Sonar of Thoughts !
जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा बैल.
मी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही.
*हरीहरेश्वरहून दिवेआगरला (किंवा उलट) समुद्र किनार्यावरील रस्त्याने जाताना वाटेत हे शेखाडी गांव लागतं. ब्याण्णवच्या बॉम्ब स्फोटात वापरलेले आरडीएक्स याच किनार्यावर उतरले होते. कधी हरीहरेश्वरला किंवा दिवेआगरला गेलात तर या रस्त्याने नक्की जा. डोळ्याचे पारणे फीटेल.
** हे पुस्तक छान आहे (असं डान्राव म्हणतात ;) ) पुस्तक सध्या आउट ऑफ प्रिंट आहे. प्रिंटला गेले आहे असे गेले चार महिने अबक मधल्या पुस्तक दुकानदारांकडून ऐकतोय. त्यामुळे पुस्तक जर बाजारात आले तरच बक्षिस म्हणून देण्यात येईल. (डान्रावरावांकडे असलेली कॉपी वाचायला म्हणून आणून नंतर ती ढापून बक्षिस म्हणून दयायला आमचा जीव काही वर आलेला नाही.)
प्रतिक्रिया
22 Nov 2011 - 12:39 am | रेवती
या धाग्यावर दोन नवीन प्रतिसाद पाहून त्यातला एक निकाल जाहीर करणारा (मला विजेती घोषित करणारा) तर दुसरा माझे अभिनंदन करणारा असेल असे वाटले आणि आले तर अजून जयंतराव आणि ध. वा कुणाचाच पत्ता नाही. त्यात तुम्ही येऊन सारखे विचारून माझा ताण वाढवताय. तुम्हा सगळ्यांनाच मह्त्वाच्या स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे हे समजून घेते आणि माझे भाषण संपवते. जय बैलोबा!
22 Nov 2011 - 10:38 am | धन्या
आज्जी... तुमची तळमळ कळते हो... पण कुणी परीक्षकच मिळत नाही... तांत्रिकदृष्टया या धाग्यावर कविता दिलेल्यांना परीक्षक म्हणून घेता येणार नाही.
वर एका प्रतिसादात जकु काकांना (मुळ सोनारवाले) गळ घातली आहे.
त्यांचाही काही प्रतिसाद नाही.
आता तुम्हीच एक परीक्षक पकडून आणा. ;)
22 Nov 2011 - 1:49 am | पाषाणभेद
ह्या धन्याचा
ह्या ह्या धन्याचा
ह्या धन्याचा वळू
पुढे लागलाय पळू
मागे त्याच्याच लागे मी
कसं सांगू तुला सखे गाई ग
पुष्ट उभार त्याचा खांदा
पाहून झाला माझा वांधा
बघून लागावी नजर
असलीच काया त्याची
कसं सांगू तुला सखे गाई ग
मी आहे दुधाळ गाय
माझ्या दुधाची मधाळ साय
पंचक्रोशीत माझं लई नाव
माझंच गुणगान किती
कसं सांगू तुला सखे गाई ग
मालक त्याचा बेरका वाकडेवाडीचा
आहे धन्याशेट नावाचा
त्याला पुढे करून
मला पळविण्याचा त्याचा विचार
कसं सांगू तुला सखे गाई ग
22 Nov 2011 - 2:00 am | रेवती
आता आलेल्या एन्ट्र्या स्विकारल्या जाणार नाहीत.;)
22 Nov 2011 - 10:42 am | धन्या
कविता छान आहे हे सांगायचं विसरलात काय? ;)
23 Nov 2011 - 8:31 pm | मी-सौरभ
पाभे ना वि४ परीक्षक होता का म्हणून....
म्हंजे आजीना एक स्पर्धक पण कमी होईल... ;)
22 Nov 2011 - 10:17 am | मस्त कलंदर
आख्खा कळपच भेटीला आलाय.
बाकी, या नितांत सुंदर किनार्यावर नेहमी जनावरेच असतात का?
22 Nov 2011 - 10:41 am | धन्या
होय...
झक्कास... तो किनारा गाई-बैल आणि वासरांनी गजबजलेला असतो. :)
23 Nov 2011 - 8:33 pm | मी-सौरभ
या किनार्याच्या जवळपास माण्सं असणारा एखादा किनारा आहे का रे??
