रमा

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
15 Sep 2011 - 2:37 am

समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर आली. कौस्तुभ मणी, पारीजातक, कामधेनु गाय, अमृत , ध्न्वंतरी, वीष, चंद्र वगैरे वगैरे. पैकी लक्ष्मी ही देवी सुद्धा या १४ रत्नांतच गणली जाते. ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे.

कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला
क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा.
पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना
जिचा अनुज असे चंद्रमा,
अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला.

चंचल चंद्र जिचा भाऊ आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमा, शेवटी विष्णूच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.

शांतरसकविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

15 Sep 2011 - 2:42 am | पाषाणभेद

छान आहे. एखादे संस्कृत सुभाषिताचा मराठी अनुवाद वाचतो आहे अशी अनुभुती आली.

धन्यवाद पाभे.
"पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना" ही विशेषणे लक्ष्मी अष्तोत्तरशतनामावली वगैरे मधून उचलली आहेत :(

मूकवाचक's picture

15 Sep 2011 - 9:11 am | मूकवाचक

असेच म्हणतो.

आज आमचे होजे पल्याडचे काका असते तर
>>ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी

"लकी बास्टर्ड", असे म्हणाले असते.

त्यांच्या आठवणीने ड्वाले पानावले.

प्रकाश१११'s picture

15 Sep 2011 - 2:57 am | प्रकाश१११

शुची ताई - वा ..!!खूपच सुरेख निव्वळ ....!!
कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला
क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा.
..

स्पंदना's picture

15 Sep 2011 - 5:28 am | स्पंदना

अरे वा शुची ? किती छान लिहिल आहेस.

कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला
क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा.

अगदी सह्ज ताल येतो वाचता वाचता. सुंदर !

पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना
पद्म या शब्दाची द्विरुक्ती सुंदर ! पण क्षीराब्धीतनया नंतर छोटासा पॉज घ्यावासा वाटतोय, अन मग चंद्र्वदना, मला वाटतय लावण्या नंतर पण एक पॉज चालेल

जिचा अनुज असे चंद्रमा,
अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला

सुरेख ग ! सुरेख ! चारच ओळी पण सुरेख !

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 5:39 am | नगरीनिरंजन

चार ओळी आवडल्या. कविता पूर्ण केली असतीत तर छान झाली असती.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Sep 2011 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

रचनेचा प्रयत्न बराच चांगला आहे,,,पण हीचे व्रुत्त काय समजावे,की अनाव्रुत्त समजावे...पण अनाव्रुत्तही म्हणता येत नाही... :-(

राहुन राहुन काही तरी राहिल्यासारखे वाटते...

चित्रा's picture

15 Sep 2011 - 5:18 pm | चित्रा

कविता छान आहे. आवडली. स्तोत्रासारखी आहे.

मला वृत्त वगैरे कळत नाही, त्यामुळे ही कशी म्हणायचे कळले नाही.
हल्ली फ्याशन आहे त्याप्रमाणे कवितेची श्राव्य फाईल (ऑडिओ) टाकू शकशील का?

चित्रा अगं ऑडीओ फाईल कशी करायची माहीत नाही. अर्थात ते मी अदिती ला विचारू शकते. पण त्यात नेमका हवाबदलामुळे, घसा बसला आहे :(
पण प्रयत्न करते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2011 - 10:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऑडीओ फाईल बनवण्यासाठी, अर्थात रेकॉर्डींगसाठी मी ऑडेसिटी नावाचं सॉफ्टवर वापरते. तुझ्या मोबाईलमधे सोय असल्यास त्यातही रेकॉर्डींग करता येईल. या फाईल्स इ-स्निप्स इ ठिकाणी अपलोड करून इथे दुवा देता येईल.

मूळ कवितेबद्दलः इतर १३ रत्न, म्हणजे वस्तूंबरोबर लक्ष्मी आली आणि विष्णूच्या पायाशी बसली ही पुरूषप्रधान कल्पना मला टाकाऊ वाटते. त्यामुळे कवितेचा आस्वाद वगैरे घेणं मला जमणार नाही.

माहीतीबद्दल धन्यवाद अदिती. मी एम पी ३ टाकून एम्बेडेड दुवा दिला होता सकाळी पण आवाज खूप बारीक असल्याने गाणे ऐकू आले नाही. मग काढून टाकला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2011 - 3:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझ्या मायक्रोफोनची सेटींग्ज पहा. माझा मायक्रोफोन अगदी तोंडाजवळ धरला तरच चांगलं रेकॉर्डींग होतं.

