निर्वात--पोकळी

स्व's picture
स्व in जनातलं, मनातलं
11 Sep 2011 - 12:30 am

मी काय करतोय? मला काय करायचय? खरं तर मला काय करायचय ह्याचाशी तुम्हाला काय करायचय? कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का? की जरासे विध्वंसक आणि रजो-तम गुणी झालेले चालेल पण कर्म करणे योग्य? कशासाठी काय केले पाहिजे?ही वेळ काय करायची आहे? मी असा एका निर्वातात बसुन काय करतोय? एका रिकामटेकडेपणाने ही मनोपोकळी व्याप्त केली आहे का?हे रिकामपण चांगले की वाइट? वाइट असेल तर कुणासाठी? इतरांसाठी की माझ्याचसाठी? कुणी काहीच प्रतिसाद का देत नाही? मी एकटाच तासनतास पुन्हा पुन्हा सगळ्यांना संपर्क तरी किती करु? सगळे का टाळताहेत? काय झाले आहे? कुठे आहेत आई-बाबा? माझी .....माझी -ही कुठाय? मी एकटाच अंधारात काय करतोय? मी इथून कधी निघणार आहे? निघावेसे मला कधी वाटनार आहे? कुणामुळे वाटणार आहे?
मी संपलो तर ही पोकळी संपेल का? मी पोकळी संपवु का? ती संपेल ह्याची शाश्वती काय?मी संपलोय हे मला कसे कळणार? चला मला निघायला हवे. निघतोय.तुम्हाला सगळ काही सांगितलेलच आहे. कामाला येइल.

स्थिरचित्रविचार

प्रतिक्रिया

>> कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का?>>

"You show me a lazy p**ck who's lying in bed all day, watching TV, only occasionally getting up to p**s, and I'll show you a guy who's not causing any trouble."
— George Carlin (Brain Droppings)

डिस्क्लेमर - वरील वाक्य कोणालाही उद्देशून लिहीलेले नसून तसा गैरसमज झाल्यास तो त्या व्यक्तीने स्वतःचा दृष्टीदोष समजावा.

शाहिर's picture

11 Sep 2011 - 12:47 pm | शाहिर

रिकाम टेकडेपणा वाइटच !!

नगरीनिरंजन's picture

11 Sep 2011 - 3:06 pm | नगरीनिरंजन

कुठे निघालात? पोकळी सोडून जाता येत नाही असं.

स्व's picture

11 Sep 2011 - 3:48 pm | स्व

शुचि:- काय म्हणताय ते समजले नाही.
शाहिरः- लिखाण पोकळ असेलही.पण बाहेर कसा येउ?
न. नि. :- "कुठे जाणार" पोकळीमध्येच असणार. निर्वातातल्या निर्वातातच फिरत राहणार.

नावातकायआहे's picture

11 Sep 2011 - 4:17 pm | नावातकायआहे

>>ही वेळ काय करायची आहे?

पयले गणपती आणि पोकळी विसर्जन करायची,.
नंतर संपादकांना व्यनी करुन स्वारी म्हनुन लेख उडवा सांगायची,.
आनी चपटी मारुन पार्श्वभाग वर करुन झोपायची.

स्व's picture

11 Sep 2011 - 4:29 pm | स्व

विसर्जन पोकळीचं होत नाही. पोकळित सगळ्यांचच विसरजन होइल एक ना एक दिवस.
नंतर संपादकांना व्यनी करुन स्वारी म्हनुन लेख उडवा सांगायची,.

हो.निर्वातातुन सुटल्यावर करीन म्हणतो. पण संपादकांना सांगणारे आम्ही कोण? त्यांना काय करायचे ते समजतेच की चांगले.

आनी चपटी मारुन पार्श्वभाग वर करुन झोपायची.
तेच. कायमचच झोपावे काय?

