वाचवा या गुडघेदुखीतून....

चिंटु's picture
चिंटु in काथ्याकूट
17 Jul 2011 - 1:05 pm
गाभा: 

वयाच्या चोविसाव्या वर्षीच गुडघेदुखीने त्रस्त झालोय. विविध M S medicine असणार्‍या तज्ञांना दाखवूनही उपयोग न झाल्यानं मग M S Orthopedic ना सुद्धा दाखवलय. अगदि पुण्यातल्या खास ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असणार्‍या संचेती हॉस्पिटलला सुद्धा! पण कुणालाही नक्की काय बिघडलय ह्याचा अंदाज आलेला नाही.
त्यांच्या मते मी फिट, धडधाकट ,शिडाशिडित असा तरुण आहे. पण ज्याचं दुखतं त्यालाच कळतं ह्याचा अनुभव घेतोय.
पायर्‍या चढताना कटकट. बसमधुन जाताना कटकट.अगदि मांडी घालून बसायचीही सोय राहिलेली नाही.जीव अगदि मेटाकुटीला आलाय. पुण्यातल्या खडीवाल्या वैद्यांकडेही सहाएक महिने जाउन आलो, मात्र तीळभरही फरक नाही.
कुणी मिपाकर ह्याबाबतीत सल्ला देउ शकतील काय?
माझी तब्येत म्हणाल तर इतर बाबतीत अगदि व्यवस्थित आहे. मागील तीनेक वर्षात साधी सर्दी वगळता कुठलाही आजार झालेला नाही. ऑफिसमध्ये कधीही सिक लीव्ह टाकावी लागलेली नाही. उंची १६६ सेमी,म्हणजे सुमारे साडेपाच फूट, वजन ५७ किलो. दारु, सिगारेट ह्यापासुन चार हात लांबच असतो.वयही फारस नाही.
मग नक्की काय उपाय करता येइल?
कुणी इतर डॉक्टर क्रुपया सुचवावेत.

आणि हो, मागील तीनेक वर्शापासुन मी मिपा वाचतोय, कधीच काहीही लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण मला मिपा खुप खुप आवडते. तुम्ही कुणी मदत करु शकाल अशी आशा वाटली म्हणुन इथे ह धागा टाकला.

कुणी काही सुचवा प्लीज.

-- गुडघेदुखीने त्रस्त छोटा चिंटु

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

17 Jul 2011 - 1:21 pm | प्रकाश घाटपांडे

निदान झाले नाही? की निदान झाले परंतु त्यावर डॉक्टरांकडे उपचार नाहीत हे लिखाणावरुन पुरेसे स्पष्ट होत नाही.काही गोष्टींवर उत्तर नसते हे मात्र खरे.
थोडीशी 'टाकून' पहा कदाचित गुडखेदुखी चा विसर पडेल.

चिंटु's picture

17 Jul 2011 - 1:37 pm | चिंटु

कुठल्यापण ओर्थोपेदिक कडे गेल्यावर तो तुम्हाला पेशम्ट-बेडवर टाकुन पाय/गुडघा मुडपुन पाहतो.
माझा तसा व्यवस्थित मुडपला जातो आहे. मग ते म्हणतात की सगळ अगदि रुटीन आहे नोर्मल आहे.
मी त्यांना म्हनालो की असा पडल्या पडल्या सगलच व्यवस्थित आहे. पन जेव्ह केव्हा थोदावेळ खुर्चीवर बसतो आनि मग उठु बघतो तेव्हा भयंकर वेदना होतात. जितकी खुर्चीची उंची कमी असते, तित्का त्रास जास्ती.
म्हनजे ऑफिस मधल्या खुर्चीनेही त्रास होतो, पन एखाद्या थेटरमधे गेल्यावर तो खुपच जास्ती होतो.
पायर्‍या उतरताना हल्कासा त्रास होतो. पन पायर्‍या चढताना ब्रम्हांड आठवते.आणि डोक्तर म्हनतात की सगल कस व्यवस्थित आहे.कुथेच काही कमी/मालफंक्शनालिटी नाही म्हणुन.
गुडघ्याचा एक्स्-रे काधुन झालाय. ब्लड टेस्त पन झाल्यात. फक्त थोदसं विटामिन b12 कमी होत.(पन ते तसही ८०% शाकाहारी/भारतीय लोकात ते त्याच प्रमानात असतं म्हने.) औशध घेउन ते पन योग्य लेवलला आलय तरीही त्रास वाढतोच आहे. जीव कासावीस होतोय कुठलेही पिकनिक प्लेनिंग करताना.गड्-किल्ले जास्ती चढता येनार नाहित ह्यानी मन निराश होतं.

स्वानन्द's picture

17 Jul 2011 - 11:32 pm | स्वानन्द

तुमची गुडघेदुखी चालू होण्यासाठी कुठला अपघात कारणीभूत होता का? की मधूनच कधीतरी सुरू झाली?

तुम्ही एक्स-रे फोटो काढून घेतलाच आहे.. पण मग डॉक्टरांनी गुडघ्याचा एम आर आय स्कॅन करून घ्यायला सांगितले नाही का? लिगामेंट ला दुखापत झाली असेल किंवा लिगामेंट तुटले असेल किंवा मेनिस्कस ( गादी ) ला इजा झाली असेल तर ते एक्स रे फोटो मध्ये कळून येत नाही. एम आर आय स्कॅन मध्ये ते समजून येऊ शकते. आणि जर याची चाचणी सुद्धा करून झाली असेल तर मग स्पा ने व्यक्त केलेली शंका आणि सुचवलेला उपाय सद्ध्या तरी धरून चलावे असे वाटते.

कुंदन's picture

17 Jul 2011 - 1:23 pm | कुंदन

नाडी वाला उपाय करुन बघा.

गुढगे दुखी इतकी वाढलीये म्हणजे शरीरातला वात प्रचंड प्रमाणात दुषित झालेला आहे..
आणि त्याच संतुलनही बिघडलेलं आहे
तोच वात अख्या शरीरभर फिरून अशी दुखणी वाढवतो..

एखाद्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन ट्रीटमेंट सुरु करा
तिळाच्या किंवा राई च्या तेलाने गुध्घ्यांना मसाज करत जा ( तेल गरम करून घ्या)
वात कमी करणारी औषध उपयोगी पडतील

आहारातून भोपळी मिरची, कोबी, वांग असे वात वाढवणारे पदार्थ वर्ज्य करून बघा

रात्री झोपताना काशाच्या वाटीला साजूक तूप लावून तळपायांवर घासत जा, जेणेकरून वात संतुलन होण्यास मदत होईल :)

खदीवाले वैद्याने फक्त लांबुनच बघुन त्रास विचारला, नीट न तपासताही काही औशध दिले. ते ७-८ महिने घेउन पण काहीच उपयोग झाला नाही. दुसरं कुनी सांगु शकता का इथे पुन्यात.

मुंबईत असता तर नाव दिली असती,,
पुण्यात असाल तर " बालाजी तांब्यांची" औषध घेऊन बघा

चिंटु's picture

17 Jul 2011 - 3:18 pm | चिंटु

तुम्ही द्या तर खरी. आताच एकानं डॉ अनिल पाटिल(आयुर्वेद + अ‍ॅलोपथिक) ह्यांची मिश्र उपचार पद्धती सुचवली आहे.हे मुंबै ला असतात म्हणे, पण पुण्यात त्यांच्या शाखा आहेत.
तुम्ही थेट मुंबैतले कुणी सुचवले तरी चाल्तील.

