दिलीप बिरुटे
6 Nov 2011 - 1:11 am | स्वतन्त्र
वर्णनावरून फोटो पाहण्याची उत्सुकता लागली होती,स्क्रोल करत करत धागाच संपला पण फोटो काय दिसले नाहीत राव !
6 Nov 2011 - 2:04 am | केदार बर्वे
फोटो पिकासा लिन्क वरचे आहेत , का दिसत नाहियेत मला पण समजत नाहिये.
क्रुपया उपाय सुचवा.
6 Nov 2011 - 2:21 am | सुहास झेले
केदारसाहेब, ह्या दुव्यावर दिलंय तसं करून बघावे.... आणि लवकर फोटो डकवा इथे.
6 Nov 2011 - 11:32 pm | स्वतन्त्र
नमस्कार केदार !
कदाचित तुम्ही छायाचित्राच्या 'प्रॉपरटीज' मध्ये जाऊन युआरएल कॉपी न करता ब्रोवसर मधली केली असावी.
माझा देखील हाच घोळ झाला होता.
6 Nov 2011 - 9:15 am | मदनबाण
फोटो फोटो फोटो फोटो... कुठे ? कुठे ? कुठे ? कुठे ?
-
-
-
हे, तोहफा तोहफा तोहफा तोहफा... लाया लाया लाया लाया... या चालीवर वाचावे ! ;)
7 Nov 2011 - 2:06 am | पाषाणभेद
फारच सुंदर गीत आहे हे
7 Nov 2011 - 11:38 am | किसन शिंदे
हॅहॅहॅ..हिहिहि :bigsmile:
7 Nov 2011 - 2:04 pm | मोहनराव
फोटु पाहिजेन!!
7 Nov 2011 - 11:26 am | दीप्स
प्रवास वर्णन छान आहे परंतु फोटो मात्र एक चौकोन त्याला आऊट लाईन आणि त्यात डाव्या बाजुला वरच्या कोपर्यात एक फुली एवधेच दिसतात हो.
बाकी काहीही म्हणा तुमच्या टाईम तो टाईम प्रवास वर्णनाला दाद द्यायला हवी.