(चाल : गंगा जमुना डोळयात उभ्या का -)
होंडा इंडिका थाटात उभ्या का
जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... |धृ |
कडकडुनी तू मिठी मारता, डोळे
माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे
आठवले सारे सारे गहाण ते गाळे
तुज कर्जाचे भय न संगती, जा |१| जा मुला जा....
श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी
बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी
पूस रे डोळे या सदऱ्याने - आवर ती जाडी
रूप दर्पणी नसे देखणे, जा |२| जा मुला जा....
आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची
जमले तिचे रे कैसे तुजवर लव्ह - लफडे
हटू नकोस मागे मागे काम कितीही पडे
नकोस विसरू धुणि-भांड्याला, जा |३| जा मुला जा....
प्रतिक्रिया
5 Jul 2011 - 2:58 pm | नाना बेरके
विडंबन आवडले.
पण पी. सावळाराम ह्यांची आठवण ह्यानिमित्ताने झाली त्याचे जास्त विशेष.
देव जरी मज कधी भेटला...., कल्पवृक्ष कन्येसाठी....., असावे घरटे आपुले छान...., जेथे सागरा धरणी मिळते.. अशांसारखी उत्तमोत्तम गाणी देणारा, कवितेतून जिव्हाळ्याची उत्कट भावनामूल्य जपणारा कवी म्हणून मला पी. सावळाराम फार आवडतात.
5 Jul 2011 - 4:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
मी चुकुन तिच्या ऐवजी त्याच्या वाचल.
बाकी विडंबन झकास जमले आहे. मुळ गाणे अतिशय सुरेख आणि श्रवणिय आहे.
5 Jul 2011 - 4:22 pm | यकु
विडंबन मस्त!!!!
"माहेरची साडी " गाणं पण फिट्ट बसतंय या चालीवर!
5 Jul 2011 - 9:32 pm | धन्या
झक्कास जमलय !!!
9 Jul 2011 - 1:11 pm | स्वप्ना_तुषार
मस्तच