चिरोटा's picture

17 Jul 2011 - 2:28 pm | चिरोटा

आयुर्वेदिक वा अ‍ॅलोपाथी , उपचार अचूक आणि उपचार करणारा बुद्धिमान हवा.
चिंटू, आर्य वैद्यशाळा माहित आहे का? तेथे विचारून पहा-
http://www.aryavaidyasala.com/(S(b2vyny34yuchxuzxcnclxd55))/Index.aspx
मला चांग्ला अनुभव आला आहे.

चिंटु's picture

17 Jul 2011 - 3:15 pm | चिंटु

पण सतत विझिट साठी तिथे केरळात जायला कसं जमेल हे समजत नाही. आयुर्वेदिक उपाय असल्यानं थोडासा अधिक वेळ लागेल आणि अधिक वेळेस वैद्यांना भेट द्यावी लागणार. मग ते कसं जमायचं हे समजल नाही.
पुणे( किंवा पुणे-मुंबै पट्ट्यात) त्या तोडीचे उपचार कुठेतरी असतीलच की.

प्रास's picture

17 Jul 2011 - 2:35 pm | प्रास

व्य. नि. बघावा.

जयंत कुलकर्णी's picture

17 Jul 2011 - 4:14 pm | जयंत कुलकर्णी

चिंटूस,

माझा अनुभव सांगतो. माझ्या गुड्घ्यातील लिगॅमेंटस जेव्हा काढली तेव्हा मला हाच प्रश्न पडला होता. मी २ वर्षे पोहलो ते आजतागायत मला कधीही त्रास झाला नाही. पण भुकेमुळे जास्त खाल्यामुळे वजन मात्र वाढले. आपला जर खाण्यावर नियंत्रण असेल तर ताबोडतोब पोहायला लागा. २/३ महिन्या ]नंतर बोलू.

अप्पा जोगळेकर's picture

17 Jul 2011 - 7:34 pm | अप्पा जोगळेकर

आपटे म्हणतात त्याप्रमाणे वातामुळे हा आजार होत असेल असेच मलाही वाटते. त्रास होणारी व्यक्ती अजिबात व्यायाम करत नसावी असे वाटते. बर्‍याच वेळेला असा अनुभव आला आहे की डॉक्टर लोकांना अशा गोष्टींचे निदान करता येत नाही. तुम्ही स्वतःच तुमच्या आहार-विहाराचे अत्यंत बारकाईने अ‍ॅनॅलिसिस करुन पाहिलेत तर उपाय साप्डेल असे वाटते.

सकाळी उठुन रोज पाचेक किलोमीटर फिरुन येतो.(जाताना अडीच तीन, येताना अडीच तीन, सकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान). पण हा व्यायाम म्हणुन पुरेसा नाही हे कबुल आहे.

नितिन थत्ते's picture

17 Jul 2011 - 10:03 pm | नितिन थत्ते

एवढा व्यायाम पुरेसा आहे बहुधा.

तुम्ही फार थंड जागी बसता/झोपता का? एसी फार जास्त ठेवता का?

चिंटु's picture

17 Jul 2011 - 10:30 pm | चिंटु

इतरांपेक्षा मला पंखा वगैरे ची गरज कमी लागते.तरीपण इथे सगळ्या रूममेट्स ना जोरात पंखा वगैरे लागतो, म्हणुन ते बिंदास लावतात. मी पांघरुण कधी डोक्यावरुन घेउन तर कधी पायात मोजे घालुन झोपतो.मला थंडी जास्त वाजते. झालच तर ऑफिस म्हणजे एक एम एन सी कार्यालय आहे, तिथेही दिवसातले ८-१० घंटे एसी झेलावा लागतो. त्याचाही संबंध असु शक्तो का?

मी ऋचा's picture

18 Jul 2011 - 11:59 am | मी ऋचा

नक्कीच असू शकतो! एसीने सान्धेदुखी हि फारच कॉमन गोष्ट आहे! बाकी पूण्यातल्या डॉक्टर्स बद्दल काही माहिती नाही. नाग्पूरला कधी चक्कर झाली तर डॉ. अनिल गोल्हर, (एम. एस. ऑर्थो) रामदास्पेठ यांना नक्की म्हण्जे नक्की दाखवा. त्यांचा हातगुण म्हणजे जादू आहे.

प्रदीप's picture

18 Jul 2011 - 6:10 pm | प्रदीप

झालच तर ऑफिस म्हणजे एक एम एन सी कार्यालय आहे, तिथेही दिवसातले ८-१० घंटे एसी झेलावा लागतो.

ऑफिसात गरम कपडे घालून बसा; उदा. कमीतकमी एकादा विंडब्रेकर तरी काही दिवस घालून पहा. (नित्यनेमाने करणार्‍या गोष्टी एकेक करून वगळून पाहिल्यात का? उदा. काही दिवस कामावरून रजा घेतली असेल, तर त्या दिवसांतही हा त्रास होतो का? अथवा इतर काही खाण्ञापिण्यातील पदार्थ, उदा. दही/ ताक वर्ज्य करणे इ. )

तुम्ही गुडघ्याचा एक्सरे काढला म्हणताय.... मग त्यात काही आढळून आले का? माझी आत्या, जी वयाने जास्तं आहे, पण तिच्या बाबतीत गुडघ्याच्या वाटीखाली असलेले फ्लुईड कमी झाले, आणि त्यामुळे उठता बसताना मांडी आणी पोटरीचे हाड त्यांना जोडणार्‍या गुडघ्याच्या वाटीवर आतून घासले जाऊ लागले. त्यामुळे तिला प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. तुमच्या बाबतीतही तसेच काही आहे का याचे नीट निदान करुन घ्या, व डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपचार करा.

अस म्हणणार्‍यांमध्ये ओर्थोपेदिक तज्ञही आले अन् M S मेदिसिन वाले प्रॅक्टिशनर पन आले.

अति सेक्स हे गुडघे दुखीचे एक महत्वाचे कारण आहे. हे बरेच अ‍ॅलोपेथीक डाक्टर पेशंटला सांगत नाहीत. आयुर्वेदिक वैद्यांना हे पूर्ण माहिती आहे. ह्या कारणामुळेच धातुक्षय झाल्याने शेकडा ९०% गुडघेदुखी बरी होत नाही

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Jul 2011 - 1:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>> अति सेक्स हे गुडघे दुखीचे एक महत्वाचे कारण आहे
काही मित्रांकडून कंबरदुखीचे ऐकले होते ;-) गुढघ्याचे प्रथमच ऐकतो आहे.

>>ह्या कारणामुळेच धातुक्षय झाल्याने शेकडा ९०% गुडघेदुखी बरी होत नाही
ओ आपटेकाका, इथे धातू म्हणजे वीर्य असा अर्थ धरायचा आहे का ? तसे असेल तर त्याचा आणि गुडघ्याचा नक्की काय संबंध आहे ? आणि मग हस्तमैथुनाने पण होते का गुडघेदुखी? तसे असेल तर मग "जगी गुडघेदुखी मुक्त असा कोण आहे?" ते सोडा, स्त्रीयांना नक्की कशामुळे गुडघेदुखी होते?

धातू या शब्दाचा वेगळा अर्थ असेल तर सांगा, मग परत बोलू.

