अर्घ्य

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
21 Sep 2011 - 8:17 am

संध्याकाळ इतक्यात कशी झाली,
काही कळलंच नाही.
आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य
उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही.

आणि अचानक अंधार झाला,
मिणमिणत्या पणत्यांनी जेमतेम दिसणारा, थरथरणारा
केविलवाण्या, धूसर सावल्या हलवणारा

एकएक करून त्याही विझल्या.
शेवटची ठिणगी गेली, एव्हाना ढिली पडत गेलेली
आशेची साखळी तोडत.

उरले एकेकाळी त्या सूर्याच्या तेजाने दिपलेले डोळे
क्षितिजांपर्यंत फाकलेल्या
किरणांची आठवण घेऊन

क्षितिजं विस्तारल्यावर
त्या डोळ्यांनी ग्रहणंही बघितली होती
पाहिले होते अधूनमधून साचणारे काळेकुट्ट ढग
सूर्याचे जमिनीत रुतलेले मातीचे पायही
दिसायचे राहिले नव्हते.

उमलत्या ज्योतीने तेजाशी घेतलेल्या टकरा
त्या कशा विसरता येतील?

पण आता, या अंधारानंतर आठवताहेत
पहाटेची आश्वासक उबदार किरणं
त्यांनी उल्हसित केलेली प्रेमळ मोकळी हवा
विचारांच्या पेटणाऱ्या नवीन ज्योती
आणि आसमंत उजळून टाकणाऱ्या
सोनसकाळीचा स्वच्छ प्रकाश

अंधार झाला असला तरी
तोच प्रकाश माझ्यात तेवतो आहे.

- वडिलांना अर्पित. २० सप्टेंबर २०११

शांतरसकविता

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 9:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

.

श्रावण मोडक's picture

21 Sep 2011 - 9:35 am | श्रावण मोडक

:(

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Sep 2011 - 9:56 am | बिपिन कार्यकर्ते

:(

ऋषिकेश's picture

21 Sep 2011 - 9:58 am | ऋषिकेश

:(

नंदन's picture

21 Sep 2011 - 11:32 am | नंदन

काहीही लिहिलं तरी ते शब्दबंबाळ होईल....

मूकवाचक's picture

21 Sep 2011 - 12:19 pm | मूकवाचक

सहमत.

चित्रा's picture

21 Sep 2011 - 6:04 pm | चित्रा

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2011 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

21 Sep 2011 - 11:40 am | प्यारे१

खूपच प्रामाणिक आणि तरल.
आपल्या वडिलांना नमस्कार.

स्वगतः आणि हे म्हणे नास्तिक...!

धन्या's picture

21 Sep 2011 - 12:44 pm | धन्या

छान लिहिलंय !!!

विसुनाना's picture

21 Sep 2011 - 12:49 pm | विसुनाना

.

उदय के'सागर's picture

21 Sep 2011 - 1:47 pm | उदय के'सागर

.

निखिल देशपांडे's picture

21 Sep 2011 - 2:20 pm | निखिल देशपांडे

:(

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2011 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा

@-क्षितिजं विस्तारल्यावर
त्या डोळ्यांनी ग्रहणंही बघितली होती
पाहिले होते अधूनमधून साचणारे काळेकुट्ट ढग
सूर्याचे जमिनीत रुतलेले मातीचे पायही
दिसायचे राहिले नव्हते.---- वाहव्वा... कीती मूर्तीमंत भावना उभ्या राहील्यात... खूप मनःशांती देणारं काव्य बरेच दिवसांनी वाचायला मिळालं... हे आपण आपल्या वडीलांना समर्पित केलय,अणी नावही अर्घ्य असं दिलय...आपल्या विनम्र प्रतिभेला आमचा नम्र सलाम...

सुहास झेले's picture

21 Sep 2011 - 5:50 pm | सुहास झेले

आपल्या विनम्र प्रतिभेला आमचा नम्र सलाम...

शहराजाद's picture

21 Sep 2011 - 5:24 pm | शहराजाद

आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य
उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही.

सूर्य कधी ना कधी अस्ताला जाणार हे सार्‍यांनाच ठाऊक असतं.
अणि तरीही, तो मावळताना होणार्‍या यातना टळत नाहीत.
:(

प्रभो's picture

21 Sep 2011 - 8:30 pm | प्रभो

:(

जाई.'s picture

21 Sep 2011 - 9:10 pm | जाई.

निशब्द

पैसा's picture

21 Sep 2011 - 9:34 pm | पैसा

त्या मावळत्या सूर्याला माझंही अर्घ्य.

५० फक्त's picture

22 Sep 2011 - 12:00 am | ५० फक्त

घर थकलेले संन्यासी ची आठवण झाली एकदम. आवडलं.

चतुरंग's picture

22 Sep 2011 - 12:05 am | चतुरंग

_/\_

-रंगा

प्रकाश१११'s picture

22 Sep 2011 - 12:37 am | प्रकाश१११

एकदम छान लिहिलीत कविता .आवडली..!!

शुचि's picture

22 Sep 2011 - 1:27 am | शुचि

अकाशात तळपणारा दैदीप्यमान तेजोमय सूर्य! ज्याच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकणार नाही असा तेजोमय भास्कर. In our astrological chart, the Sun represents our main identity, personality, and outward appearance. On a deeper level, the Sun represents the father figure in our life. Our father figure represents a powerful person in our life and can have a significant impact on each of us for good or bad.
____________________

कविता अतिशय आवडली. खूप खूप आवडली.

क्रेमर's picture

22 Sep 2011 - 1:56 am | क्रेमर

वरील सर्वांशी सहमत.

धनंजय's picture

22 Sep 2011 - 5:25 am | धनंजय

.

ढब्बू पैसा's picture

22 Sep 2011 - 6:15 am | ढब्बू पैसा

:(

किसन शिंदे's picture

22 Sep 2011 - 9:28 am | किसन शिंदे

:(

कवितानागेश's picture

22 Sep 2011 - 3:32 pm | कवितानागेश

:(

शैलेन्द्र's picture

23 Sep 2011 - 9:51 am | शैलेन्द्र

कायं लीहु.. मनातल सार भळभत बाहेर आलंय.. आतुन हलवुन गेली ही कवीता..

गणेशा's picture

23 Sep 2011 - 2:04 pm | गणेशा

कविता खुपच आवडली ...

असेच लिहित रहा... वाचत आहे ...