घर पहावं बांधून

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
29 Jul 2011 - 10:17 pm

सहा आकडी वार्षिक पगार पाहून पालक भलतेच खूष झाले होते..
"द्रुष्ट काढा हो पोरची" असे आजीचे उद्गार आले होते.
"मोठ्या शहरात दादा आपला व्हावा settle हेच होतं माझ्या मनात
आता मस्त घर घेतलं की येतील मुलिंचे profiles आपल्या दारात"

'घर शोधो' मोहिम आमची जोरात सुरू झाली.
'घर पहावं बांधून' ह्या म्हणीची प्रचिती तेव्हा मला आली.
"Sir swimming pool, club house, Security, Capsule lift एकदम कसं ऐटीत IT, त्या मानाने rate नहिये फार"
त्याच्या downpayment ची figure बघूनच अंगात कापरं भरलं आणि पडलो होतो गार..
"ना मी करोडपती ना कुठला संस्थानिक... पैशांचं झाड नाही रे माझ्या दारी..
R K Lakshman चा common man मी...झेपणार नाही एवढे भारी.."

मित्र म्हणले "काळजी नको लेका.. एका onsite मध्ये होईल घर टुमदार.."
"downpayment चे होतील राजे. उरलेलं कोणाचे तीर्थरूप भरणार?"
इतक्या लाखात loan कधी स्वपनातही विचार केला नव्ह्ता.
उर्वरित आयुश्य बहुतेक EMI भरण्यातच जाणार होतं.

आनंद ना तुमच्या चांगल्या कंपनीत असणं ना सुख त्या भरपूर पगारात,
जिथे नोकरी करतो त्या शहरात वडिलोपार्जित घर असणं ह्याला खरं luck म्हणतात

कविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

29 Jul 2011 - 11:52 pm | शुचि

हा हा :)

५० फक्त's picture

31 Jul 2011 - 12:47 am | ५० फक्त

सध्या या विषयावर एक व्यनिचर्चा सुरु आहे जोरात. मस्त लिहिलंयस फक्त एकच कळालं नाही कवितेत का टाकलंयस.