ईश आपटे's picture

18 Jul 2011 - 6:25 pm | ईश आपटे

अहो हे फॅमेली डाक्टर पुरवणीतील माहिती व जनसामान्यात असणार्‍या जुन्या रुढी व माहिती ह्यांनुसार आहे. अतिसेक्सचा कमरेशी संबंध आहे व गुडघा कमरेपासुन लांब नाही.......
तसेच धातु रस,रक्त इ. ७ आहेत व वीर्य ही त्या ७ पैकी एक धातु आहे. अधिक माहिती आयुर्वेदाच्या पुस्तकात किंवा वैद्यांना विचारावी........................
मी अनेक कारणांपैकी एक कारण (९०%)असा उल्लेख केला आहे. केवळ तेच कारण आहे अस म्हणलेले नाही.

शाहरुख's picture

19 Jul 2011 - 9:59 pm | शाहरुख

सर्व मिपाकरांच्या वतीने विचारतोय, अति म्हणजे किती ते तरी सांगा ! :)

धमाल मुलगा's picture

20 Jul 2011 - 5:41 pm | धमाल मुलगा

असेच विचारतो.

-(अति शहाणा) धम्या.

गवि's picture

20 Jul 2011 - 5:54 pm | गवि

मुद्दाच नसताना सगळे तपशिलात कसे काय जाताय बुवा कळत नाही..

कसला धातू आणि कसला क्षय.. आणि त्याने गुडघेदुखी होते?

साप म्हणून कायतरी धोपटत बसण्याचा प्रकार.

Nile's picture

20 Jul 2011 - 5:57 pm | Nile

आजकाल फारच गुडघे दुखताहेत हे सांगत फिरायला कारण हवं असेल त्यांना... तुम्ही नका काळजी करू. ;-)

धमाल मुलगा's picture

20 Jul 2011 - 6:08 pm | धमाल मुलगा

सर्व मिपाकरांच्या वतीने विचारतोय

सर्वेऽ सुखिन:संतु...... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2011 - 6:16 pm | परिकथेतील राजकुमार

मला फ्लर्टची जाहिरात आठवली.

ईश आपटे's picture

20 Jul 2011 - 6:50 pm | ईश आपटे

हे मात्र किती ही सौजन्य दाखवायच म्हंटल तरी सहन करण्यापलीकडे आहे................. :)

सोत्रि's picture

25 Jul 2011 - 3:36 pm | सोत्रि

मेलो रे हसुन हसुन!

अरे तो बिचारा चिंटु विचारतोय काय आणि तुम्ही सगळॆ त्याला सांगताय काय .....

- (अती अवांतर) सोकाजी

सोत्रि's picture

25 Jul 2011 - 3:36 pm | सोत्रि

विमे, लैभारी.कॉम

- (गुडघेदुखीचा त्रास असणारा) सोकाजी

खादाड_बोका's picture

17 Jul 2011 - 11:11 pm | खादाड_बोका

अति सेक्स हे गुडघे दुखीचे एक महत्वाचे कारण आहे. कुठे लिहीले आहे. मुर्खासारखे काही बरळु नको.

फॅमिली डॉक्टर ही पुरवणी वाच व जुने अंक शोध. आयुर्वेदिक तज्ञांना विचार... मूर्खासारख लिहु नको...

चिंटु's picture

19 Jul 2011 - 3:21 pm | चिंटु

आयुर्वेदाचं तसं म्हणणं असल्याचं ऐकलय. पण आपल्यापेक्षा भोगवादी आणि चंगळवादी समाज समजल्या जाणार्‍या पाश्चात्त्य जगात तर मग सर्वत्रच गुडघेदुखीचे थैमान असायला हवे ना. ते का दिसत नसावे अशी शंका येते.

APPLE's picture

18 Jul 2011 - 12:58 am | APPLE

Do you have flat foot, I have similar problem of knee pain because of flat foot and got much relief by adding shoe support.

I hope this may help you.

Sorry I can not write in Marathi font.

Apple

पाषाणभेद's picture

18 Jul 2011 - 8:44 am | पाषाणभेद

आपली जीवनशैली व शरीरप्रकृती आदर्शतेकडे झुकणारी आहे. असे असतांनाही आपणाला हा त्रास व्हावा व त्याचे निदान चांगल्या तज्ञांनाही न व्हावे याचे आश्चर्य वाटते.

एकाचवेळी अनेक प्रयोग शरीरावर करू नका. सध्या आहाराबाबत योग्य ती काळजी घ्या. जास्त चालू नका. अन मग बघा काय होते ते.

आपल्याला कशाने आराम वाटतो ते येथे सांगणे म्हणजे आपल्या आजाराचे स्वरूप व त्यावरची उपाययोजना सगळ्यांच्या ध्यानात येईल.

धाग्यावर लक्ष ठेवून आहे.

व्यवस्थापकांना: मागे आरोग्याविषयी एक नविन सदर चालू करावे असे सुचवले होते. बर्‍याच सदस्यांनी त्याची आवश्यकता लक्षात घेवून त्यास अनुमोदनही दिले होते. फक्त ते सदर चालू झाल्यानंतर एखाद्या वैद्याचा किंवा औषधी कंपन्यांचा किंवा आजाराच्या शंका मनात घालणार्‍या लेखांचा उदोउदो करणार्‍या बाजारू लेखांचा नसावा. त्यात केवळ रुग्णांनी एकमेकांना सहाय्य केलेलेच लेख असावेत. डॉक्टर वैद्य लोकांचे लेख नसावेत. त्यांचे लेख केवळ वाचकांच्या मनात अवास्तव भिती घालणारे, शंका निर्माण करणारे व केवळ आजाराचे लक्षणे सांगणारेच असतात.

स्वानन्द's picture

18 Jul 2011 - 8:54 am | स्वानन्द

सूचनेशी सहमत.

मालक हि सूचना लवकरच अमलात आणणार आहेत

वैद्य श्री नरेन्द्र पेन्डसे, स. प. महाविद्यालयाजवळ, टिळक रोड, पुणे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jul 2011 - 12:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ऑलीव ऑईलने सकाळ संध्याकाळ रोज मालीश करा.
दोन महीन्यात आराम पडेल.
हो पण ऑलीव ऑईल अस्सल हवे.

योगप्रभू's picture

18 Jul 2011 - 12:42 pm | योगप्रभू

गर्लफ्रेंडला मांडीवर बसवून फार वेळ गप्पा मारत जाऊ नका.
तरुणपणी गुढघेदुखीचा त्रास तिथूनच सुरू होतो. :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार

एकूणात काय तर तुम्ही पॄथ्वीलाच नव्हे तर स्वतःला देखील भार झाला आहात. ;)

असो..

विनोदाचा भाग सोडल्यास वरती श्री. सफरचंद ह्यांने म्हणल्याप्रमाणे शू-सपोर्ट हा अत्यंत साधा व सोपा उपाय आहे. सध्या जर बुट वापरत असाल तर त्यात अजून एक एक्स्ट्रा कुशन टाकुन पहा, नक्कीच फरक जाणवेल. तसेच शॉर्ट सॉक्स व बुटाच्या आत अ‍ॅक्युप्रेशर सोल वापरल्याने देखील फरक नक्की पडेल.

दोन्हीपैकी खालील प्रॉडक्टवर नजर सुरक्षा कवच पेंडंट /ब्रेसलेट फ्री आहे का?

रणजित चितळे's picture

18 Jul 2011 - 3:56 pm | रणजित चितळे

रोज ५ ते ६ किमी सायकलिंग करा, मला वाटते बरे वाटेल त्यांने. आमच्या कडे एकाचा हाच पॉब्लेम होता. घुडग्याच्या स्नायूंना नेमका व्यायाम मिळतो. करुन बघा.

