|| श्री गुरवे नम: ||
पुण्यामध्ये ओरिगामी प्रदर्शन
पुण्यातील मिपाकरांसाठी : गुरुवार, ३ नोव्हेंबर ते रविवार, ६ नोव्हेंबर या चार दिवसांत टिळक स्मारक मंदिरात सकाळी १० ते रात्री ८ या वेळात ओरिगामी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात माझ्याही काही कलाकृती (टॅसलेशन्स) ठेवलेली असतील. मिपाकारांनी जरूर भेट द्यावी. या कलेमध्ये रस निर्माण होऊन तुम्हाला ओरिगामी शिकायची इच्छा असेल तर त्यासाठी कार्यशाळाही नंतर घेण्यात येतील. प्रदर्शनाच्या ठिकाणी याविषयी सविस्तर माहिती मिळेल.
ओरिगामी मित्र या संस्थेतर्फे हे प्रदर्शन आयोजित केले आहे. पुण्याच्या सौ. इंदूताई टिळक आणि मुंबईच्या गीताबेन कांटावाला यांच्या पुढाकाराने १९८१मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे सभासद आता भारतभर पसरले आहेत. ओरिगामीच्या प्रसारासाठी दर वर्षी मुंबईला / पुण्याला आलटून पालटून हे प्रदर्शन भरवलं जातं. गेल्या वर्षी डिसेंबर २०१०मधे मुंबईला होतं, आता या वर्षी पुण्यात. यासाठी आम्ही सर्व सभासद निरनिराळी मॉडेल्स (ओरिगामी वस्तू) तयार करून प्रदर्शनात मांडतो.
ओरिगामी ही मूळची जपानी कला. ओरु=घड्या, कामी=कागद. फक्त कागद (आणि आपल्या हाताची बोटं) वापरून अनेकविध गोष्टी बनवल्या जातात, त्यासाठी गोंद आणि कातरी अजिबात न वापरता. फुलं, फुलपाखरं, प्राणी, पक्षी, कीटक, माणूस, डायनोसॉर, सजावटीसाठी सुंदर वस्तू, विविध आकाराचे डबे, वाट्या / वाडगे इ. तयार करता येतात. टॅसलेशन, किरीगामी, स्नॅपॉलॉजी हे ओरिगामीचे आणखी इतर प्रकार. यापैकी ‘स्नॅपॉलॉजी’व्यतिरिक्त सगळ्या वस्तू एकाच कागदापासून बनतात. मोड्युलर ओरिगामी या प्रकारात एकाच पद्धतीने अनेक तुकडे तयार करून ते एकमेकात अडकवून वस्तू तयार होते, अर्थात, गोंद न वापरता. हे सर्व प्रकार पाहून मन मोहून जातं.
माझी ओरिगामी
ओरिगामीचे जवळजवळ सर्वच प्रकार मी करून बघितले आणि ते मला जमले, आवडले. त्यातले काही नमुने या भागात पेश करत आहे.
काही फुलं
फुलं असतील तिथे फुलपाखरंही येणारच, नाही का ?
डॅफोडिल हे फूल षटकोनी कागदापासून तयार केलं आहे.
सजावटीसाठी हे 'डेलिया'
दशकोनी कागदापासून हे 'डेकास्टार'
'डेकास्टार' अतिशय पातळ, पारदर्शक पण चिवट कागदापासून केलं आहे, त्यामुळे ते दिव्यासमोर धरल्यावर असं दिसतं
टॅसलेशन हा ओरिगामीचा एक आकर्षक प्रकार. दिव्यासमोर ते धरल्यावर अतिशय सुंदर दिसतं.
एक अत्यंत सुंदर टॅसलेशन आणि ते दिव्यासमोर धरल्यावर त्याचं सुंदर रूप
षटकोन आणि त्रिकोन यांचं हे एक टॅसलेशन
राँदँ (उच्चाराची चूभूदेघे) या शिल्पकाराचं प्रसिद्ध शिल्प 'द थिंकर'ची ओरिगामी प्रतिकृती
शेवटी, अमेरिकन ओरिगामी संस्थेने भेट म्हणून हे 'ओरिगामी बग' आम्हाला पाठवले. ते लॅमिनेट करून त्याच्या मागे लोहचुंबक लावलं आहे.
