ओल
चुकवले वार शस्त्रांचे , सुकल्यात सर्व जखमा
नाजूकशी फुलांची,पण्.....ती चीर चिघळती आहे !
थकली कधीच गात्रें , आता आधार लागे
तरिही उरांत कुठली , ही धाव उधळती आहे?
सांजावले कधीचे, बघ, पक्षी उडून गेले
"घे,भरारी घे" ची पण साद हुरळती आहे !
शमवीत वेदनांना धन्वंतरी उगाच
"होकार" ऐकण्याची सणक उसळती आहे !
सरणावरी कधीचे, अश्रू सुकून गेले
फुटल्या घड्यांत मात्र.....ती "ओल" निथळती आहे.....ती "ओल" निथळती आहे !
---------------------------------------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे-----------------०३-नोव्हेंबर २०११, दु. २ वा.------
प्रतिक्रिया
4 Nov 2011 - 1:27 am | राघव
चांगली रचना.
अर्थात् आणिक चांगल्या प्रकारे मांडता येईल.
पु. ले. शु.
राघव