चिंटु's picture

19 Jul 2011 - 3:19 pm | चिंटु

पण सध्या दहाएक दिवस तरी सायकलिंगला मनाई केलेली आहे चिपळूणकर सरांनी.
दोन्-चार वर्षापूर्वीपर्यंत दिवसाला १०-१२ किमी चालवायची सवय होती सायकल.

दिवसाला १०-१२ किमी चालवायची सवय होती सायकल.

सकाळी उठुन रोज पाचेक किलोमीटर फिरुन येतो.

आणि आताशा जीम पण लावताय.

अती तेथे माती झाली असेल.

सायकल चालवायचो कॉलेजात असताना, तेव्हा फिरत बसायला वेळ नव्हता. कॉलेज, कट्टा आणि दोस्त हाच काय तो दिनक्रम होता. ह्या तीनही गोष्टींसाठी ग्रॅज्युएशन दरम्यान सायकलवरच जावे लागयचे. तेव्हा इतर काही नव्हते.

इथे जॉब करतोय करतोय तेह्वापासुन सायकल सुटली. पण सकाळी लवकर(की वेळेवर?) उठायची सवय कायम आहे. मग उठल्यावर सहजच फिरावस वाटल्यामुळे आपोआप निय्मित फिरु लागलो. अजुनतरी जिम लावलेली नाही. जिम लावल्यावर फिरायला नियमित वेळ देता येणार नाही असे वाटते.

* " अंमळ गल्लत " हा वाक्प्रचार इथल्या नेहमीच्या सदस्याकडुन उधार घेतलाय.

चिंटु's picture

18 Jul 2011 - 1:55 pm | चिंटु

@स्वानन्द:- एम आर आय स्कॅन अजुन केलेला नाही. ३-४ वेगवेगळ्या ओर्थो स्पेशालिस्त़कडे दाखवल्यावर त्यापैकी कुणीच एम आर आय वगैरे सुचवलेलं नव्हतं. माहितीबद्दल आभार; आता त्यांच्याशी पुनश्च बोलेन ह्याच्याबद्द्ल. कुठलाही अपघात कारणीभूत नव्हता. हळुहळु सुरु झाली. छोट्याशा प्रमाणावरुन सुरु होउन आता पुर्ण दिमाग खराब केलय.

@जयंत कुलकर्णी :- आपले लिगामेंट्स खराब झाले होते का? गुदघे दुखत होते का?

@मी ऋचा :- माहितीबद्द्ल थँक्स. पोटाची खल्गी भरायला एसी मध्ये काम करणं भाग आहे असच सध्या वाटत आहे.
@ईश आपटे :- तुम्ही दिलेली शक्यता फॅमिली दॉक्तर मध्ये आहे, हे खरे आहे. पण तांब्यांच्या बाबत म्हनाल तर त्यांच्या औषधात तथ्य असेलही, पन कधी कधी ते आरोग्य्+आध्यात्म्+कर्मकांड ह्यांची अशी काही बेमालूम सरमिसळ करतात की काहिच कळत नाही. आजार आणि औषध ह्याबद्दलच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्म परवडत. कारण नाही तर ते इतके काही infeasible उपाय सुचवतात किंवा गीतेतले दाखले देतात की सध्या जॉब सोडुन थेट २४x7 केवळ तब्येतीचीच देखभाल करावी लागेल असं वाटत्. मी निम्न्-मध्यमवर्गीय (थोदक्यात दरिद्री) परिस्थितित असल्यान त्यांचं सगलच काही ऐकनं जमेल असा वाटत नाइ.
@apple :- नाही. मझा flat foot नाही. साधा नोर्मल वाला आहे.
@पाशान्भेद :- आभार. आरोग्य्-सदर सुरु झाल्यास छानच.

@तत्सतः- शतशः आभार. डॉ पेंडसे ह्यांच्याकदे आजच जात आहे.
@मिसळलेला काव्यप्रेमी :- ओलिव्ह नाही पन "ऑर्थ्रोसोन" (हळ्द्,तुलस वगैरे वनस्पतींचे औषधी तेल) नामक एका औषधी तेलानं मसाज केलाय. काही काळ आराम पडातो हे खरय. पण ते आहे pain killer. त्यानं दुखने बरे होत नाही. मला cure हवाय. त्याही आधी मला हवाय diagnosis. शिंचं झालय काय तेच कळेना, उपाय कसले करु मग?
@योगप्रभु :- बरोबर आहे. पन मग मांदीवर बसवल्यावर गप्पा न मारता इतर काही केले तर गुदघेदुखी थाम्बेल का?
त्यासाथी आधी गरलफ्रेंड आनायची कुथुन तेही सांगा.

@परिकथेतील राजकुमार:- करुन बघतो . सांगतो.

सगळ्या सगळ्यांचे आभार. मी अजुन मराठी टायपिंग शिकतोय, त्यामुळे वेगात लिहिण्याच्या नादात बर्‍याच चुका होतात. क्शमस्व. फक्त एक सांगु का? कुठलाही उपाय सांगण्यापेक्षा जर योग्य डोक्टर्/वैद्य्/इस्पितळ सुचवलेत तर जास्त उपयुक्त ठरेल असा मला वाटते. कारण आपण सांगितलेले उपाय कुठल्या एका विशिष्ट दुखण्यासाठी योग्य असु शकतील, पण इथे नेमक "गुडाघ्यामध्ये भसकलेलं तरी काय आहे" हेच माहित नाही. त्याचं निदानही/diagnosis झालेले नाही. त्यामुळे योग्य ते निदान झाल्यावर अचुक उपचार मिळतील अशी मी आशा करतोय. जसे की एम आर आय काढुन एखाद्या तज्ञाला दाखवावा असा विआचर सध्या करतोय. पुन्हा सगळ्यांचे आभार. अशुद्धलेखनाबद्दल पुन्हा क्षमस्व.मी प्रयत्न करतोय.

यासाठी अजून योग्य किंवा खास सिद्ध डॉक्टरची गरज आहे असं तुम्ही दिलेल्या माहितीवरुन वाटत नाही. ज्याअर्थी ऑर्थोपेडिक क्लिनिकल टेस्ट आणि एक्स रे (मुख्यतः ऑर्थोपेडिक मोडॅलिटी) यात काही अ‍ॅबनॉर्मल नाही आणि तरीही वेदना होतात, त्याही वजन पडल्यावर / चढताना वगैरे. म्हणजेच लक्षणे तीव्र आहेतच. या स्थितीत डॉक्टर्सनी नक्कीच अजून वरच्या लेव्हलची तपासणी (सी.टी. आणि नंतर एम आर आय (सॉफ्ट टिश्यूच्या आजारांसाठी)) तसेच इतर आवश्यक त्या रक्तचाचण्या वगैरे सुचवायला हव्या होत्या. तशा ते सुचवत नाहीयेत याचा अर्थ
-डॉक्टर्सना काही अ‍ॅब्नॉर्मॅलिटी (निदान उपचार करुन सुधारण्यासारखी) नसल्याची खात्री आहे.
किंवा
-ते तुमची लक्षणे कॅज्युअली घेत आहेत.

यावर उपाय हाच की त्यांना पुढील लेव्हलच्या तपासण्या करुन घेण्याची तुमची इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवणे. पुन्हापुन्हा त्यांच्याकडे जाऊन लक्षणे सुधारत नाहीयेत हे सांगणे. अर्थात पुढच्या टेस्ट्स कोणत्या हे त्यांनी ठरवायचे आहे. डॉक्टर्स बदलून फार काही फायदा नाही.

