'तो' शनिवार

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
3 Jul 2011 - 11:13 pm

जगातला सगळा ताप विसरुन
तुझ्या कुशित विसावताना
जमा/खर्च,फायदा/तोटा
सगळं सगळं विसरताना

केसामधुन फिरताना तुझा प्रेमळ हात
वातावरण मंद सुगंधी...जणु लागली अत्तरवात
1BHKच्या ''छोट्याश्या'' फ्लेटमधे सुद्धा
मन माझं असतं गात........

प्रेमाची प्राथमिक भुक तू होतिस
नंतर आलं एक 'आपलं घर'
आता तर मनाला उधाण आलय
तूच त्याला आवरुन धर

फ्लेट पाठोपाठ गाडी आलीये
तरी ती पुरत नाही
हौस कित्तीही केली तरी
मागे काहीही उरत नाही

सगळं सगळं पटत असुन
धावण्याचा हा अट्टाहास
खिशात भरपुर पैसे आणी
शनिवारी रात्री ब्रेंडीचा ग्लास

सुखांना किती भिजवायचं?
याचा ठाव लागत नाही
कित्ती कित्ती खर्च झाला
मन हिशोब मागत नाही

थांबवायला हवा ना गं राणी
सुखांचा हा महापुर
नायतर काय उरणार शेवटी
विझलेली चूल आणी नुसताच धूर

आता तुझच खंरं आहे
मी इथेच थांबायला हवं
उरलेल्या भुकेच ओझं
पुढच्या जन्मावर ढकलायला हंवं

पुरे झाला पैशांचा सोस
घर गाड्यांचा थाटबाट
नाहीतर हरवुन जाईल आपली
मऊ मोकळी पाऊलवाट

पहिल्या वाटेवरची तू
अन मीही मला हवा आहे
कदाचित अंधार पडला तर
तोच रस्ता दाखवणारा दिवा आहे

जाऊ द्या अता झोपू मस्त
रविवार वाया जायला नको
आणी पुन्हा काही 'तो' शनिवार
कालच्या सारखा यायला नको....

पराग दिवेकर......

कविता

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

4 Jul 2011 - 10:25 am | दत्ता काळे

नायतर काय उरणार शेवटी
विझलेली चूल आणी नुसताच धूर

.. छान

पहिल्या वाटेवरची तू
अन मीही मला हवा आहे
कदाचित अंधार पडला तर
तोच रस्ता दाखवणारा दिवा आहे

हे अतिशय आवडलं

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Jul 2011 - 1:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडली!!

michmadhura's picture

4 Jul 2011 - 2:17 pm | michmadhura

छान कविता आहे .

गणेशा's picture

4 Jul 2011 - 7:35 pm | गणेशा

छान कविता

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2011 - 2:51 pm | अत्रुप्त आत्मा

प्रतिक्रीया दिलेल्या सर्वांचे आभार