23 Nov 2011 - 8:44 pm | मोहनराव
कारे बैला कंटाळलास का तिथे फिरुन? ;)
23 Nov 2011 - 8:47 pm | मी-सौरभ
हो ना माझ्या भावा!!
तुझ्यासारख्या आम्हाला जर्मन गाई थोडीच दिसतात ईथे
23 Nov 2011 - 9:02 pm | रेवती
अहो ध. वा.
काय हे? त्या मस्त कलंदरतै आल्या होत्या त्यांनाच परिक्षक बनवायचं.
तुम्हीही परिक्षक होवू शकताच की!
23 Nov 2011 - 9:11 pm | मोहनराव
मी तर वाट पाहुन पाहुन थकलो बुवा!!
23 Nov 2011 - 10:19 pm | पैसा
छापायला दिलंय, बाकी शून्य! :D
23 Nov 2011 - 11:42 pm | रेवती
घ्या! मनीतैंना आनंद होतोय.
अहो मनीमावशी, तुमच्याही कवितेचं भविष्य अधांतरी आहे. काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.;)
धागा मालक गाशा गुंडाळून पसार झालेत.
24 Nov 2011 - 12:16 am | पाषाणभेद
असल्या प्रकारे आवाहन करून कविता पाडून घेण्याचे काम धवांकडून दोनदा झाले आहे. यापुढे 'आधी बक्षीस दाखव मग धागा काढ असे म्हणावे लागेल.'
24 Nov 2011 - 2:48 pm | मोहनराव
धवांचा जाहीर निषेध!!
24 Nov 2011 - 4:33 pm | धन्या
दोनदा नाही हो मालक. हा पहीलाच धागा आहे. आणि मी याच धाग्यावर जाहीर आवाहन करुन कुणी परीक्षक मिळत नाही.
रेवती आज्जी, तुम्हीच कुणीतरी परीक्षक शोधा आता. ज्या कुणाला तुम्ही परीक्षक नेमाल, त्यांच्या निकालानुसार बक्षिस देण्यात येईल, यापेक्षा जास्त मी काही लिहू शकत नाही. :)
24 Nov 2011 - 4:38 pm | धन्या
पाभेराव, तशीही तुमची कविता तांत्रिक्दृष्ट्या स्पर्धेत नाही. व्हा तुम्हीच परीक्षक आणि लावून टाका निकाल.
जितक्या सहजतेने असल्या प्रकारे आवाहन करून कविता पाडून घेण्याचे काम धवांकडून दोनदा झाले आहे. यापुढे 'आधी बक्षीस दाखव मग धागा काढ असे म्हणावे लागेल. हे लिहिलंत, तितक्याच सहजतेने हे कामही करा आता.
पाभेराव, निकालाच्या प्रतिक्षेत. :)
25 Nov 2011 - 2:17 am | पाषाणभेद
स्पर्धेबाहेर असल्याचे मला मान्य आहे.
विजूभाऊदेखील कुंपण मोडून आत घुसलेले असल्याने (Submitted by विजुभाऊ on Thu, 24/11/2011 - 19:55.) ते देखील स्पर्धेत नाहीत.
खाली दहा स्पर्धकांच्या कविता सलगपणे देत आहे जेणेकरून वाचन करायला सोपे होईल.
सर्वच स्पर्धकांनी आपली विचारशक्ती पणाला लावून कविता केलेल्या आहेत. सर्वप्रथम कवितांमध्ये प्रथम क्रमांकाची/ दुसरा क्रमांक/ टाकावू असला काही प्रकार नसतो. प्रत्येकाची विचार करण्याची कुवत निरनिराळी असते. कविता म्हणजे काही धावण्याची स्पर्धा नाही की जो पहिल्यांदा फित कापेल तो विजेता होईल.