एक शक्यता अशीही आहे की तुमचा वेदनांचा थ्रेशहोल्ड कमी आहे (किंवा झाला आहे). अशा वेळी प्रत्यक्ष वेदनेपेक्षा पर्सिव्ह्ड वेदना खूप जास्त असते. पण खासकरुन पायावर गुरुत्वाकर्षणाच्या उलट दिशेने ताण पडला (अँटि ग्रॅव्हिटी) की जास्त वेदना होत आहेत. आणि बसून राहिले की वेदना होत नाही. त्यामुळे ही शक्यता कमी असावी.

फिजिओथेरपिस्टला दाखवणे हाही एक उत्तम उपाय ठरु शकतो. नुसत्या एसीने अशा प्रकारची वेदना होणे अनकॉमन वाटते.

ऑर्थोपेडिकने पूर्णपणे हात वर केले असतील तर न्यूरॉलॉजिस्टला दाखवा. वर्णनावरुन न्युरॉलॉजिकल जास्त वाटते आहे (नर्व पेन). गुडघ्यात लोकल काही गडबड नसावीही कदाचित, तो एक लोड बेअरिंग पॉईंट असल्याने अनेक आजारांची वेदना तिथे प्रकट होऊ शकते.

बी १२ आणि डी ही जीवनसत्वे बराच अविश्वसनीय हॅवॉक घालू शकतात. तीही प्रमाणात ठेवलीच पाहिजेत.

हे सर्व आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या अनुभवांनी आणि विषयातल्या रुचीमुळे लिहीलं. यात कोणताही थेट वैद्यकीय सल्ला नाही आणि एकूणच आंतरजालावरुन आलेला कोणताही सल्ला फक्त माहिती म्हणूनच घ्यावा हे वेगळे सांगणे न लगे.

बी१२, डी व्यवस्थित आहे. सप्लिमेंट म्हणुन तरीही ८-१० महिने त्याच्या गोळ्या घ्यायला सांगण्यात आल्या. त्या घेतल्या.
संचेती ओर्थोपेडिक सेंटार मध्ये एक खास तज्ञांचे फिजिओथेरपिस्ट सेंटर आहे. त्यांनी सांगितलेले गुडघ्याचे काही व्यायाम व काही Ham string/muscles व्यायाम करतोय,मागील सहा-एक महिन्यापासुन. पण त्रास वाढतोच आहे.
डोक्टर म्हणतात नियमित gym जॉइन कर्.तुला काहीही झालेल नाही. मी म्हणालो की दुखत आहे,मला वेदना जाणवत आहेत. कदाचित त्या तुमच्या पकडीत येत नसाव्यात. आज पासुन gym जॉइन करतोय.भ्रमिष्ट होण्याची वेळ आधीच आली आहे. एका न्युरोलॉजी मध्ये उच्च शिक्षण समवयीन डॉक्टर मित्रास बोललो होतो. त्याने चक्क हा "मानसिक त्रास" किंवा नैराश्याचे शरीरावरील प्रकट रूप असण्याची शक्यताही बोलुन दाखवली.वस्तुस्थिती तशी नाही. इतर सर्व गोष्टी आयुष्यात सर्वसाधारण आहेत. त्या खूप चांगल्या नाहित तशाच त्या खूप वाइटही नाहित. "नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती इतक्या समर्थपणे दैनंदिन व्यवहार पार पाडेल असं वाटत नाही." हे उद्गार एका psychiatrist ने मला तपासल्यावर काढले व तशी शक्यता नाकारली. नैराश्यामुळे दुखणे उद्भवले असे नसुन दुखण्यामुळे मन निराश होत आहे अशी माझी तक्रार आहे.

गवि's picture

18 Jul 2011 - 3:27 pm | गवि

न्युरॉलोजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट यात प्रचंड गोंधळ झालेला आहे. न्युरॉलॉजी म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम अशा दोन्हीचा तज्ञ. त्यात मन नव्हे तर मेंदूपासून बोटाच्या टोकापर्यंत पसरलेल्या नसा (हालचालीसाठी आणि स्पर्शज्ञानासाठी) / न्युरॉन्स वगैरेचा समावेश होतो.

मनाचा इथे काही संबंध नाही. तुमची कशालाच दाद न देणारी लक्षणे मानसिक नसून न्युरॉलॉजिकल (नसा आणि एकूण नर्व्हस सिस्टीमशी) संबंधित असू शकतात.

र्‍हुमॅटॉलॉजिस्ट हे ऑटोइम्युन विकारांचे तज्ञ असतात त्यांच्याकडे आर्.ए. वगैरे नाही ना ते बघण्यासाठी जाता येईल. या प्रकारच्या आर्थ्रायटिसचा ऑर्थोपेडिकशी संबंध नाही.

पण इतके खात्रीने डॉक्टर्स म्हणताहेत तर नक्कीच व्यायाम न चुकता सलग अनेक महिने करत राहून फरक पहायला हरकत नाही.

स्वानन्द's picture

18 Jul 2011 - 5:57 pm | स्वानन्द

एम आर आय स्कॅन चा खर्च पाच ते सहा हजार असतो. कदाचित त्यामुळे सहसा डॉक्टर हा स्कॅन लगेच रेकमेंड करत नसावेत असा माझा अंदाज आहे. पण तुम्ही सतत पाठपुरावा केलात.. तर कदाचित ते स्कॅन करून घ्यायला सांगतील असे वाटते.

जर लिगामेंट स्प्रेन असेल तर बाहेरील उपचारांनी ( तेल लावणे वगैरे ) मुळे सुधारणा होऊ शकेल. पण जर लिगामेंट टीअर ( पार्शिअल किंवा संपुर्ण ) तर कितीही बाह्योपचार केल्याने गुण येणे कठीण वाटते. डॉक्टरांना वारंवार भेटून किमान काय झाले आहे ह्याचे निदान होणे आवश्यक आहे असे वाटते.

डॉ. हर्डीकर किंवा डॉ. वैद्य ( लोकमान्य हॉस्पिटल ) यांना हवे तर एकदा दाखवून पहा. ( अर्थात सतत डॉक्टर बदलण्यात ही अर्थ नाही वेळ आणि पैशाचा विनाकारण व्यय होइल. एकच डॉक्टर पकडा आणि निदान करून घ्या )

शिवाय गुगल वर या विषयावर बरीच माहिती मिळेल. एकाच साईट वरील माहिती वर विसंबून राहू नका. जेवढे जास्त शोधाल तेवढी तुम्हाला गुडघेदुखीबद्दल अधिक माहिती मिळेल. हे फक्त माहिती साठी बरं. डॉकटरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्या.

नितिन थत्ते's picture

18 Jul 2011 - 2:22 pm | नितिन थत्ते

बालाजी तांबे हे वैद्य, हकीम, डॉक्टर किंवा वैदू यापैकी काहीही नाहीत हे येथे निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

छोटा डॉन's picture

18 Jul 2011 - 2:28 pm | छोटा डॉन

हेच लिहायला आलो होतो.
शुभेच्छा आहेतच.

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2011 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार

त्यांच्या संस्थळावर देखील त्यांना वैद्य अशी पदवी लावण्यात आलेली आहे.

नक्की माहिती कोणाला आहे काय?

