आपल्या जन्मापासूनच ठरलेली असतात असंख्य नाती
ही तुझी मावशी, हे तुझे काका, ही आजी, ती मामी ..
पण पुढे आपण होऊन एक नातं निर्माण करतो
जेव्हा घराच्या चौकटीतून बाहेर पडतो
अनेक जण आपल्या परिचयात येतात, बरेच जण आपल्याला भेटतात ,
त्यातले पुशकळसे ओळखीचे राहतात आणि काहीच जीवाभावाचे होतात
हे नातं असतं 'मैत्रीचं' - निरपेक्ष, निखळ अशी
सख्या नात्यां इतकीच वाटते ती हवी हवीशी
न सांगता आपल्या सुख दु:खात साथ देणारे
अडी अडचणीत आपल्या पाठीशी उभे राहणारे
हक्काने आपल्या चुकांवर रागावणारे
आपल्या यशात आनंदाने सहभागी होणारे ...
ह्यात कधीच नसतो द्वेश, ना दुस्वास, ना लोभ
असतं फक्त प्रेम, आपलेपणा आणि एकमेकांविशयी वाटणारी ती ओढ
पुढे आपले मार्ग वेगळे होतात, संपर्क वेळे अभावी कमी होतो
नवीन जबाबदार्या पडत जातात आणि कालांतराने दूर जातो
पण मनातल्या कोपर्यात असते अद्रुश्य ती साथ
कुठल्याही 'timezone' मध्ये मारू शकतो मैत्रीची एक हाक
प्रतिक्रिया
29 Jul 2011 - 7:02 am | मदनबाण
छान...
29 Jul 2011 - 11:58 pm | शुचि
छान!