आणखी काही नमुने, ओरीगामीचे फायदे, उपयोग वगैरे पुढील भागात.
प्रतिक्रिया
3 Nov 2011 - 2:21 am | रेवती
मोहवून टाकणारे प्रकार आहेत.
पारदर्शक कागदापासून तयार केलेले प्रकार पहिल्यांदाच पाहिले.
मला अनेक वर्षांपासून ओरिगामीचा एकच प्रकार करता येतो..........कागदाची होडी.;)
3 Nov 2011 - 8:50 am | किसन शिंदे
रेवती तै, फक्त कागदाची होडीच का? इवाईन नाही का? ;)
मला तर ब्वॉ कागदाची होडी आणी विमानं दोन्ही आवडतात. :)
3 Nov 2011 - 7:59 pm | रेवती
अरे हो! मी विमानाचं विसरून गेले.
3 Nov 2011 - 2:31 am | सुहास झेले
सही... !!
3 Nov 2011 - 9:08 am | जाई.
छान
मलासुध्दा ओरिगामीतील होड्या आणि विमान एवढच जमत
3 Nov 2011 - 9:52 am | पूनम ब
सर्वच प्रकार अप्रतिम आहेत. :)
3 Nov 2011 - 10:10 am | कच्ची कैरी
लहानपण आठवले सर्व फोटो बघुन.
3 Nov 2011 - 10:32 am | विलासराव
छानच प्रकार दिसतोय हा ओरिगामी.
आवडला.
3 Nov 2011 - 11:24 am | दादा कोंडके
यु-ट्युबवरचे विडिओ बघुन एकदा फुलपाखरु करण्याचा प्रयत्न केला होता.
पण जाड्याभरड्या हातांनी नाजुक घड्या घालताना दमछाक झाली आणि तो नाद सोडून दिला.
3 Nov 2011 - 1:58 pm | मदनबाण
छानच... :)
3 Nov 2011 - 2:04 pm | पैसा
अशाच पिंगूने केलेल्या काही कृतींची आठवण आली.
http://www.misalpav.com/node/14713
12 Nov 2011 - 11:56 am | सूड
>>अशाच पिंगूने केलेल्या काही कृतींची आठवण आली.
अगदी, हेच म्हणायचं होतं.
वरील कलाकृतीसुद्धा आवडल्या गेल्या आहेत.
23 Nov 2011 - 7:34 pm | सुधांशुनूलकर
होय, पिंगूने मला हा धागा व्यनि पाठवला होता. त्याने केलेल्या हंसाच्या प्रकाराला '३-डी ओरिगामी' म्हणतात. मी मात्र ३-डी ओरिगामी फारशी केली नाही. यासाठी ३५० ते ५०० तुकडे बनवावे लागतात. माझ्यासारख्या मुलखाच्या आळ्शी प्राण्याला हे अंमळ कठीणच !
3 Nov 2011 - 2:12 pm | पिंगू
वावा.. आता तुम्हाला भेटलंच पाहिजे..
- पिंगू
3 Nov 2011 - 2:15 pm | गणपा
इथे टप्या टप्याचे फोटु टाकुन आम्हालाही काही धडे गिरवायला लावा हो सुधांशुराव.
पुभाप्र.
3 Nov 2011 - 8:02 pm | रेवती
असेच म्हणते.
सुधांशू, अगदी सोप्या असलेल्या प्रकारांनी सुरुवात नाही का करता येणार?
आम्ही फोटू पाहून घड्या घालू.
3 Nov 2011 - 2:46 pm | वपाडाव
हे सर्व फटु पाहुन लहानपणी किसमी टॉफी (चाराण्याची) चॉकलेटच्या कव्हर पासुन केलेल्या बाहुल्यांची आठौण झाली...
कुणी केल्यात का अशा बाहुल्या?
3 Nov 2011 - 5:05 pm | चित्रा
हे असे धागे आले की यातील प्रत्येक कला आपल्याला येत असावी अशी उगाचच इच्छा तयार होते.
3 Nov 2011 - 6:56 pm | नरेंद्र गोळे
सुंदर कलाकृती! आवडल्या!!