नितिन थत्ते's picture

18 Jul 2011 - 3:04 pm | नितिन थत्ते

या ठिकाणी पूर्वी दुवा दिला होता तो आता चालत नाही.:(

परंतु या दुव्यावर (सर्वात खाली) मात्र तसे लिहिले आहे. हा दुवा त्यांचे कौतुक करणारा असल्याने ही माहिती खरी धरायला हरकत नाही.

चिंटु's picture

18 Jul 2011 - 3:03 pm | चिंटु

त्यांच्या मुलाखतीत असं ऐकलेल आहे की ते मुख्यतः मेकॅनिकल इंजिनीअर आहेत.१९८० पर्यंत तोच त्यांचा मुख्य धंदा होता. मात्र त्यानंतर त्यांनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात प्रॅक्टिस सुरु केली. देश्-विदेशाहुन त्यांच्याकडे भारतीय्-पाश्चात्त्य असे अनेक मोठ्-मोठे लोक येउ लागले. आयुर्वेदाचा अभ्यास हा त्यांच्या घराण्यात परंपरेने चालत आलाय म्हणतात. त्यांना देशो देशीचे विविध पुरस्कार मिळाले. अनेकांनी त्यांच्या उपचारातुन फायदा झाल्याचे सांगितले. नंतर ९० च्या दशकाच्या शेवटी सकाळ मधुन फॅमिली डोक्टर पुरवणी सुरु झाल्यावर तर त्यांच्या नावाची चर्चा घराघरात जाउन पोचली. आता तर ते गीता वगैरे तत्वज्ञानावर प्रवचन करताना सकाळच्याच साम वाहिनीवर दिसतात.
आयुर्वेदाची त्यांना डिग्री आहे की नाही माहित नाही. डिग्री नसताना अशी प्रॅक्टिस कायदेशीर आहे की नाही हेही माहित नाही. पण जर बेकायदेशीर असती तर आतापर्यंत कुणी ना कुणी योग्य ती कारवाइ केलीच असती की.
असो. हे अवांतर होतय. श्री तांबे ह्यांच्यबद्दल अधिक सांगण्यापेक्षा सध्या माझे पूर्ण लक्ष माझ्या स्वतःच्या तब्येतीकडे देणे भाग आहे.

श्रावण मोडक's picture

18 Jul 2011 - 5:24 pm | श्रावण मोडक

थोडे तांबे यांचेही ऐका. तुमचे दुखणे नाडी आणि सांधे यांच्याशी संबंधित असेल तर हवामें उडता जाये हे गाणं ऐकत जा. ;)
'सकाळ'मधला मूळ दुवा न सापडल्याने हा त्यासंबंधीच्या लेखाचा दिला आहे.

रामदास's picture

18 Jul 2011 - 9:46 pm | रामदास

जास्त त्रास होतो असे तुमचे म्हणणे आहे.म्हणजे उंची(तुमची) मध्यम असल्यामुळे पाय टेकत नाहीत का ? असे असेल तर पाय दुखत असतील.
एसीच्या गारव्यामूळे पाय खास करून पोटर्‍या दुखतात.गुडघे दुखल्याचे ऐकीवात नाही
तरीपण गुडघ्यापासून नडगीपर्यंत गरम कापडाचा पट्टा गुंडाळून बसत जा. (पूर्वी पोलीसाच्या पायाला गुंडाळलेल्या पट्ट्या असायच्या तशाच पट्ट्या.)
ही गुडघे दुखी वाढत जाते आहे असे वाटल्यास नक्कीच एका पेक्षा जास्त तज्ञांना दाखवा.
पाठीच्या मणक्यांचा एक्स रे काढून घ्या.
संधीवाताची फॅमीली हिस्ट्री आहे का ?

सदाशिव पेठेतील डॉ चिपळूणकर हे त्यांचं नाव. त्यांनी तपासणी करुन लगेच सांगितलं की गुडघ्यात काहिही प्रॉब्लेम नाही, पण गुडघा दुखत असणं शक्य आहे! मी म्हटल :- "ते कसं काय?"'.
त्यांनी लगेच भिंतीशी उभे केले, आणि माझ्या पोश्चरमधील त्रुटी दाखवली. कायम एक खांद किचित झुकवुन उभा असल्याचं प्रथमच जाणवल. ते म्हणाले, "मान व्यवस्थित आहे का? हात मानेखाली घेउन एका कुशी वर झोपायची सवय आहे का?" मी म्हटलं "मान तशी नीट नाही/नसते. सतत अवघडलेली असते.तुम्ही म्हणता तशी सवय आहे. "()दरिद्री परिस्थितीत आणि अनेकानेक जीव नकोसा करणार्‍या कौटुंबिक समस्या ह्यात बालपणापासुनचा दीर्घकाळ गेल्याने, पुरेशी पांघरुणे नसायची. साहजिकच अंगाच मुटकुळं करुन जमेल तित्कं अंग बारिक करुन एका कुशीवर झोपायची सवय लागली.तीच दशकानुदशके सुरु आहे. त्यांचे म्हणणे पडले की "मग शिरेवर शीर आली असण्ञाची दाट शक्यता आहे. किंवा तत्सम शीर्/नर्व्ह संबंधित काहितरी इश्यू असावा."
.
.
सध्यातरी त्यांनी १० दिवस घेण्यासाठी विविध गोळ्या दिल्यात.(पौष्टिक्/टॉनिक वाल्या) दहा दिवसानी कमरेपासच्या भागाचा आणि मानेचा एक्स रे काढुन बोलावले आहे. मान किंवा कंबर ह्या भागातील नसांमध्ये काही प्रॉब्लेम असावा ह्या अंदाजाने हे केले जात आहे.काही निदान होइल व उपाय सापडेल अशी आशा आहे. सध्यातरी gym लावु नये असे सांगण्यात आले आहे. सर्व वाचकांचे आभार.

श्रावण मोडक's picture

18 Jul 2011 - 10:59 pm | श्रावण मोडक

जिम लावू नका. चिपळुणकरांची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. त्यानंतर बाकी निर्णय. शिरेशी संबंधित बाब असू शकते, हे तुम्ही इथं केलेल्या वर्णनातून दिसते. या डॉक्टरांनी तिथंपर्यंत तुम्हाला आणलं आहे, हे महत्त्वाचे.
वय चोवीस आहे ना? दशकानुदशकांच्या सवयी कसल्या? हे वय असं आहे की इथून नव्या सवयी पटकन लागतील. त्या चांगल्या सवयी लावून घ्या.

स्वानन्द's picture

18 Jul 2011 - 11:49 pm | स्वानन्द

ग्रेट!!

मुंबैत आलात तर गोरेगाव पूर्व येथील डॉ आश्विन सामंत यांना भेटा. अत्यंत निष्णात ऑर्थापेडीक तज्ञ आहेत.
पत्ता= Samant nursing home
Gr. floor, yashodhan, plot no 5, jaiprakash nagar, goregaon(east)

tele no 26860695/268606960

EMAIL =snho@vsnl.net

चिंटु's picture

19 Jul 2011 - 3:17 pm | चिंटु

जर सध्याचे उपाय निष्फळ ठरले, तर मुंबैतच यावे लागेल. त्यावेळेस हा पत्ता कामाला येइल.

हा एक संधिवाताचा प्रकार असावा असे वाटते, मिपावैद्य स्पा यांनी वर सांगितल्याप्रमाणे, कारण मला देखिल पोट बिघडले की शरीरातील जोड दुखणे हा प्रकार होतो.