त्याचप्रमाणे विचार कवितास्पर्धांत असणार्या परिक्षकांबाबत आहे. परिक्षकाचे अन स्पर्धकांचे कवितेच्या बाबतील मत जुळेलच असे नाही. कुणा परिक्षकाला आनंदी कविता आवडेल तर त्याच वेळी त्याच तुल्यबळ परिक्षकाला दु़:खी कविता आवडेल. त्यातच एखाद्याला मुक्तछंद आवडेल तर एखाद्याला छंदोबद्ध कविता आवडेल. हि मनाची स्पर्धा असते. इनफॅक्ट हि स्पर्धा नसतेच तर तो एक आनंद असतो. तो आनंद (कविता आवडणे) कसा मिळवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, मनाची स्थिती असते. त्यामुळे स्पर्धेतल्या निवडलेल्या एका कवितेबाबत एकमत होणे केवळ अशक्य आहे. असो.
मला असला कोणत्या स्पर्धेचा निकाल लावण्याची भिती वाटते. एकतर पक्षपातीपणा होईल किंवा योग्य न्याय देण्यासाठी आपण त्या पात्रतेचे नाही असे वाटते. तस्मात, मी परिक्षक होवू शकत नाही.
निपक्षपातीपणाने निकाल लावण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकतो त्या धर्तीवर या स्पर्धेचा निकाल लावावा असे मी सुचवितो.
निकालासाठी दोन पर्याय आहेत.
एक - ह्या नावांच्या (क्रमांकाच्या) चिठ्ठ्या टाकणे व त्यातून एक चिठ्ठी निवडणे हे एक होवू शकते किंवा
दुसरा - या बाबत एखादा कौल काढून जास्त गुणांच्या क्रमांकाला प्रथम कविता जाहीर करणे असे होवू शकते.
चिठ्ठ्या काढण्यात फिजीकली एखादी व्यक्ति असावी लागेल व कौलात वेळ तर लागेलच पण आपल्याच पसंतीच्या क्रमांकाला जास्त गुण देणे वैगेरे लुपहोल्स आहेत.
आपण सारे ऑनलाईन जगात वावरतो. हा निकालही ऑनलाईन साईटची मदत घेवून जर लावला तर मला वाटते ते योग्य होईल.
मी एक संकेतस्थळ सुचवतो. http://www.random.org/lists/
यात एक ते दहा क्रमांक दिलेल्या फिल्डमध्ये टाकायचे व रँडमलाईज बटन दाबायचे. येणार्या लिस्टमध्ये प्रथम क्रमांक जो असेल तो विजेता असे ग्राह्य धरावे. अर्थात हे कोण करेल त्याबाबत शंका आहे. एकतर करणार्याचा मॉनिटर सगळ्यांनाच दिसणार नाही व अनेक मॉनिटर स्र्किन्स ऑनलाईन शेअर करणारी युटीलिटी आहे असे मला तरी वाटत नाही.
आपल्या मिपावर एकाच कंपनीत असलेले दोघेतिघे जण असतील किंवा नवरा-बायको यांची जोडी मिपावर असेलच(आहेच). तरीही टिमव्हिवर किंवा असल्या VNC असलेल्या स्र्किन्स घेवून एखादोघांच्या समक्ष या स्पर्धेचा निकाल वरील संकेतस्थळ वापरून लावावा असे मी सुचवितो.
पुढील प्रतिसादामध्ये कुण्या माहितगाराने (मिपावरील इतिहासकाराने) असल्या जोडीचे नाव जाहीर करावे व त्यांच्या हातून निकाल लावण्यात येवून हि स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न करावी हि सर्वांना नम्र विनंती. (बक्षिसाच्या बाबतीत अजुनही शंका आहेत पण तो प्रश्न नंतर निकालात लावावा.)
स्पर्धेत आलेल्या दहा कविता खालीलप्रमाणे:-
१)
आणंद ! कोण आम्ही काय
Submitted by रामजोशी on Sat, 05/11/2011 - 17:50.
आणंद !
कोण आम्ही काय पुसता
फोटो काढती वाकडे
ते धाकटे आम्ही थोरले
आणंदी आम्ही गे.
२)
आमची प्रेरणा आजही तू आली
Submitted by वल्ली on Sat, 05/11/2011 - 17:12.
आमची प्रेरणा
आजही तू आली नाहीस
तूही त्या पहिल्या गायीसारखीच झाली आहेस, बेभरवशी.
चरण्याची सवय लावून गुडूप होऊन जातेस.