4 Nov 2011 - 8:01 pm | सुधांशुनूलकर
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
रेवतीताई, किसनराव, जाईताई : पारदर्शक कागदापासून तयार केलेला - टॅसलेशन - हा ओरिगामीतला थोडासा अप्रसिध्द प्रकार, त्यापेक्षा प्राणी, पक्षी, कीटक, शोभेच्या सजावटीच्या वस्तू, बॉक्सेस जास्त प्रचलित आहेत, हे खरं.
ओरिगामी करणार्या प्रत्येकाची सुरुवात होडी-विमानाने होते. तुम्ही होडी-विमान केलंय ना ? मग, आता तुम्हाला पुढची ओरिगामी नक्कीच येईल.
चित्राताई, वडापाव : ओरिगामी शिकण्यासाठी, जोपासण्यासाठी आपण जन्मजात कलाकार असण्याची मुळीच आवश्यकता नाही, कुणीही ही कला सहज शिकू शकतं, हेच या कलेचं वैशिष्ट्य. (त्यामुळेच, घरातले सर्वजण एकत्रितपणे या कलेचा आनंद घेऊ शकतात.) म्हणूनच, ही कला आपल्याला यावी अशी (उगीचच) इच्छा झाली, तर शिकायला विनाविलंब सुरुवात करा. तुम्हाला ओरिगामी नक्कीच येईल.
गणपा, तुमच्या सूचनेचं स्वागत, जरुर प्रयत्न करतो. प्रत्येक टप्प्याचा फोटो / आकॄतीने दा़खवून काही सोप्या वस्तू कशा शिकवता येतील यावर विचार करतो.
3 Nov 2011 - 8:23 pm | स्मिता.
ओरिगामी बघून शाळेचे दिवस आठवले. कागदी होडी, विमानं आणि शाळेच्या अभ्यासक्रमातल्या वस्तूंपुढे माझी मजल तरी गेली नव्हती.
सगळे फोटो मस्तच. पातळ कागदाचे, दिव्यासमोर धरायचे ओरिगामी खूप आवडले.
3 Nov 2011 - 9:50 pm | मीनल
खूप खूप छान
4 Nov 2011 - 12:35 am | प्राजु
वॉव!! खूप भन्नाट प्रकार आहे हा,
आमच्या ओळखीमध्ये एकाने.. ओरीगामी मध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदीराची प्रतिकृती केली होती.
4 Nov 2011 - 3:34 pm | मराठमोळा
सिंपली सुपर्ब!!!!
:)
4 Nov 2011 - 4:19 pm | दीप्स
खुपच छान !!
आतिशय सुन्दर !! शाळेतील दिवस आठवले. साधी होडी, नांगर होडी, कमळाचे फुल, फोटो फ्रेम अशा कलाक्रुती केल्या आहेत.
4 Nov 2011 - 4:47 pm | विनीता देशपांडे
सर्वच कलाकृती सुंदर्,,,मला शिकायला आवडेल
4 Nov 2011 - 7:58 pm | सुधांशुनूलकर
विनीताताई, तुम्हाला ओरिगामी शिकायला आवडेल हे वाचून आनंद झाला. तुम्ही पुण्यात राहाता ना ? मग हे प्रदर्शन नक्की बघा. प्रदर्शनस्थळी स्वागतकक्ष / माहितीकक्षामधे ओरिगामी कार्यशाळेविषयी चौकशी करा आणि त्यामधे सहभागी व्हा. ओरिगामी शिकायची ही सुवर्णसंधीच आहे, शुभस्य शीघ्रम् !
शुभेच्छा आणि happy folding.
दीप्स, मराठमोळा, प्राजुताई, मीनलताई, स्मिताताई
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सुधांशु
5 Nov 2011 - 12:00 pm | रश्मि दाते
नागपुरला आहे का हा कल्ब ?मलाही शीकायची आहे म्हणुन विचारत आहे आपल्याला
10 Nov 2011 - 11:59 pm | सोत्रि
सुंदर!
- (कागदी नसलेला हाडामांसाचा) सोकाजी
अवांतर: योगप्रभु कुठे आहात????? 'तुमची' ओरिगामीची कला आता मिपाकरांसमोर आणायची वेळ झालेली आहे;)
11 Nov 2011 - 2:24 am | शिल्पा ब
मस्त.