अजुन एक , तुम्हाला गुडघा आहे आणि तो दुखतो हेच विसरायचं जमतंय का बघा, अवघड आहे. पण मागच्या वर्षी मला डेंग्यु बरा झाल्यावर पण जे तीन चार महिने वेदना होतात, त्यावेळी डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं, ५-६ दिवस तयारी करुन पुणे - गोवा - पुणे असं १५०० किमि गाडी चालवुन फिरुन आलोय त्यानंतर.

अवांतर --

''नवीन डॉक्टर कडे आत्ताच जाउन आलो.''

म्हणजे डॉक्टरच नविन आहे का तुझ्यासाठी नविन आहे ?

ईश आपटे's picture

19 Jul 2011 - 8:13 am | ईश आपटे

अजुन एक , तुम्हाला गुडघा आहे आणि तो दुखतो हेच विसरायचं जमतंय का बघा, अवघड आहे

आपला हा डाक्टर डोकेदुखी वर असाच सल्ला देतो काय ?????? ;)

चिंटु's picture

19 Jul 2011 - 3:16 pm | चिंटु

पटलेलं नाही.

चित्रगुप्त's picture

19 Jul 2011 - 10:59 am | चित्रगुप्त

नमस्कार
तुम्ही सर्व प्रकारचे उपय करत आहातच, त्यात तुम्हाला लवकरात लवकर यश मिळो. डॉ चिपळूणकर यांच्या सल्ल्याप्रमाणे उपाय करण्याने निश्चित फायदा मिळेल, असे वाटते.

इथे काही स्वानुभवाधिष्ठित मुद्दे मांडतो आहे:

शरीराचे वजन, वातावरणाचा दाब आणि जमीनीचा उलटा दाब या सर्वांचा गुड्ग्याच्या सांध्यावर सर्वात जास्त परिणाम होत असतो. योग्य असे बूट घालण्याखेरिज घरात सुध्धा नरम व जाड सोल असलेल्या चपला सतत घालाव्यात.

प्रमाणाबाहेर होणारा वीर्यनाश हा दांधेदुखीस मदत करतो, त्यामुळे असे होत असल्यास योग्य ती काळजी घ्यावी.

घरी जर एसी असेल तर खोलीत रुंद तोंडाच्या भांड्यात वा बादलीत पाणी भरुन ठेवत जावे. म्हणजे खोलीतल्या हवेतील सर्व पाणी शोषून झाल्यावर एसी आपल्या शरीरातील पाणी खेचतो (त्यामुळे घश्याला कोरड पडते, सांधे दुखतात), त्या ऐवजी बादलीतील पाणी वापरले जाईल. हा उपाय ऑफिसातील एसी च्या बाबतीत काम करतो कि नाही हे ठऊक नाही, तरी करून बघता यावे.

पायाचे स्नायु बळकट होण्यासाठी पाठीवर उताणे पडून हळूहळू पाय गोलाकार फिरवणे हा साधा व्यायाम करावा. फार जास्त चालणे सध्या टाळावे

आपले शरीर व एकंदरीतच सर्व जीवन हे विश्वातल्या अगणित गोष्टींशी निगडित असल्याने ग्रहांचे भ्रमणाच्या अभ्यासातून आपल्या आयुष्यातील घटना सांगता येऊ शकतात.
ज्योतिषी सांगतात ते उपाय, उदा. अमुक खड्याची अंगठी घालणे वा शनी ला तेल घालणे असले उपाय करण्याची गरज नाही, परंतु हा त्रास तुम्हाला किती काळ भोगावा लागणार आहे, हे वाटल्यास चांगल्या ज्योतिष्यास विचारावे. सर्व इलाज करून देखील फायदा झाला नाही, परंतु कालांतराने ग्रहस्थिती बदल्यावर रोग आपोआप बरा झाला, अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात.

पुढे कधी जमेल, तेंव्हा विपश्यना शिकून घ्या. कामाची विद्या आहे. शिकून जर रोज सवय ठेवली, तर अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
शुभेच्छा.

सूड's picture

19 Jul 2011 - 1:11 pm | सूड

प्र का टा आ

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Jul 2011 - 11:30 am | चेतन सुभाष गुगळे

चिंटू,

तुमची गुडघेदुखी आता नाहीशी झाली काय? नसल्यास एक साधा सोपा उपाय करून पाहा. नेहमीच पाठीवर झोपा (एका कुशीवर नको) आणि पायाखाली एक उशी घ्या. आठवडाभर करून पाहा. फरक पडला नाही तर दोन उशी घेऊन पाहा. या उपायाने नक्कीच फरक पडेल. दोन आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील. अर्थात हे करत असताना डोक्याखाली देखील उशी घेउनच झोपले पाहिजे. डोक्याखाली उशी नसेल आणि केवळ पायाखाली उशी ठेवाल तर अ‍ॅसिडिटीच्या भयंकर दुष्परिणामांस सामोरे जावे लागेल.

गेट वेल सून!

नेमकं उठल्यावर कळतं की आपण एका कुशीवर होतो माग्ची रात्र म्हणुन

नेमकं उठल्यावर कळतं की आपण एका कुशीवर होतो माग्ची रात्र म्हणुन

नितिन थत्ते's picture

19 Jul 2011 - 11:43 am | नितिन थत्ते

तुमच्या गुडघ्यांचा चंद्र आणि मंगळ यांच्याशी होणारा कोनही खूप परिणाम करतो हे येथे नमूद करू इच्छितो.

आता गुडघ्याचा कोन बदलणे खूप अवघड आणि वेदनादायक असू शकते म्हणून त्या ऐवजी चंद्र आणि मंगळ यांच्या आकाशातल्या जागा बदलल्या तरी तोच परिणाम मिळू शकेल (संदर्भ : आइनस्टाईनचे सापेक्षतेचे तत्त्व किंवा डोंगर-महम्मद तत्त्व).

आम्ही अशी चंद्र आणि मंगळ यांची स्थाने बदलून देतो. त्याचे दरही माफक आहेत.

आपण अनुभव घेऊन पाहू शकता.

[टीप: काल सायंकाळी उशीरा काही मिपाकर आकाशातल्या चंद्राची जागा बदलल्याचे बोलत होते. त्यावेळी इतर लोक त्यांनी प्राशन केलेल्या द्रवांचा परिणाम आहे असे सांगून त्यांची दिशाभूल करत होते].

चिंटु's picture

19 Jul 2011 - 3:12 pm | चिंटु

अ-मंगळ प्रतिसाद वाटला.

सहज's picture

19 Jul 2011 - 3:40 pm | सहज

ईश आपटे यांची गुडघेदुखीची थिअरी खरी असेल तर आता पुढील वाक्ये ऐकल्यावर काय समजायचे?

१) एखादे काका सदस्य विकांता ऐवजी सोमवारच्या कट्याबद्दल म्हणता की कृपया सोमवारी कोणत्याच कट्ट्याला मी येउ शकणार नाही हां, गुडघे दुखतात.

२) सुटीवरुन पुन्हा कचेरीत आलेल्या एखाद्याची खुशाली विचारता "हो हो सहल मस्त झाली फक्त जरा गुडघे जास्त दुखत आहेत इतकेच."

३) फोनवर एखादी सासु नातेवाईकांशी आमंत्रण नाकारताना म्हणते की 'हो हो कालच मुलगा-सुनबाई सहलीवरुन आले. तसे आम्ही मोकळे आहोत पण दोन आठवडे तरी आम्ही तुमच्याकडे येत नाही. अहो आम्हा चौघांचेही गुडघे फार म्हणजे फार दुखत आहेत.

