चांदणपक्षी

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
7 Aug 2011 - 10:03 pm

मी एक होतो जागा चांदणपक्षी
झेलीत विस्फारल्या नजरा भुभुक्षी
विरलेले होते घाव सारे.
थिजलेले होते डाव कोरे.

घन तिमीर दाटे काय
कोसळत्या जलधारांचा
प्रकोप पाखरांचा होता
आक्रंदत दिवस रात

तो कोण होता कैसा
चाखेन म्हणे मुक्त ऐसा
मोकाट होतो वारा गात्री
पिसासुन घे भरारी

जळ काय झाकोळले
कर्दमात पारवे बुडाले
क्षितीजाच्या पलीकडले
एक झाड जळाले.

ते स्वप्न कोणी माळले
वक्षी जेंजारूनी भाळले
भात्यांच्या नशीबी शेवटी
रीकामेच प्राक्तन आले.

घे एक भरारी काय
आभाळाला फुटती पाय
कोण कोण मागे पडती
ते सारे बैल आणि गाय

सरीसृप सारेच होते
राजे आपापल्या बिळात
वणवा पेटवी रान
तोडून तंद्री बेभान

प्राशूनी रक्त सारे
सुरे तेजाळ माजतात
पाझरता भिंती फुटक्या
नांग्या विंचवांच्या कुजतात.
............... विजुभाऊ सातारवी
( शरदिनी गट)

शांतरससमाज

प्रतिक्रिया

कविता आवडली

विरलेले होते घाव सारे.
थिजलेले होते डाव कोरे.

सुंदर