पण मग मी वाट पाहात राहतो,
तू येण्याआधीच्या इतर गायींची,
चरणार्या इतर बैलांची, वासरांची
वैताग आणणार्या शेणाच्या वासांची,
कारण मला माहित असते, कि या सर्वांनंतर,
तू येणार आहेस,
माझ्याबरोबर चरत राहून, माझ्या वाटेचा
चारा पण खाउन टाकणार आहेस.
आजही तू आली नाहीस,
मी मात्र रोजच्या प्रमाणे उद्याही येईन,
माझ्या वाटेचा चारा खायला.
३)
या माडबनी झडकरि ये
Submitted by गवि on Sat, 05/11/2011 - 17:28.
या माडबनी झडकरि ये गायगडे..
हे वृषभवृषण पडले तुजवाचुनि कोरडे..
खच्चुनि लाव जोर प्रिये, तोड तुझा कासरा..
भेट माझी म्हणुनि उदरि घेऊनि जा वासरा..
४)
माझा प्रयत्न
Submitted by ५० फक्त on Sat, 05/11/2011 - 19:32.
बैलाचे मनोगत.....
सागरतीरी एकदातरी मी असं करणार आहे
कॅमेरासमोर कुणाच्या तरी ताठ उभं राहणार आहे
वाळुतल्या खेकड्यांचे अन झाडावरच्या कावळ्यांचे
भरभरुन फोटो काढणा-या या वेड्या माणसांना
माझं मस्तवाल अन राजबिंडं रुप दाखवणार आहे
कॅमेरासमोर.....
आज तु आलास, मला बरं वाटलं
तुझ्या हातात कॅमेरा पाहुन का़ळीज भरुन आलं
काढ बिनधास्त फोटो आज मीच तुला घाबरणार आहे
कॅमेरासमोर....
जाता जाता एक कर माझा मित्र म्हणुन
त्या धनाच्या चंद्रिला हा फोटो दाखव दुरुन
उद्यापासुन मि त्याला सॉलिड खुन्नस देणार आहे
कॅमेरासमोर.......
५)
रिकामा बैल फोटोच्या कामी फोटो
Submitted by अनिल आपटे on Sun, 06/11/2011 - 11:52.
रिकामा बैल फोटोच्या कामी
फोटो काढण्याची shakkal nami
रंग सुंदर kalabhor
वयाने to आहे पोर
kavita कधी केली नाही
वाकड्यात कधी शिरलो नाही
आनंद अथांग sagaracha घेण्याला
नजर vedhate कुणी milel का जोडीला
tumhi kadhalela फोटो mala avadala
६)
पहिला प्रयत्न
Submitted by किशोरअहिरे on Thu, 10/11/2011 - 17:22.
"धनाजिराव वाकडे
हे काय करुन राहिले गडे
टाकता गुरा ढोरांचे फोटो वाकडे तिकडे
परत असे कराल तर पडतील गालावर जोडे
(Sonar Of Thoughts) म्हणुन कवीता करायला.. वाटलो का आम्ही येडे
आता जरा चांगले फोटो टाका ईकडे
मग मिळतील तुम्हाला गुलाब जामुन आणी पेढे"
७)
किती पाहू वाट समुद्राच्या
Submitted by रेवती on Fri, 11/11/2011 - 22:47.
किती पाहू वाट समुद्राच्या तटी
कधी होई भेटी, तुझी माझी.||१||
मनी येई शंका जरी असे लघु
आवडे का राघू, दुसर्यांचा.||२||
वर निळे स्काय, खालती वॉटर
आवडे पिटर, का गं तुला.||३||
दृष्टी झाली क्षीण, जग हे कनिंग
डोळा येई भिंग, आता माझ्या.||४||
८)
ही घ्या आठवी
Submitted by पैसा on Sat, 12/11/2011 - 16:39.
फक्त दहा कविता व्हायला पाहिजेत या उदात्त हेतूने ही कविता पाडलेली आहे. "जिथे सागरा" या गाण्याबरोबर साम्य आढळल्यास मी जबाबदार नाही.
