माझ्या भावना तुझ्या पर्यंत कधी पोचल्याच नाहीत
न व्यक्त केलेलं ते प्रेम तुला कधी जाणवलच नाही
अस्पष्ट मारलेली तुला हाक कधी ऐकू आलीच नाही
मनाने केलेला स्पर्श तुला कधी भासलाच नाही
मैत्रीच्या पुढे जावं अशी मनोमन प्रार्थना करत होते
पण तुला दुखवायचं नव्हतं म्हणून मागे सरत होते
तुला सांगण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न मी केले
मला नीट सांगता आलं नाही आणि तुलाही कधी नाही हे कळले
तुझ्या जीवनात येईल कुणीतरी नवी
नसेल माझ्या मनात तिच्याबद्दल अढी
नाही करणार मी तिचा हेवा
पण एक सामान्य मुलगी म्हणून एवढंच म्हणेन
"हे सगळं स्वीकार करायची शक्ती दे मला देवा!!!"
भवतालचं सगळंच वातावरण उदास वाटत आहे
आपले एकत्र असलेले जुने क्षण आता मनात साठवत आहे
ह्या सगळ्या परिस्थितीचा खूप त्रास होत आहे...
तू जवळ असल्यचा सारखाच भास होत आहे...
प्रतिक्रिया
31 Jul 2011 - 8:25 pm | सौन्दर्य
च च च !
अगदीच बावळट असतात ग ते,
एकदा स्पष्ट बोलून टाकायचे होतेस.
प्रितीचा अव्हेर होइल ही भिती दोन्हिकडे असते,
एकदातरी बाहूपाश गळ्यात टाकावयाचे होतेस.
सौन्दर्य
1 Aug 2011 - 4:15 am | इंटरनेटस्नेही
ह्म्म्म..
1 Aug 2011 - 4:15 am | इंटरनेटस्नेही
ह्म्म्म..
1 Aug 2011 - 4:15 am | इंटरनेटस्नेही
ह्म्म्म..