असो चिंटु तुम्ही मराठी संस्थळे वाचत रहा, चर्चांमधे भाग घ्या मग बघा गुडघेदुखी आहे हे पार विसरुन जाल. हा पण मग डोकेदुखी वाढली म्हणुन धागा काढू नका म्हणजे झाले!

फोनवर एखादी सासु नातेवाईकांशी आमंत्रण नाकारताना म्हणते की 'हो हो कालच मुलगा-सुनबाई सहलीवरुन आले. तसे आम्ही मोकळे आहोत पण दोन आठवडे तरी आम्ही तुमच्याकडे येत नाही. अहो आम्हा चौघांचेही गुडघे फार म्हणजे फार दुखत आहेत.

अबॉबॉबॉ.....मेलो......

*** ईमरान हाशमी यांचा गुडघेदुखीने मॄत्यु.....

खरंच या थिअरीमुळे गुडघेदुखी म्हणजे असं दुखणं होईल की सहन होत नाही अन् सांगता येत नाही. :D
कोणी नि कॅप जरी लावली असेल तर लोक भुवया उंचावून बघणार त्याच्याकडे.

रामदास's picture

20 Jul 2011 - 11:32 am | रामदास

गुडघे खरचटल्याच्या तक्रारी किती येतात ?

गणपा's picture

20 Jul 2011 - 5:12 pm | गणपा

शी बै आच्रत... ;)

गुडघे खरचटल्याच्या तक्रारी किती येतात ?

चुकुन "गुडघे खरे चाटल्याच्या तक्रारी किती येतात ?" असे वाचले...

धमाल मुलगा's picture

20 Jul 2011 - 5:45 pm | धमाल मुलगा

मुनीवर्य,

मेलो! =)) =)) =))
ह्यासोबत लो-ब्याक पेन, स्लीपडिस्क ह्याबद्दलही संलग्न विदा मिळणे फायद्याचे ठरेलसं वाटते, नाही?

चतुरंग's picture

21 Jul 2011 - 2:56 am | चतुरंग

रामदास काकांनी एकदम गुडघ्यालाच .. आपलं मुद्द्यालाच हात घातलाय! ;)

-ईश्श धपाटे

ईश आपटे's picture

20 Jul 2011 - 4:32 pm | ईश आपटे

ईश आपटे यांची गुडघेदुखीची थिअरी खरी असेल तर

ही माझी थेअरी नसुन आयुर्वेदाची थेअरी आहे. आयुर्वेदिक ग्रंथ वाचावेत व वैद्यांना विचारावे...........

धमाल मुलगा's picture

20 Jul 2011 - 5:42 pm | धमाल मुलगा

फोनवर एखादी सासु नातेवाईकांशी आमंत्रण नाकारताना म्हणते की 'हो हो कालच मुलगा-सुनबाई सहलीवरुन आले. तसे आम्ही मोकळे आहोत पण दोन आठवडे तरी आम्ही तुमच्याकडे येत नाही. अहो आम्हा चौघांचेही गुडघे फार म्हणजे फार दुखत आहेत.

अरे अरे...आवरा! हे हे फारच खाजगी प्रकरण होतंय असं नाही का वाटत? ;)

नरेश_'s picture

19 Jul 2011 - 4:17 pm | नरेश_

एखाद्या र्‍हुमेटोलॉजिस्ट + आणखी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
बर्‍याचदा बरीचश्या दुखण्यांची कारणे मनोकायिक प्रकारात मोडतात. असो.
तुमच्या प्रकृतीला लवकरात लवकर उतार पडो ही देवाचरणी प्रार्थना !

तुमच्या गुडघ्याच्या एक्सरेचा डिटेल्स नीट दिसतील असा एक फोटो काढून इथे चिकटवा, त्यानंतर कदाचित काही सूचवता येऊ शकेल.

तुम्ही तुमच्या रक्तातील यूरीक अ‍ॅसीडचे प्रमाण चेक करून घ्या.
युरीक अ‍ॅसीडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे वाकवताना प्रचम्ड दुखतात. बहुतेकवेळा हे छोटे सांधे असतात उदा बोटांची पेरे. मात्र गुडघ्यातील सांध्याना देखील अशा वेदना होउ शकतात
यावर होमीऑपॅथी मध्ये उपाय आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

25 Jul 2011 - 12:50 pm | अविनाशकुलकर्णी

संधि सुधा वापरुन बघा....
सहन शक्ति वाढवा....
आमचे पण दुखतात..
दाक्तर म्हणतात बदलुन टाका..
पण भिति वाटते..

विजुभाऊ's picture

25 Jul 2011 - 5:28 pm | विजुभाऊ

या धाग्यात फक्त कोलगेट आणि वज्रदम्ती वापरून बघा एवढेच लिहायचे र्‍हायलय

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jul 2011 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

'पासपोर्टच्या लायनीत उभा राहून बघा' हे पण सांगायचे राहिलय.

सहज's picture

25 Jul 2011 - 5:52 pm | सहज

'पुणे पारपत्र कार्यालयाच्या लायनीत उभा राहून बघा' हे पण सांगायचे राहिलय.

अलिकडील काळात अनेक जणांच्या गुडघेदुखीच्या ( knee pain ) वाढत्या समस्या ऐकुन , मिपा संकेत संस्थळ वर याबद्दल काही अनुभव कथन आहे का हे बघताना हा धागा दिसला . माहितीपुर्ण अनुभव कथन आहे . याच संबधी अन्य एका धाग्यावर लिहिलेला प्रतिसाद इथे पेस्ट करत आहे .

माझ्या माहितीप्रमाणे पेन मॅनेजमेंट तज्ञ जास्त करुन त्यांच्या संधिदाहांत knee pain , joint pain , hip pain संबंधी pain management clinical procedures मध्ये inflammation / पाणी / सुज शरीराबाहेर काढण्यासाठी अ‍ॅस्पिरेट पद्धत व स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर करतात . बरेचदा शरीरातील अनेक विशिष्ट सांध्यांमध्ये खुप वापर झाला / झीज झाली तर तेथील बाह्य भागावर सुज येते . हि सुज साध्यांच्या आतील भागांमधे दुषित पाणी / synovial fluid / joint inflammation / joint effusion या स्वरूपात जमा होते . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय या माध्यमांमधुन याचा तपास करता येतो .

अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय यांच्या रीपोर्ट मधे याचा उल्लेख effusion / joint effusion किंवा fluid असा होतो. हि सुज शोधणे व ती extract करणे / शरीराबाहेर काढण्यामधे orthopedic तज्ञांपेक्षा pain management तज्ञांचा जास्त उपयोग होतो . हि सुज extract करणे / शरीराबाहेर काढ्ण्याच्या कृतीला joint aspirate procedure असे म्हणतात . त्यानंतर joint inflammation कमी व्हावे म्हणुन मेडिकल मान्यताप्राप्त स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर केला जातो . गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी कमी होण्यासाठी या pain management clinical procedures चा उपयोग होतो .

अनेक मोठ्या hospitals मधे pain management तज्ञांचा वेगळा विभाग असतो तसेच त्यांची क्लिनिक्सही असतात . या विभागातर्फे गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी या संबधी operations postpone करणे वा टाळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात जसे की - स्टेम सेल थेरपी , प्लासमा सेल थेरपी , पी आर पी इंजेक्शन्स . हे उपचार minimal surgical/ non surgical invasive technology / therapy या नावाने ओळखले जातात ,