जिथे वाळूला सागर मिळतो,
तिथे तुझी मी वाट पहातो||
गोठ्यात सरकी पेंड खाऊन
लोकांच्या शेतात रोज चरून
रस्त्यात धावून, माती उडवून मी,
दावे गळ्यातील फेकून येतो ||
बघुनी नभीची चंद्रकोर ती
कुत्र्याना भुंकाया येते स्फूर्ती
कुत्र्यांना पळवूनी, बैलांशी झुंजूनी
गायींच्या कळपाला साद घालतो||
अजुन दोन कविता येउद्यात !!!
९)
माझीही एक कविता!!
Submitted by मोहनराव on Sun, 13/11/2011 - 16:00.
मी कधीच कविता केल्या नाहीत, पण धनाजीरावांचा धागा पाहुन राहवले नाही.
जमली आहे का ते सांगा. तुम्हीहि बदल सुचवु शकता!!
चाल- हम्मा हम्मा (बॉम्बे सिनेमा)
हम्मा हम्मा
तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली
अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली ||धृ||
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हि पहिली भेट आपली, तुझ्यावर जीव जडला
अरे प्रियतमा मी तुझ्यावर, माझा जीव उधळला
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
काळीभोर तगडी जवानी, तुला मिळाली सखया
तुझे रुपडे हे बघून मी तर घायाळ झाले सखया
शेपटी झोकदार तुझी शिंगे धारदार तुझी
हरपून गेले मी तुझ्यावर राया
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली
अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
शेखाडी गावचा नयनरम्य हा किनारा
तुला पाहून मी विसरले दिलबरा
मालक आणाया गेलाय चारा
दावण सोडून मी आलेय भराभरा
म्हणून सोडून तुझा हा रागीट तोरा
चल आपण होऊन जाऊ नौ दो ग्यारा
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली
अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
(नवखा कवी) मोहन.
१०)
फक्त निकाल लागावा याकरिताच
Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 16/11/2011 - 21:06.
रेवतीजी,
तुमच्या वरील आवाहनास अनुसरून केवळ स्पर्धेचा निकाल लागावा या उद्देशाने माझ्या मनात आल्या तशा काही ओळी इथे मांडत आहे.
तुला माझ्याविषयी नेमकं काय वाटतं तेच मला समजत नाही.
माझ्या प्रियेला तू माता म्हणतोस मग मला पिता का मानत नाही?
माझ्या वाटचं दूध पळवून मला शेतात राबायला लावतोस,
आणि वर्षातून एक दिवस मला सूटी देऊन माझी पुजा करतोस.
बिनडोक कष्ट करणार्यालाही माझीच उपमा देतोस आणि
ऐतं खात बसून राहणार्यालाही बैलोबा म्हणतोस हे कोडं काही सुटत नाही.
बरं मला डोकं नाही असं मानतोस
तर जिथे बुद्धी पणाला लागते तिथे माझा पुतळा लावुन सट्टा तरी कसा काय खेळतोस?
काय असेल ते असो पण मला रिकामा बसव रे कधी तरी
कारण त्याशिवाय तुला कोणी अतिशहाणा जाणत नाही.
मला वाटते मी स्पर्धेसाठी आवश्यक ती तांत्रिक गरज पूर्ण केली आहे.
25 Nov 2011 - 2:57 am | रेवती
छे!!
पाभेंनी अगदी सिरियस करून टाकले.
अहो महाराज, खेळीमेळीच्या स्पर्धेत असा विचार करू नका.
आमच्यासारखे ;) मोठ्या मनाचे कवी, कवयित्री वाईट वाटून घेणार नाहीत.
मला स्वत:ला वल्ली आणि गविंच्या कविता आवडल्या.
समजा तुम्ही त्यांना किंवा दुसर्या कुणाला पयला लंबर दिलात तर मला आनंदच होईल.
25 Nov 2011 - 8:42 pm | धन्या
अगदी अगदी.
पण तरीही पाभेंनी मनापासून दिलेला प्रतिसाद आवडला. विस्तृत प्रतिसाद उदया देईन. शुक्रवारची संध्याकाळ असूनही अगदी रात्री पावणे नऊ वाजताही आम्ही हापिसात किबोर्ड बडवत आहोत. :(
28 Nov 2011 - 4:01 pm | पाषाणभेद
सदर स्पर्धेचा निकाल येथे आहे.