अर्पणपत्रिका

राजघराणं's picture
राजघराणं in जे न देखे रवी...
31 Oct 2011 - 5:35 pm

(चाल : जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया)

शब्दाला वाचेला काव्याला श्रद्धेला जेथे अर्थ प्राप्त झाला
अर्थाचा परमार्थ परमात्म्याचा स्वार्थ जेथून व्युत्पन्न झाला, - - त्या स्वराला

अर्पिता मम काव्य ॐ कारा तत्तक्षण काव्याचा जो मंत्र झाला
मंत्र तो गाउनी समिधा ती अर्पूनी जो धूम्र उत्पन्न झाला, - - त्या धुराला

अवकाश जे व्याप्त त्यासही भेदून एकमात्र जो बाण गेला
बाणाची प्रत्यंचा प्रत्यंचेचे बल बलाचा उद्गम त्या उद्ग्माला, - - वंदिताना

जो भाव बुद्धीचा विवेक नामाचा त्याचाहि जो अंतरात्मा तद् भावनेला, - - - - - -

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Oct 2011 - 5:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काहीतरी छान आहे एवढेच कळले!! :(
निटसे समजले नाही.
त्या फटूचा काय संदर्भ लागत नाहीये!!