विचारलच कधी कुणाला "कशात वाटतं सुख?"
वेग वेगळ्या वयात बदल्ली गेलेली सुखाची व्याख्या अशीच असतील...
जेव्हा पाहुणे आल्यामुळे टाळला जातो आईचा मार
गणितात पैकीच्या पैकी मिळाल्याबद्दल होतात बाबांकडून लाड
जेव्हा तापामुळे मारता येते शाळेला बुट्टी
थंड हवेच्या ठिकाणी जातो, लागते उन्हाळ्याची सुट्टी
जेव्हा आईला घेतो पहिल्या पगाराची सुंदर साडी
आणि बाबांना सांगतो शिकायला चार चाकी गाडी
जेव्हा मिळतो onsite chance,होतं कामाचं appreciation
होणार्या जोडीदारा बरोबर बघू लागतो भविष्याची स्वप्न
आपलं छोटसं नवीन घर सजवण्यात
दोन्ही कडील नाती जपण्यात
मुलांना चांगलं शिकवून त्यांना वाढवण्यात
एक दिवस तरी मैत्रीणींबरोबर भटकंती करण्यात
जेव्हा निश्चिंत असतं मन पाहून निव्रुत्ती नंतरची तजवीज
समाधान चेहर्यावर- झालेलं असतं कष्टांच चीज
जेव्हा बघतो डोळ्यासमोर आपल्या मुलांना स्वावलंबी
जेव्हा माहेरी आलेली मुलगी दिसते आनंदी
~~ प्रिया
प्रतिक्रिया
21 Jul 2011 - 8:54 pm | इरसाल
यच्चयावत आईबाबांचे विचार.....आवडले मस्तच आहे.
21 Jul 2011 - 9:21 pm | गणेशा
कविता आवडली
लिहित रहा ... वाचत आहे...
22 Jul 2011 - 9:15 am | पाषाणभेद
सुखाची कविता आहे.
अर्थात प्रत्येकाच्या सुखाची कल्पना वेगवेगळी असते.