आरसा

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
16 Aug 2011 - 10:54 am

माझाच चेहरा बघतो मी रोज,
हल्ली विद्रुपच..
बदळणारा - वेळो वेळी
पण पुन्हा - विद्रुपच

एवढ्यात, हसणे तसे बरेच कमी झाले आहे,
चेहर्‍यावर -
आजारपणानं रेघोट्या काढल्या आहेत,
हास्य शोधण्याचा प्रयत्न असतो,
-सुंदर दिसण्याचा प्रयत्न होतो - विफल
असहाय मी,
मग आरसा बदळण्याचा प्रयत्न होतो मनी.

पण, हा दोष आरस्याचा नाही,
हा दोष आहे माझ्या चेहर्‍यात,
जो सुंदर-सुबक दिसण्यास तयार नाही,
अंगवळणी पडलेले आजारपण,
आवडायला लागले आहेत.

प्रामाणिकता मात्र जगू देत नाही,
बदलायचा हट्ट सोडत नाही.

अन चीड येते माझीच मला,
उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला ,
काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास
पण नकळत,
पुन्हा तोच चेहरा बनवतो मी - कुरुप
आरसाच माझा बनतो मी
स्वहत:शीच पुटपुटतो मी
दोष देत -
असते रंगात सुद्धा भेसळ
घेतो मी पांढरा - पण त्यास येते काळपट छटा!

मात्र ह्या सार्‍या गोंघळात -
बदलत असते माझी ओळख
कधी होतो कवि आणि कधी होतो समाज मी.

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

17 Aug 2011 - 8:32 am | पाषाणभेद

विचार करण्यासारखे काव्य

प्रकाश१११'s picture

17 Aug 2011 - 9:35 am | प्रकाश१११

निनाव -खूपच छान वाटली कविता .
अन चीड येते माझीच मला,
उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला ,
काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास
पण नकळत,

हे छानच. .!!

प्रकाश१११'s picture

17 Aug 2011 - 9:35 am | प्रकाश१११

निनाव -खूपच छान वाटली कविता .
अन चीड येते माझीच मला,
उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला ,
काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास
पण नकळत,

हे छानच. .!!