५० फक्त's picture

11 Sep 2011 - 5:33 pm | ५० फक्त

मी काय करतोय? - तांदुळ निवडतोय,
मला काय करायचय? - भात किंवा जमलं तर गोड पुलाव
खरं तर मला काय करायचय ह्याचाशी तुम्हाला काय करायचय? - आयला मग आमाला जेवाला का बोलावलं
कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का? - असले विचार भुक लागली की येतात नेहमी
की जरासे विध्वंसक आणि रजो-तम गुणी झालेले चालेल पण कर्म करणे योग्य? - भुक वाढत चालल्याचे लक्षण आहे,
कशासाठी काय केले पाहिजे? - भातासाठी तांदुळ निवडले पाहिजेत
ही वेळ काय करायची आहे? - आतापर्यंत कुकर लावुन झाला पाहिजे होता
मी असा एका निर्वातात बसुन काय करतोय? - वर सांगितलं ना तांदुळ निवडताय
एका रिकामटेकडेपणाने ही मनोपोकळी व्याप्त केली आहे का? - लसणाची पाकळी नीट सोला आधी.
हे रिकामपण चांगले की वाइट? - चांगलं, काही काम असतं तर आमाला फुकट जेवाला बोलावलं असतं का तुमी ?
वाइट असेल तर कुणासाठी? इतरांसाठी की माझ्याचसाठी? - कुणासाठीच नाही.
कुणी काहीच प्रतिसाद का देत नाही? - जस्ट तुमचा धागा आला अन मिपा बंद झालं होते आता सुरु झालंय देतील प्रतिसाद .
मी एकटाच तासनतास पुन्हा पुन्हा सगळ्यांना संपर्क तरी किती करु? - धागा टाकुन खरडी टाकायचे दिवस गेले असं वाटलं होतं मला.
सगळे का टाळताहेत? - तुम्ही कोणत्याच कंपुत नाही, अजुन काय.
काय झाले आहे? - मिपा बंद आहे, कुठे आहेत आई-बाबा? - माझी .....माझी -ही कुठाय? मी एकटाच अंधारात काय करतोय? - साहित्यिक व्हायच्या नादात लाइटचं बिल भरलं नसेल
मी इथून कधी निघणार आहे? उद्या सकाळची गाडी आहे हरिपुरची.
निघावेसे मला कधी वाटनार आहे? - मसाला वाटुन झाला की
कुणामुळे वाटणार आहे? - आमच्यामुळं, तुम्ही तर काय इतकं तिखट खात नाहि माहितेंयु.
मी संपलो तर ही पोकळी संपेल का? मी पोकळी संपवु का? - पोकळी नाही ती लसणाची पाकळी आहे सोलुन टाका म्हणजे संपेल.
ती संपेल ह्याची शाश्वती काय?मी संपलोय हे मला कसे कळणार? हल्लीच व्हिडो शुटिंगची सोय झाली आहे, करुन ठेवु.
चला मला निघायला हवे. निघतोय.तुम्हाला सगळ काही सांगितलेलच आहे. कामाला येइल.- चालेल,

सिद्धार्थ ४'s picture

11 Sep 2011 - 9:21 pm | सिद्धार्थ ४

:) :) :)

आत्मशून्य's picture

11 Sep 2011 - 9:23 pm | आत्मशून्य

.

सूड's picture

12 Sep 2011 - 8:52 pm | सूड

__/\__

मूळ धाग्याला वेगळीच कम्युनिस्ट झाक वाटतेय !! ;)

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 10:41 pm | सतिश गावडे

पन्नासराव, लिहिते व्हा राव. वुई मिस यू ऑन मिपा. ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लू.

सिद्धार्थ ४'s picture

11 Sep 2011 - 9:24 pm | सिद्धार्थ ४

अहो साहेब, २ पेग मारा आणि झोपा निवांत. भरे जवानी मै, तेन्शोन काय को लेता?

lakhu risbud's picture

11 Sep 2011 - 11:54 pm | lakhu risbud

काहुन पकपक करून रहायला बे ? तू स्पा चा गेल्या जन्मी चा अवतार तर न्हायी ना?

ज्ञानराम's picture

14 Sep 2011 - 1:54 pm | ज्ञानराम

फक्त ५० ,

मस्त प्रतिसाद...

विजुभाऊ's picture

14 Sep 2011 - 3:25 pm | विजुभाऊ

कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का?
त्यापेक्षा प्रेत असलेले देखील बरे. निदान ते सडून किड्यांना खाद्य किंवा जमिनीला खत तरी होते.
काहीही करायचे नाही कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवायचे म्हणजे खायला काळ अन भुईला भार