सोन्याचे भाव

संजीव नाईक's picture
संजीव नाईक in जनातलं, मनातलं
20 Aug 2011 - 12:00 pm

मा. मि.पा. हा खरोखरच विचार करण्या सारखी गोष्ट आहे ती म्हणजे कॉमोडीटी मार्केट मुळ मध्यम वर्गातील लोंक थोड्या पैशात एक किली सोने कागदावर खरेदि कारण्याचा विचार करत आहे. पण खरच सोने २४ ते २५ हजार रुपये तोळे होऊशकते काय? ह्याचा गंभीर पणे विचार करण्यास हवा? तु घेतले म्हणुन मी सुद्धा घेतले म्हाणून आज सोन्याला हा उंचाक मिळाला आहे. पण परिस्थिती नुसार कॉमोडीटी मार्केट मधुन खरे गुंतवणुकदार केव्हाच निघुन गेले आहेत फक्त उरला आहे तो मध्यम वर्ग. जर का सरकारने ह्या गुंतवनुकीवर ५० ते ७५ % पर्यंत गुतवणुकीची अट घातली तर सर्वसामान्य वर्ग ५०% तरी मारझिंन मनी भरेल काय?

सोने निर्मिती करणार्‍या कंपण्या कोणत्या किमंतीला सोने विकतात. त्यावर किती खर्च यतो, व सर्वसामान्य वर्गापर्यत तो किती ला मिळाला पाहीजे ह्या संबधी अधिक माहीती असल्यास लिहण्याची विनंती.

माझ्या माहीती नुसार १० ग्रांम सोने निर्मिती करणार्‍या कंपणीला साधारण ६००० ते ६५०० खर्च येतो, त्यावर संरक्षणासाठी १०००, र्नियातीसाठी १००० ते १२००, विम्यासाठी १०००, वितरक, सबवितरक, त्याचे सबवितरक २५००
साधारण १४००० ते १५००० आणि नंतर सोना १००० सरकारी कर असा मिळुन १६००० ते १७००० पर्यंत सोने सामान्य ग्राहकाना मिळाले पाहिजे

आपले अभिप्राय कळवा. धन्यवाद

अर्थव्यवहारविचार

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

20 Aug 2011 - 12:36 pm | नितिन थत्ते

१६००० सुद्धा फार होतात.

खरे तर १६ रु किलो हा वाजवी भाव आहे. :)

श्री नितिन थत्ते

खरोखरच आपले शब्द खरे झाले तर.....?

संजीव.

सर्वसाक्षी's picture

20 Aug 2011 - 4:23 pm | सर्वसाक्षी

जर सोन्याचा उत्पादन खर्चे ६०००-६५०० प्रति दहा ग्रॅम असेल तर २५००० रुपये प्रति दहा ग्रॅम अधिकतम किंमत (सर्व करांसहीत) हे रास्तच म्हणावे लागेल. उपाहारगृहे/ सौंदर्यप्रसाधन/ शीतपेय / मद्य ई. कंपन्यांचा उत्पादन खर्च व ग्राहकाला पडणारी किंमत पाहता असेच म्हणावे लागेल. हाच न्याय अन्य अनेक उद्योगांना लागू होतो. मग आक्षेप सोन्यावरच का? चीज फासलेल मैद्याच धीरड दोनशे रुपये मोजुन खाताना त्याचा उत्पादन खर्च विचारात घेता का?

सोने घ्यायचे तर लवकर घ्या. गेल्या ३६ तासात दहा ग्रॅम मागे १९०० रुपयांच्या आसपास भाव वाढला आहे, दिवाळीला भाव ३२०००-३५००० पर्यंत जाईल असा होरा आहे. किती दर असावा यावर विचार करणे सोडा, आहे त्या भावात घ्या आणि सुखी व्हा.

नितिन थत्ते's picture

20 Aug 2011 - 5:03 pm | नितिन थत्ते

>>किती दर असावा यावर विचार करणे सोडा

सहमत आहे.

आहे त्या भावात घेउ नका आणि सुखी व्हा हे पण खरेच आहे ना ?

वेताळ's picture

20 Aug 2011 - 7:05 pm | वेताळ

दर वाढ खुप वेगाने होत आहे तितकीच धोकादायक देखिल आहे. तेल १५० दॉलर वरुन वरुन ७० डॉलरवर आले होते हे विसरु नका. सोन्याचा भाव खुपच वेगाने वाढला आहे.

शिल्पा ब's picture

21 Aug 2011 - 12:53 am | शिल्पा ब

रुपया आणि डॉलरमधे जास्त फरक वाढला म्हणुन भाव वाढला असे काहीसे ऐकले. खरं खोटं माहीत नै.

बाकी परवडलं तर घ्यायचं नाहीतर राहीलं, उगाच भाव अजुन का वाढवा? ;)

मी काय म्हणतो, उद्या कुणी क्ष धातू घेऊन आला आणि म्हणाला हाच जगात भारी आहे..सोनं बिनं सगळं झूट आहे याच्यापुढं, याची टिनी-टायनी तरी शक्यता आहे का ?