अंतर

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
10 Aug 2011 - 1:18 am

व्यस्त सारे मोजण्यात
अंतर काही मिटेना
गणित करताच आकडे
हातात काही उरेना

मग धैर्य संपते
मन वळते
अंतर मात्र तितुकेच
पाउल पुढे पडेना

दोन बिंदु - एक पुर्वेस अन एक पश्चिमेस
आलिंगनास आतुर
अंतर तयास ठरविण्या-इतुके
मात्र, कुणास काहि कळेना!!

हे ठिकाण