चित्रा's picture

16 Sep 2011 - 3:22 am | चित्रा

अदिती कविता आजच्या काळात माझ्या उपयोगाची नाही असे म्हणाली तर मला समजू शकते. बाकी समुद्रमंथन काय पण बरणीतले ताकही हल्लीच्या पोरी घुसळत नाहीत असे वाटते :-) पण खुद्द कवितेत लक्ष्मी नवर्‍याच्या पायाशी बसली असा उल्लेख नाही असे वाटते.
लक्ष्मी: स्थिरा न भवति असे म्हणतात. तसा उल्लेख इथे दिसतो आहे.
शिवाय एखादी बाई तिच्या नवर्‍याच्या पायाशी किंवा डोक्यावर किंवा इतर कुठे बसण्यात धन्यता मानत असली आणि त्याला चालत असले तर तो त्या मियाबिवीचा प्रश्न आहे. नाही का? :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2011 - 5:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एखादी बाई तिच्या नवर्‍याच्या पायाशी किंवा डोक्यावर किंवा इतर कुठे बसण्यात धन्यता मानत असली आणि त्याला चालत असले तर तो त्या मियाबिवीचा प्रश्न आहे. नाही का?

होय, अर्थात मी त्यांच्यात नाक खुपसायला जाणार नाही. फक्त ही मूल्य मला टाकाऊ वाटतात एवढंच.

पाषाणभेद's picture

17 Sep 2011 - 12:15 am | पाषाणभेद

ते जावूंद्या. विष्णू आला आणि लक्ष्मीच्या पायाशी बसला ही कल्पना कशी वाटते?

अवांतर: केरळात नायर समाज तसेच पुर्वेकडे खाशी-गारो या जमातीत कुटूंबात स्त्रीयांचे वर्चस्व असते. मातृसत्ताक कुटूंबपद्धती आहे तेथे. घरातले सर्व निर्णय मुख्य स्त्रीच घेते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2011 - 2:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विष्णू आला आणि लक्ष्मीच्या पायाशी बसला ही कल्पना कशी वाटते?

टाकाऊ.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Sep 2011 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

मूळ कवितेबद्दलः इतर १३ रत्न, म्हणजे वस्तूंबरोबर लक्ष्मी आली आणि विष्णूच्या पायाशी बसली ही पुरूषप्रधान कल्पना मला टाकाऊ वाटते.

विष्णुच्या जागी जॉन असता तर एकवेळे चालले असते.

श्रावण मोडक's picture

17 Sep 2011 - 11:45 am | श्रावण मोडक

रेकॉर्डींगसाठी मी ऑडेसिटी नावाचं सॉफ्टवर वापरते.

काही रेकॉर्डिंग्ज ऐकली होती. लोक हे का करतात, असा प्रश्न पडला होता. सॉफ्टवेअरच्या नावातच त्याचं उत्तर दडलं आहे हे तेव्हा माहिती नव्हतं. आता कळलं. ;)

प्राजु's picture

15 Sep 2011 - 7:23 pm | प्राजु

चांगली आहे कविता.

आवांतर : चंद्रवदना म्हणजे... चंद्र जीचा अनूज आहे असा अर्थ नसावा. चंद्रासारखा जिचा चेहरा आहे ती.. असा अर्थ असावा. आणि चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ होता हे मला माहिती नव्ह्तं. कारण शंख हा लक्ष्मीचा भाऊ होता असं वाचण्यात आलं होतं माझ्या.
बाबासाहेब पुरंदरे लिखित, 'राजा शिवछत्रपती' या महाग्रंथात, सुद्धा एका संदर्भात 'अमुक अमुक हा लक्ष्मी चा भाउ होता... म्हणजे शंख..." असा उपहासात्मक उल्लेख आठवतो.

प्राजु लक्ष्मीला चंद्रसहोदरी म्हटले जाते कारण दोघे क्षीरसागरामधून बाहेर आहे.

हे स्तोत्र ऐक -

आदिलक्ष्मी

सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममये l

मुनिगणमण्डित मोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते ll

पङ्कज वासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते l

जयजय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि सदा पालय माम् ll

शुचि's picture

15 Sep 2011 - 8:02 pm | शुचि

प्रकाटाआ

अभिजीत राजवाडे's picture

16 Sep 2011 - 8:17 am | अभिजीत राजवाडे

आवडले.

स्पा's picture

16 Sep 2011 - 8:41 am | स्पा

सहीच

इंटरनेटस्नेही's picture

17 Sep 2011 - 12:53 am | इंटरनेटस्नेही

धागा वाचायचा राहिला होता. चांगली कविता.

चित्रगुप्त's picture

17 Sep 2011 - 3:10 am | चित्रगुप्त

कविता तर आवडलीच, शिवाय लक्ष्मी अष्तोत्तरशतनामावली वाचायलाही आवडेल.

कॉमन मॅन's picture

17 Sep 2011 - 10:12 am | कॉमन मॅन

सुरेखच!

कॉमॅ