प्रिय मित्र...!गणपती बाप्पा ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
19 Sep 2011 - 12:18 am

किती वर्षे झाली
आपली घट्ट दोस्ती होऊन
नाव तर ऐकून होतो
नवसाला पावतोस म्हणून
मग अचानक ओळख झाली
७ -८ वर्षाचा होतो तेव्हापासून
तेव्हाच तुला मी मित्र केला
परीक्षेच्या दिवशी तुला नमस्कार केला
नि पेपर मला सोपा गेला
शप्पत ...!
हे अगदी खरे सांगतोय बाप्पा तुला ...!
अगदी मनापासून... !!

मित्र म्हणून तुझे किती लाड केले
गणेश उत्सवात तुला बाबांनी घरी आणले
नि मी तुझ्यासाठी काय काय केले
डोंगर केले....
वळणावळणाचा घाट रस्ता केला
पांढर्या शुभ्र खडूचे छोटे छोटे दगड तयार केले
रस्ता सुंदर झाला
हरळी पेरून डोंगर हिरवा केला
स्वर्गाहून सुंदर असे घर केले
गणपती बाप्पा आठवतेय ना तुला हे सगळे ..?

पण मला धड कधी पूजा नाही करता आली
संध्येची पळी कधी नाही नीट धरता आली
आचमन की काय तेपण कधी नाही जमले
हसला असशील मनातल्या मनात
तरी मला तू सांभाळून घेतलेस

काळ बदलला
घरे बदलली,
छोटी झाली
आता तुझ्या आगमनाला नाही बनवीत ते डोंगर ,रस्ते
ती हिरवळ
मुलेच तुझ्यासाठी आणतात मखर ..दिवे ,माळा.!!
वगैरे वगैरे
आणखीन काही नि काही...

पण आजकाल खरेच
मनाची ताकद कमी होऊन जाते कधी तरी
मनाची ब्याटरी लो होऊन जाते
मग मी भटकून येतो तुझ्या जुन्या डोंगर आठवणीत
तुझ्या आठवणीत जातो रमून मनसोक्त
नि विसरून जातो स्वताला
नि बाप्पा शप्पत
माझ्या मनाची ब्याटरी चार्ज होऊन जाते
बाप्पा ही पण तुझीच कृपा असते
आभाळभर पसरलेली ,,,!!

शांतरसकविता

प्रतिक्रिया

जाई.'s picture

19 Sep 2011 - 11:07 am | जाई.

नेहमीप्रमाणेच उत्तम कविता

आवडले

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Sep 2011 - 12:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मनाची ब्याटरी लो होऊन जाते
मग मी भटकून येतो तुझ्या जुन्या डोंगर आठवणीत
तुझ्या आठवणीत जातो रमून मनसोक्त

हि कल्पना आवडली. कविता छानचं!!

पैसा's picture

19 Sep 2011 - 8:34 pm | पैसा

कविता आवडली.

निवेदिता-ताई's picture

19 Sep 2011 - 8:46 pm | निवेदिता-ताई

:)

मस्त कविता ..
नेहमीप्रमाणे छान ..
आणि नेहमीप्रमाणेच काळाच्या पडद्याला उलगडुन पाहणारे शब्द

सुहास झेले's picture

19 Sep 2011 - 10:32 pm | सुहास झेले

छान जमलीय !!

पाषाणभेद's picture

20 Sep 2011 - 5:33 am | पाषाणभेद

अरे काय हे! परागचा शंकर अन आपला गणपती!!

>>> डोंगर केले....
वळणावळणाचा घाट रस्ता केला
पांढर्या शुभ्र खडूचे छोटे छोटे दगड तयार केले
रस्ता सुंदर झाला
हरळी पेरून डोंगर हिरवा केला

एकदम बर्रोबर, सगळ्यांच्या लहाणपणाच्या आठवणी जवळपास मिळत्याजुळत्या असतात काय?

मस्त काव्य पकाकाका
(पकाकाका..पकाकाका असे प्रेमानं म्हणतो हो. आमच्या घराशेजारीच एक प्रकाश होते. त्यांना पकाकाका म्हणत असू आम्ही.)

प्रकाश१११'s picture

22 Sep 2011 - 12:40 am | प्रकाश१११

सर्वांचे मनापासून आभार ..!!

चाल क बि.एन's picture

22 Sep 2011 - 4:09 pm | चाल क बि.एन

लहाणपणाच्या आठवणी ..
जवळपास तस्याच.....
काय पन किति काळ् मनात घर करुन असतात नाहि ?
सुन्दर हितगुज.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2011 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त कविता.

-दिलीप बिरुटे

प्रकाश१११'s picture

27 Sep 2011 - 4:38 am | प्रकाश१११

दिलीप बिरुटेजी -आपले मनापासून आभार ..!!